2

आपल्या ‘व्हॉटस्ॲप’वर नियमितपणे लेख मिळविण्यासाठी 85 30 52 85 50 हा नंबर आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करून, त्यावर आम्हाला ‘हॅलो’ असा मॅसेज पाठवा.

Saturday, 9 May 2020

युगानुयुगाची भूक












बाई केव्हापासून काम करतेय शेतात
माथ्यावर सावलीचा ढग नाही एकही
तरीही भूक आणि भाकर
तळहातावर भाजतेय

बाई केव्हापासून पाणी आणतेय घरात
अनवाणी पायांनी मैलोनमैल चालून
विहीरीपासून तहान
तळहातावर भागवतेय

बाई केव्हापासून राबतेय घरात
दारिद्रयाला लिंपून फाटक्या पदरात
चूल आणि मूल
तळहातावर सजवतेय

बाई जपतेय भूक
बाई भागवतेय तहान
बाई सजवतेय चूल
बाई वाढवतेय मूल

चूल सजली
तहान भागली
मूल वाढले
भूक वाढली
गेले परदेशी
युगानुयुगाच्या
या खेळी
बाई पडली फशी

- स्नेहा राणे, ठाणे 
(छायाचित्राचे कॉपीराईट : विकास खोत)   

No comments:

Post a Comment

माणगाव परिषद : बहिष्कृतांचे रणशिंग - उत्तम कांबळे

'अस्वस्थ शतकातील माणगाव परिषद ’ हा उत्तम कांबळे यांचा ग्रंथ ‘ लोकवाङ् ‌ मय गृह ’ तर्फे लवकरच वाचकांच्या भेटीसाठी येत आहे. एका ऐति...