2

आपल्या ‘व्हॉटस्ॲप’वर नियमितपणे लेख मिळविण्यासाठी 85 30 52 85 50 हा नंबर आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करून, त्यावर आम्हाला ‘हॅलो’ असा मॅसेज पाठवा.

Saturday 9 May 2020

शहरात भूक













साध्यासाध्या गोष्टींही 
वडील खूप गूढ पद्धतीने सांगायचे 
"बेटा! या देशात लोक उपाशी मरतात 
आणि कवीही"
आम्ही हसायचो - ते नाराज व्हायचे
गावात शेतं होते आमचे 
बाग होती, बागेत पिढीजात आंबे-जांभळं 
विहिर, तलाव तुडुंब भरलेले 
कुटुंब - शेजारी सगळेच 
मग कसं समजू शकलं असतं वडिलांचं बोलणं!
आता शहरात 
जरा जास्तच लागते भूक
गळा जरा अधिकच कोरडा पडतो 
आम्हाला आठवतात शेतं 
कुटुंब - शेजारी आठवतात 
मन हरणासारखं पळू लागतं गावाकडं 

पण आता कुठंय 
आमचं ते पहिल्यासारखं गाव 
कुटुंब-शेजारी-बाग-बगीचा-सावली! 

तरीही वाचकांनो!
गावात वडील आहेत, आई आहे आमची

जिथं वडील आहेत तिथं भरकटणं नाहीय
जिथं आई आहे तिथं भूक नाहीय

- मूळ हिंदी कवी : गोरख पांडे 
(अनुवाद : संदीप शिवाजीराव जगदाळे)
(छायाचित्राचे कॉपीराईट : विकास खोत)   

No comments:

Post a Comment

माणगाव परिषद : बहिष्कृतांचे रणशिंग - उत्तम कांबळे

'अस्वस्थ शतकातील माणगाव परिषद ’ हा उत्तम कांबळे यांचा ग्रंथ ‘ लोकवाङ् ‌ मय गृह ’ तर्फे लवकरच वाचकांच्या भेटीसाठी येत आहे. एका ऐति...