2

आपल्या ‘व्हॉटस्ॲप’वर नियमितपणे लेख मिळविण्यासाठी 85 30 52 85 50 हा नंबर आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करून, त्यावर आम्हाला ‘हॅलो’ असा मॅसेज पाठवा.

Saturday, 9 May 2020

भिक्षा












एक म्हातारी
अर्धवट जळलं लाकूड
किंवा
घाणेरड्या वस्तीच्या कुंद नालीतून
वाहत जावी एक काटकी
तशी

जांभळ्या द्राक्षासारखा
सुजून टच्च फुगलेला 
जखमी हात लोंबकळवत
दोन नाणी पडलेलं
एक कटोरं घेवून
बसस्थानकावर उभी राहते प्रत्येकापाशी

तिच्यासाठी
पदरचे पैसे मोडून
सुटे करुन वाटण्याइतपत
जाणीवा नसतील माझ्यात

एक केलं..
दुपारच्या भूकेसाठी सोबत आणलेला डबा
उलथला मी तिच्या कटोऱ्यात

दानशूर म्हणून
मिरवणार होते जरा स्वतःला

जाताना तिने विचारलं ,  'तूमने कुछ खाया के नही?'
आणि माझ्यापुढे मिरवत ऐटीत निघून गेली.
- वर्षा ढोके सय्यद
(छायाचित्रांचे कॉपीराईट : विकास खोत)                                    

No comments:

Post a Comment

माणगाव परिषद : बहिष्कृतांचे रणशिंग - उत्तम कांबळे

'अस्वस्थ शतकातील माणगाव परिषद ’ हा उत्तम कांबळे यांचा ग्रंथ ‘ लोकवाङ् ‌ मय गृह ’ तर्फे लवकरच वाचकांच्या भेटीसाठी येत आहे. एका ऐति...