2

आपल्या ‘व्हॉटस्ॲप’वर नियमितपणे लेख मिळविण्यासाठी 85 30 52 85 50 हा नंबर आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करून, त्यावर आम्हाला ‘हॅलो’ असा मॅसेज पाठवा.

Saturday, 9 May 2020

भूक













आता तर फारच झाले
मानेच्या देठापासून तुटणारे
चेहरे मला दिसताहेत
आणि झाडांच्या फांद्यांवर
पक्ष्यांऐवजी
प्राण्यांच्या आतड्या लटकताहेत

रस्त्यांच्या दुतर्फा
लक्षावधी डोळे अंथरलेले
आणि माझ्यापुढे 
पावलांचे ठसे उमटलेले
कुणीतरी चेहरा नसलेली व्यक्ती
बेंबीत बोट घालून
माझ्याकडे धावत येतेय
आणि म्हणतेय
"पावलांवर पाऊल ठेऊ नकोस ते पुढे निघून गेलेत,
आता पुढे तुझा रस्ता नाही"

मी म्हणालो,
'ते बोट काढ आधी!'
तो म्हणाला
"नको, पोटातली भूकही निघून गेली तर
मग पोटच काय कामाचे!"
चेहरा गमावला
आता भूक नाही गमावणार..."

मी पुन्हा म्हणालो, 'हो बाजूला...'
तो म्हणाला,
"मेहेरबान आता पुढे काहीच नाही
हेच तुमचं ठिकाण."

मग मी ही गपकन थांबून
बेंबीत बोट घातलं
आणि चेहरा पकडून ठेवला
तुटू नये म्हणून...

- अशोक कोतवाल
(छायाचित्राचे कॉपीराईट : विकास खोत)   

No comments:

Post a Comment

माणगाव परिषद : बहिष्कृतांचे रणशिंग - उत्तम कांबळे

'अस्वस्थ शतकातील माणगाव परिषद ’ हा उत्तम कांबळे यांचा ग्रंथ ‘ लोकवाङ् ‌ मय गृह ’ तर्फे लवकरच वाचकांच्या भेटीसाठी येत आहे. एका ऐति...