2

आपल्या ‘व्हॉटस्ॲप’वर नियमितपणे लेख मिळविण्यासाठी 85 30 52 85 50 हा नंबर आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करून, त्यावर आम्हाला ‘हॅलो’ असा मॅसेज पाठवा.

Friday 15 February 2019

म्हातारी मेल्याचे दु:ख नाही, पण काळ सोकावतो...


जुने वर्ष संपता संपता आणि नव्या वर्षाचा आरंभ होता होता आपला राग अधिकाधिक वाढावा अशी काळजी सत्ताधारी आणि सत्ताधार्यांनी मोकाट सोडलेले अनेकजण घेत आहेत. त्यांच्या बेताल वर्तनाचा जो अनुभव ते आपल्याला देत आहेत  तो संतापजनक आहे. अर्थात सर्वसाधारण माणसाच्या संतापाचे जराही सोयरसुतक नसलेले सत्ताधारी जेव्हा सत्तेवर असतात तेव्हा याहून वेगळी अपेक्षा करण्यात अर्थ नाही हेही मला कळते.

गेल्या चार-पाच वर्षात सत्तेत असताना आणि त्याही आधी सत्ताविहीन असतानाच्या काळात आताच्या सत्ताधार्यांनी, ज्या प्रवृत्तीचे दिवे लावले ते आता अधिकाधिक प्रखर आणि तापदायक होत चाललेले आहेत. नयनतारा सहगल यांचे आताचे आधी पाठविलेले निमंत्रण नंतर मागे घेतल्याचे निवेदन आणि या संदर्भात आता येणार्या संतप्त प्रतिक्रिया. या वातावरणाची निर्मिती आहे. कारण सत्ताधार्यांनी सत्तेचा माज आपल्या अंगात रिचवलाच पण तोच माज आपल्या अनुयायात पेरून विरोधकांना दाबून टाकण्याचे, हडेलहप्पीचे मार्ग साधारण माणसातल्या लोकांनाही सहज समजावून सांगितले आहेत आणि साहजिकच आज कोणीही उठावे आणि कुणाही विरोधात बोलत राहावे, लिहिणार्याला सळो की पळो करून सोडावे, बोलणार्याला मारून टाकावे. कुणाला नाक कापण्याची धमकी द्यावी, झुंडीचे बळ वापरून माणसांना हतबल करावे आणि एकूणातच मानवी स्वातंत्र्याचा, अभिव्यक्तीच्या स्वतंत्र्याचा, समतेच्या हक्काचा घटनात्मक वैधेतेचा पार कचरा करून टाकावा, अशी परिस्थिती आणली आहे. कधीतरी अधनं मधनं भस्मासुराचा हात स्वत:च्या माथ्यावर जावा हेही घडताना दिसते आहे. तरिही नयनतारा सहगल यांच्या संदर्भाला निषेध तीव्र शब्दात व्यक्त होत आहे हे चांगलेच आहे. पण त्याची परिणती येत्या काळात कशी घडेल याविषयी विचार करता अंगावर काटा यावा अशी परिस्थिती आहे.

नयनतारा सहगल यांना निमंत्रण पाठविण्याचे काम यवतमाळच्या आयोजकांनी केले आहे. तिथले काही स्थानिक प्रश्न, हेवेदावे मी समजू शकतो. परंतु इतक्या मोठ्या संस्थेनी येणार्या श्रोत्यांना, संमेलन उधळून दाखवू अशा तर्हेने धमकी देण्याची ताकद कुणातरी सोम्यागोम्याच्या अंगी भिनावी हा मला योगायोग किंवा अपघात वाटत नाही. गेल्या काही काळात जो माज सत्ताधार्यांच्या जवळपास वावरणार्यांनी अनेक अंगाने व्यक्त केला आहे त्याचीच ही परिणती आहे. त्यामुळे विवेकाचे भान सुटून धमक्या आणि धमक्यातून येणारी कृती, प्रसंगी होणारी त्याची फलनिष्पत्ती याचे दाखले शोधण्यासाठी फार दूर जाण्याची गरज नाही. सत्ताधार्यांनी पोसलेला हा माजाचा शक्ती आविष्कार त्यांनाही उध्दवस्त करण्यात कमी पडणार नाही, हे निश्चित आहे. पण हे होण्यापूर्वी सगळ्यात तळाशी असणारा माणूस मारला जाईल आणि अंगावर शिरस्त्राण चढवणारे आणि भोवती पोलिसी बंदोबस्ताचे कडेकोट आवरण असणारे तूर्तास तरी सुरक्षित राहतील असे चित्र दिसत आहे. कधीतरी या अविवेकी विचारावर विवेकी विचारांची मात होईल हे खरेच आहे. पण मुळात सगळ्यांना छळणारे वास्तव आपले जगणे मुश्किल करेल, त्याचे काय? म्हातारी मेल्याचे दु: नाही  पण काळ सोकावतो. हे मी त्या संदर्भातच म्हणत आहेभस्मासुराचा अंत होईल. पण तो होता होता अन्यत्रही साधारण माणसाची असाहाय्य अवस्था होईल याची मला काळजी वाटत आहे. या सगळ्यावर किती आणि कसे बोलावे हे कळत नाही. काहीजण बोलत आहेत त्याने उमेद वाढत आहे. पण तरिही या सगळ्या रणधुमाळीत तळाशी असणार्या माणसाचे काय? कारण सत्ताधार्यांना त्यांच्या जगण्या मरण्याशी काहिही संबंध उरलेला नाही, हे कटू असले तरी वास्तव आहे. त्याचे तपशीलही या भोवतालात आहेत.

मराठी भाषेतपरिवर्तनाचा वाटसरूअसे एक पाक्षिक तूर्तास कष्टपूर्वक निघत आहे. या पाक्षिकातइपीडब्लू ची पानंअसे जवळपास दहा-पंंधरा पानांचे सदर दर अंकात असते. ‘इकोनॉमिक अँड पॉलिटिकल विकलीहे साप्ताहिक माझ्या अंदाजाप्रमाणे साठहून अधिक वर्षापासून प्रकाशित होत आहे. हे साप्ताहिक इंग्रजीत असते. त्याचा दर्जा जागतिक पातळीचा तसेच गंभीर आणि महत्त्वपूर्ण असतो. हे साप्ताहिक विचाराने डावे तर आहेच आहे. पण त्याबरोबरच चांगल्या प्रकारे तपशील, विवेचन आणि चिकित्सा अशा अभ्यासपूर्ण लेखांनी भरलेले असते. मी जोवर मुंबईत होतो तोवर हे मला सहजपणे उपलब्ध व्हायचे. आता मात्र ते मला तितक्या सहजपणे उपलब्ध होत नाही.
इथेचपरिवर्तनाचा वाटसरूअसे एक पात्रिक तूर्तास कष्टपूर्वक निघत आहे. या पाक्षिकातइपीडब्लू ची पानंअसे जवळपास दहा-पंधरा पानांचे सदर दर अंकात असते. ‘‘इकोनॉमिक अँड पॉलिटिकल विकली’’ हे साप्ताहिक माझ्या अंदाजाप्रमाणे साठहून अधिक वर्षापासून प्रकाशित होत आहे. हे साप्ताहिक इंग्रजीत असते. त्याचा दर्जा जागतिक पातळीचा तसेच गंभीर आणि महत्त्वपूर्ण असतो. हे साप्ताहिक विचाराने डावे तर आहेच आहे. पण त्याबरोबरच चांगल्या प्रकारे तपशील, विवेचन आणि चिकित्सा अशा अभ्यासपूर्ण लेखांनी भरलेले असते. मी जोवर मुंबईत होतो तोवर हे मला सहजपणे उपलब्ध व्हायचे. आता मात्र ते मला तितक्या सहजपणे उपलब्ध होत नाही.

इथेचपरिवर्तनाचा वाटसरूची वाटचाल मी आपल्या समोर ठेवत आहे. इपीडब्ल्यू ची काही संपादकीय पाने ते पाक्षिकातून, मराठी अनुवादातून नित्यनेमाने देत असतात. माझ्या देशाची राजकीय व्यवस्था, माझ्या देशबांधवातील मोठ्या संख्येचे हलाखीचे जगणे, समाजव्यवस्थेतले अनंत अन्याय, हे साप्ताहिक ठळकपणे आपल्यासमोर आणते. त्यांच्या त्या अभ्यासाचा अंशत: का होईना, वापरपरिवर्तनाचा वाटसरूच्या आरंभीच्या पानांतून होत आहे. अंशत: का होईना, ती पानेआपली जमीनसमजून घेण्याच्या दृष्टीने अत्यंत गरजेची आहेत. इपीडब्ल्यूच्या देशपातळीवरच्या कामाचा थोडेफार तरी अंशपरिवर्तनाचा वाटसरूमधनं आपल्या वाट्याला येत आहे, याचे आपण स्वागत करायला हवे. वर्षाला जवळपास चार हजार पृष्ठांचा मजकूर देऊ पाहणार्या या पाक्षिकाची वार्षिक वर्गणी रु. 450 इतकी अल्प आहे. महिन्याला सर्वसाधारण अडतीस रूपयेपरिवर्तनाचा वाटसरूखर्च करायला काहीच हरकत नाही. अन्न, पाणी आणि निवारा या मूलभूत गरजांइतकीच ही आपली अपरिहार्य गरज आहे. असे समजून आपण ती मदत करावी. आता माझ्यासमोरपरिवर्तनाचा वाटसरूचा 16 डिसेंबरचा अंक आहे. त्यातबारमाही प्रवाह निष्प्राण होण्याच्या दिशेनेअसे एक इपीडब्ल्यूचे संपादकीय टिपण आले आहे. त्यातला एक उतारा (पृष्ठ क्रमांक 15) आपल्यासमोर ठेवतो. ‘वास्तवातील तथ्यांवर तोडगा काढण्यासाठी ठोस पावलं उचलण्याऐवजी पंतप्रधान उलट्या दिशेने जात आहेत. ते एक तर केवळ प्रतिकात्मकतेचा वापर करून मूळ मुद्द्यांचं थिल्लरीकरण करतात किंवा नदीचा प्रवाह आणखी अडचणीत येईल अशा प्रचंड प्रकल्पांची घोषणा करतात. शेवटी कॉर्पोरेट क्षेत्रातल्या हितसंबंधांबाबतची आपली वचनाबद्धता पाळण्याला ते प्राधान्य देताना दिसतात.’ नदीप्रवाह मुक्त करणं, त्या प्रवाहाची वाट सुचवणं, सांडपाणी निचर्यावर देखरेख ठेवणं. पाण्याचा अवाजवी उपसा थोपवणं, वन आच्छादानं वाचवणं वाढवणं आणि नद्यांमध्ये भर घालणार्या जलस्त्रोतांना नवसंजिवनी देणं, असे कोणतेही उपाय योजण्याऐवजी नदीतीरावर विकास साधण्याला महत्त्व दिलं जातं. त्यामुळे नदीपात्रात काँक्रीटची बांधकामे होतात. अतिक्रमणे होतात. पूर्ण मैदानांचा व्यावसायिक कामांसाठी वापर केला जातो आणि नदी अजून जिवंत आहे. असा भास करण्यासाठी इतर स्त्रोत्रांकडून नदीपात्रांकडे पाणी फिरवलं जातं.’

उपरोक्त उतारा हा वरवर नद्यांच्या संदर्भात आहे असे वाटले तरी ते तितके खरे नाही. नद्यांच्या बाबतीत जे आहे तेच राफेलच्या बाबतीत आहे. जलयोजनेच्या बाबतीत आहे. पाणलोट क्षेत्राच्या बाबतीत आहे. कुठलंही जगण्याचं क्षेत्र विचारांत घेताना, योजना आखताना ते, ‘‘कॉर्पोरेट क्षेत्रातल्या हितसंबंधांना प्राधान्य देताना दिसतात. म्हणजे आताची संपूर्ण राजकीय व्यवस्था भांडवलशाहीच्या उद्धाराला पूरक आणि तळातल्या माणसाचं जगणंच नष्ट करणारी, हतबल करणारी आहे आणि हे सगळं   बेमालूमपणे करण्यात आलाचे चलाख, बुद्धीमान राजकारणी तरबेज आहेत. या आधीच्या कोणत्याही काळात यांच्याइतके तरबेज लोक आपल्या वाट्याला आले नव्हते. हे सत्य आपण समजून घ्यायला हवे. प्रश्न त्यांच्या पूर्ण समग्रतेत समजून घ्यायला हवेत आणि ते समजून घेताना आपण कुणाच्या बाजूचे आहेत याचे तिखट आणि तीव्र भान आपल्या प्रत्येक अभिव्यक्तितून व्यक्त व्हायला हवे. त्यासाठी आपणांस शुभेच्छा देतो.’’

खरेतर वर्षअखेरीचे सहा-सात दिवस मी खूप आनंदात वाचनात गढलो होतो. वाचन आनंददायी होते का? तर नाही. ते माझ्या मनाला वेदना देणारेच होते आणि तरिही ते अपरिहार्यच झाले. याच चार ग्रंथ वर्षाच्या शेवटच्या आठवड्यात मी वाचले.

1. अक्षरनाती, निर्मलकुमार सूर्यवंशी, निर्मल प्रकाशन, नांदेड पृष्ठ संख्या जवळपास 400, किंमत रु. 400

2. माझा धनगरवाडा, धनंजय दुरगुडे, रोहन प्रकाशन, पृष्ठ संख्या जवळपास 450, किंमत रू. 400

3. देरसू उझाला, मूळ रशियन लेखक ब्लादिमीर अर्सेलिव, अनुवाद जयंत कुलकर्णी, पृष्ठ संख्या जवळपास 225, किंमत  रु. 250

4. व्हॉट इज हिस्टरी? . एच. कार (E.H.Carr) पेंग्विन बुक्स चवथ्या पुस्तकाचे वाचन अजूनही सुुरू आहे.

माझ्या माहितीप्रमाणे याचा मराठी अनुवादइतिहास म्हणजे काय?’ या नावाने कॉन्टीनेंटल प्रकाशन तर्फे काही वर्षापूर्वी प्रकाशित करण्यात आला होता. माझ्या संग्रहातील ग्रंथकार्डावर त्याची नोंदही आहे. पण आता मात्र पाहण्यासाठी ग्रंथ हाताशी नाही. असो. आपले  पहिले तीन ग्रंथ ज्यात पहिला आहे प्रकाशन व्यवसायतले टक्के टोणपे खात निर्मल प्रकाशनाच्या उभारणीचा सांद्यंत अनुभव आहे. अर्थात प्रकाशनाचा अनुभव सांघता सांगता त्यात लेखकही आलाच. जवळजवळ चाळीस एक वर्षाच्या प्रकाशन व्यवसायातल्या अनुभवांचा हा लेख कुठल्याही लेखकीय कौशल्यापासून जरा दूरच आहे. पण प्रकाशकातल्या माणसाचं प्रांजळ आणि भाबडं दर्शन मात्र पूर्ण ग्रंथात आहे. ‘माझा धनगरवाडाहे नगर समजातल्या शिक्षणाचा आधारने पुढे येऊ पाहणार्या, म्हटले तर भटक्या, आणि म्हंटल तर स्थिरावलेल्या किंवा स्थिरावू पाहणार्या समाजाचे चित्रण आहे. आपल्या आजूबाजूला वावरणारा एक समाज आज जगण्याचा कोणत्या पातळीवर आहे हे सामाजिक भान देण्यासाठी हा ग्रंथ मला महत्त्वाचा वाटतो. इथेही पुन्हा लेखकाचा साधा स्वभाव आणि जगण्याला मानवी आणि नैतिक पातळीवर समजून घेण्याचा प्रयत्न पाहता येतो. तिसरा ग्रंथ देरसू उझाला (देरसू उझाला हा अकिरो कुरूसोवा ने निर्माण केलेला महत्त्वाचा आणि गाजलेला सिनेमा) हा विसाव्या शतकाच्या आरंभकाळात आणि सोव्हिएत सत्तेच्या आरंभाच्या काळातील. भूगोल समजून घेण्याच्या आणि नकाशानिर्मिती अभ्यासात सैबेरियातील ‘‘तैला’’ च्या जंगलात कामगार म्हणून रूजू असलेल्या लेखकाला भेेटलेल्या आदीम समाजातल्यादेरसूया पूर्णत: अरण्यपातळीवरच जगणार्या माणसाचे जगणे समजून घेणारा हा ग्रंथ आहे. मोठी विलक्षण गोष्ट आहे देरसूची.

भोवतालाशी संवाद साधणारी बोली, सगळ्यालाच माणूस समजण्याच्या जागत्या आणि वेगळ्या विचारभानाचा हा अविष्कार निसर्गातले रौद्र आणि हळुवारपणे, या सगळ्याचा समतोल साधत निरागस जगणार्या त्याचा सहज स्वभाव हे सगळे अद्भूत आहे. आयुष्यातल्या आवडलेल्या ग्रंथात मी देरसू उझाला चा समावेश करेन आणि संग्रहात ते जपेन, पुढच्या पिढ्यांसाठी. राहिला विचार, . एच. कार यांच्या ‘‘व्हॉट इज हिस्टरी?’’चा मला प्राप्त झालेली पेंग्विन बुक ची ताजी आवृत्ती . एच. कार च्या Files, notes, towers, 2nd edition, R.W.Davies, यांचे पुरवणीवजा टीपण आहे, याची आपण नोंद घ्यावी. इतिहास म्हणजे काय? हे त्यांच जगन्मान्य पुस्तक आपल्या इतिहासाविषयीच्या सगळ्या कल्पनांना हादरा देणारे आणि चिंतनाच्या नव्या दिशा दाखवणारे आहे. आज 2019 मध्ये 21 व्या शतकात जगताना माणसाचा ज्ञात आणि अज्ञात इतिहास समजून घेणे किती वाटांनी आणि कसे पुढे पुढे जात आहोत, हे समजून घेण्यासाठी हा ग्रंथ आपल्या वाचनात हवा.

खरेतर, गेले काही दिवस प्रयत्न करूनही मला मराठी अनुवादापर्यंत जाता आले नाही. पण येत्या काळात मी ते करेनच करेन. यातला प्रत्येक ग्रंथ किती महत्त्वाचा आहे हे तुम्ही वाचून ठरवायला हवे. देरसू उझाला मात्र स्वत:च्या ग्रंथसंग्रहातच आणावा, अशी खास विनंती.

येता काळ आपणांस आपला सगळा भवताल तुकड्यातुकड्यातून नाही तर एकत्रितपणे समग्रतेने सगळ्यांना कवटाळूनच व्हावा, अशा आपणांस येत्या वर्षासाठी शुभेच्छा.

आमेन.                                                

- सतीश काळसेकर

(संपर्क : C/o  डॉ. सचिन वैरागी, श्री साई रुग्णालय, चिंचपाडा रोड, पेण, जि. रायगड – 402107)

चलभाष : 9325805449, 9422689559

माणगाव परिषद : बहिष्कृतांचे रणशिंग - उत्तम कांबळे

'अस्वस्थ शतकातील माणगाव परिषद ’ हा उत्तम कांबळे यांचा ग्रंथ ‘ लोकवाङ् ‌ मय गृह ’ तर्फे लवकरच वाचकांच्या भेटीसाठी येत आहे. एका ऐति...