खरंतर विदेशात अडकलेल्या ३५
हजार भारतीयांना टाळेबंदीच्या पूर्वी कोणतेही पैसे न आकारता भारतात आणले गेले. पण
या गोरगरीब, रोजंदारीवर
काम करणाऱ्या व गेले ३५ दिवस कोणताही रोजगार न मिळालेल्या कष्टकऱ्यांकडून ५००
रुपये तिकीट वसूल कारण्यात आले. या देशाचे नागरिक असलेल्या लाखो असंघटित क्षेत्रातील कामगारांची दुःखे इथेच संपली नाहीत, तर कर्नाटक राज्याने बंगलोरमधून बिहारकडे जाणाऱ्या ५ रेल्वे ऐनवेळी रद्द
केल्या. त्यामागील कहाणी कळाली तर हा निर्णय घेणारे किती निर्दयी असतील, हे दिसून येते. काही दिवसात लॉकडाऊन संपेल आणि इमारत बांधकामाला या
मजुरांचा उपयोग होईल, म्हणून या रेल्वे रद्द करण्याचा
निर्णय बिल्डर लॉबीला खूश करण्याकरिता घेतला गेला. स्वतंत्र देशाच्या नागरिक
असलेल्या कामगारांना वेठबिगारीवर असलेल्या मजुरांसारखे वागविण्यात आले.
Saturday, 16 May 2020
Saturday, 9 May 2020
कोरोना आणि क्राऊड्स : आजच्या काळासाठी बोधकथा
(शेक्सपिअरच्या
कॉरिओलेनस मधील एक प्रसंग दर्शवणारे चित्र)
|
भूकेल्या माणसांसमोर अन्य कोणताच पर्याय नसतो तेव्हा ती माणसं
सत्ता नियंत्रण करणाऱ्यांना आव्हान देतात आणि त्यातून दंगली उसळतात. सत्ताधाऱ्यांचा उद्दामपणा, निरंकुश गर्व
म्हणजेच ‘कोरोना’ आणि
सामान्य भुकेल्या माणसांचा उपमर्द केला जातो तेव्हा इतिहासात अपरिहार्यपणे मानवी
शोकांतिका घडल्याचे दिसतात. जगातील अनेक संस्कृतीत
प्राचीन काळापासून दुराभिमान आणि विनम्रता, राजसत्ता
आणि मानवी समूह यांच्यातील संघर्षावर आधारित अनेक दंतकथा आपल्यापर्यंत आलेल्या आहेत. गणपतीविषयी अशीच एक दंतकथा स्कंद पुराणात आपल्याला पहायला मिळते.
भूकेची गाथा : भूकेचा दृश्य इतिहास
भुकेने मानवी इतिहासात आतापर्यंत किती बळी घेतले असतील? साहजिकच या प्रश्नाचं स्पष्ट उत्तर देणं कदाचित शक्य नसेलही. मात्र ‘सर्वात जास्त’ हे ही एक उत्तर असू शकेल.
मानवी इतिहासात सतत-अविरतपणे माणसे कशाने मरत आली आहेत याचे मात्र एकमेव उत्तर भूक
हेच आहे. भुकेने माणूस मरणं हे कुणीच थांबवू शकलेलं नाही. आज कोरोनाने माणसं मरत
आहेत. त्यावर उपचार किंवा लस सापडली की कोरोनाने माणसं मरायचे थांबतील. पण
कोरोनाच्या टाळेबंदीतही माणसे भुकेने मरत आहेत. कोरोनानंतरही माणसं भुकेने मरत
राहतील. भुकेच्या अशा अगणित छटा सर्व कलांमध्ये अविरतपणे अभिव्यक्त
झालेल्या आहेत. कदाचित भुकेचे सर्वात जास्त प्रतिबिंब साहित्यात उमटलेलं असेल.
कोणत्याही काळात भुकेबद्दलचं साहित्य कुठल्यातरी स्वरुपात लिहिलं गेलं असेल, असा मला ठाम विश्वास आहे. अगदी तुकारामाच्या गाथेलाही तत्कालीन
दुष्काळाच्या कळा सोसाव्या लागल्याच असतील.
महात्मा फुलेंची एकमय भारत आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रबुद्ध भारत संकल्पना
कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सगळीकडे भीतीचे, असुरक्षिततेचे आणि अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झालेले आहे आणि आनंदाची गोष्ट म्हणजे या भीषण परिस्थितीचा सामना करताना आपण सगळे कमालीची एकजूटता दाखवत आहोत. कारण आपल्याला कल्पना आहे की एकजूटता दाखवल्याशिवाय आपण या संकटातून बाहेर पडूच शकत नाही. पण ही जी कोरोना विषाणूच्या भीतीपोटी आपण सध्या एकजूटता दाखवत आहोत तिला आपण महात्मा फुलेंना अभिप्रेत असलेली एकमयता मानू शकतो का?
अलगीकरण : एक भ्रम
नोबेल पारितोषिक
स्वीकारताना पाब्लो नेरुदा यांनी केलेले भाष्य..
साहित्याचा नोबेल पुरस्कार विजेता महान चिली
कवी पाब्लो नेरुदा (१२ जुलै १९०४ ते २३ सप्टेंबर १९७३) यांना अगदी लहान वयातच,
म्हणजे समज येण्याच्या उंबरठ्यावरच ‘कला
म्हणजे काय आणि माणसाला कलात्मक निर्मितीची आवश्यकता काय’
याची स्पष्ट जाणीव झाली होती. कला आणि साहित्य हे मानवी आकलन कक्षा रुंदावण्याचे
आणि सर्व सजीवांना एकत्र आणण्याचे सर्वोत्तम साधन असते; ही
त्यांची आयुष्यभराची ठाम धारणा होती.
दडपशाहीच्या पात्याने चिरलेला क्रांतीस्वर : हेलिन बोलेक
शारीर प्रेमात पडण्याच्या वयात हेलिन डाव्या विचारसरणीच्या प्रेमात पडली. संगीताची नैसर्गिक आवड आणि गाता गळा यामुळे ती योरूमच्या संपर्कात आली. सेल्मा अल्टीन, इनान अल्टीन, इब्राहीम गोस्केक, अली अराकी, बरीस युक्सेल या योरूमच्या मूळ सहकाऱ्यांना नंतर येऊन जुळलेले केमाल साहिर गुरेल, मेलीन कहरामन, हिमी यारायिया, इल्की अकाया, इफ कान सेसेन यांच्यात एक नाव जोडले गेले, ते होते हेलिन बोलेक.
Subscribe to:
Posts (Atom)
माणगाव परिषद : बहिष्कृतांचे रणशिंग - उत्तम कांबळे
'अस्वस्थ शतकातील माणगाव परिषद ’ हा उत्तम कांबळे यांचा ग्रंथ ‘ लोकवाङ् मय गृह ’ तर्फे लवकरच वाचकांच्या भेटीसाठी येत आहे. एका ऐति...
-
भाषा ही अर्थ-वहनाची इतकी विचित्र बांधणी आहे की, काही वेळा अगदी सोप्या वाटणार्या शब्दाचा नक्की अर्थ सांगण्यात नाकी-नऊ येऊ शकतात; आणि त्...
-
'अस्वस्थ शतकातील माणगाव परिषद ’ हा उत्तम कांबळे यांचा ग्रंथ ‘ लोकवाङ् मय गृह ’ तर्फे लवकरच वाचकांच्या भेटीसाठी येत आहे. एका ऐति...
-
हे वर्ष अण्णा भाऊंच्या जन्मशताब्दीचे वर्ष . म्हणजे अण्णा भाऊ जन्मून ह्या वर्षी शंभर वर्षे होतील . अण्णा भाऊंचा जन्म 1 ऑगस्ट 1920 सालचा...