2

आपल्या ‘व्हॉटस्ॲप’वर नियमितपणे लेख मिळविण्यासाठी 85 30 52 85 50 हा नंबर आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करून, त्यावर आम्हाला ‘हॅलो’ असा मॅसेज पाठवा.

Saturday, 9 May 2020

भूक















भूक सगळ्यात आधी मेंदू खाते 
त्याच्यानंतर डोळे 
त्यानंतर शरीरात उरलेल्या इतर गोष्टींना 
मागे काहीच सोडत नाही भूक
ती नात्यांना खाऊन टाकते 
आईचं असो बहिणीचं की मुलाचं

मुलं तर तिला खूपच आवडतात 
त्यांना ती सर्वात आधी 
आणि खूप घाईघाईत खाते 

मुलांनंतर मग शिल्लक तरी काय राहतं..  

मूळ हिंदी कवी नरेश सक्सेना
(अनुवाद : संदीप शिवाजीराव जगदाळे
(छायाचित्राचे कॉपीराईट : विकास खोत)   

No comments:

Post a Comment

माणगाव परिषद : बहिष्कृतांचे रणशिंग - उत्तम कांबळे

'अस्वस्थ शतकातील माणगाव परिषद ’ हा उत्तम कांबळे यांचा ग्रंथ ‘ लोकवाङ् ‌ मय गृह ’ तर्फे लवकरच वाचकांच्या भेटीसाठी येत आहे. एका ऐति...