2

आपल्या ‘व्हॉटस्ॲप’वर नियमितपणे लेख मिळविण्यासाठी 85 30 52 85 50 हा नंबर आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करून, त्यावर आम्हाला ‘हॅलो’ असा मॅसेज पाठवा.

Saturday 9 May 2020

भूकेचा कोरस















प्राणी असतो तर
भूक जाणवताच निघालो असतो 
पोट भरण्याच्या शोधात 
आणि कुठल्याशा एका क्षणी पोहचलो असतो तिथं 
जिथं निसर्गानं ठेवलेलं असेल माझ्यासाठी जेवण
पण माणूस आहे उपाशी 
अन् माहित नाही कुठंय माझ्या वाट्याचं अन्न 
माणूस आहे आजारी 
कुठंय माझ्या वाट्याचं आरोग्य 
माणूस आहे हतबल
कुठंय माझ्या वाट्याचं जीवन

काहीच तर ठरलेलं नाहीय
कुठल्याही नियमांविना चाललंय जीवनयुद्ध 

चालाकी केली 
तर दुसर्‍याच्या हिश्याचं अन्न ही खाऊ शकतो 
पण हुशारीशिवाय तर
स्वतःचं अन्न मिळवणं अन् वाचवनं ही शक्य नाहीय 

पोट भरण्याच्या संघर्षातून सुरू झाला होता जो संस्कृतीचा प्रवास 
काही लोकांसाठी परावर्तित झालाय घर भरण्याच्या क्रूर वासनेत
वाढत चाललीय अपचनाच्या औषधांची विक्री 
आणि वंचितांच्या ताटातल्या कमी होतायत भाकरी 

अशात कुठे जाईल उपाशी 'रामदास'
ज्याला मागावं वाटत नाहीय आणि हारलाय जीवनाचे सगळे पेच
थंड आणि कठोर दरवाज्यांच्या पाशवी इमारतींच्या या शहरात 
भूक वाढत चाललीय महापूरासारखी 
आणि त्यात बुडत चाललेयत 
अन्न मिळवण्याचे ज्ञात-अज्ञात रस्ते!

- मूळ हिंदी कवी : मदन कश्यप 
(अनुवाद : संदीप शिवाजीराव जगदाळे)
(छायाचित्राचे कॉपीराईट : विकास खोत)   

No comments:

Post a Comment

माणगाव परिषद : बहिष्कृतांचे रणशिंग - उत्तम कांबळे

'अस्वस्थ शतकातील माणगाव परिषद ’ हा उत्तम कांबळे यांचा ग्रंथ ‘ लोकवाङ् ‌ मय गृह ’ तर्फे लवकरच वाचकांच्या भेटीसाठी येत आहे. एका ऐति...