Thursday, 25 June 2020

माणगाव परिषद : बहिष्कृतांचे रणशिंग - उत्तम कांबळे


'अस्वस्थ शतकातील माणगाव परिषदहा उत्तम कांबळे यांचा ग्रंथ लोकवाङ्मय गृहतर्फे लवकरच वाचकांच्या भेटीसाठी येत आहे. एका ऐतिहासिक परिषदेच्या शंभर वर्षे मागे जाऊन तिला अस्वस्थ शतकाशी जोडणारा हा ग्रंथ अतिशय महत्त्वपूर्ण आणि समाजक्रांती घडवणार्‍या असंख्य संदर्भांशी जोडला गेला आहे. ग्रंथासाठी लेखकाने लिहिलेल्या दीर्घ मनोगताचा हा सारांश..

Sunday, 21 June 2020

कोरोनानंतर काय होणार? - यान लियांके


सध्या आपण सर्वजण कोरोनामुळे धास्तावलेले आहोत. सर्व जगात कमी अधिक फरकानं हेच चित्र आहे. माणसाचं अस्तित्वच जणू पणाला लागल्याचं चित्र आहे. त्याचे सामाजिक, आर्थिक, राजकीय, मानसिक, शारीरिक, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय परिणाम होणार हे उघड आहे. पण कोरोना ही काही अशा प्रकारची पहिलीच आपत्ती नाही. अशा अनेक मानवनिर्मित आपत्ती या आधीही आलेल्या आहेतच. मग आपण त्यातून धडे का घेत नाही? त्याच-त्याच चुका आपण वारंवार का करतो? आपल्याला आधीचं काही आठवत कसं नाही? स्मृतिभ्रंश झालेल्या अवस्थेत आपण का वावरतो? अशा अनेक प्रश्नांना सामोरं जाणाऱ्या यान लियांके Yan Lianke या चिनी लेखकाच्या एका भाषणाचं ओंकार गोवर्धन यांनी केलेले हे भाषांतर..

Tuesday, 16 June 2020

कुणी घेऊ शकतंय, श्वास?

कुठल्या शब्दांत, निरर्थक शब्द वगळून, मी भारतीय म्हणून माझ्या बंधुभगिनींशी एकजूट व्यक्त करू? मिनिआपोलिस मधील तरूण आणि स्वातंत्र्यप्रिय लोक मला नाही का विचारणार की रोहित वेमुलाला आत्महत्या करावी लागली, तेव्हा सर्व भारतीय विद्यापीठांमधील विद्यार्थी व शिक्षकांनी  निषेध व्यक्त केला का? नियमित दिसणाऱ्या झुंडबळींच्या दृश्यांनी भारतभरच्या लोकांच्या काळजाचा ठाव घेतला का? दलित मुली आणि मुलांवरील झालेले बलात्कार आणि खून यामुळे सर्व भारतीय संतप्त झाले का? कोणत्या शब्दांत मी त्यांना समजावू शकेन की लाखो आदिवासींना सर्व प्रकारच्या असमानतेचा सामना करावा लागत आहे आणि तरीही भारत सहजगत्या त्याकडे कानाडोळा करतो आहे.

Saturday, 16 May 2020

भुकेल्यापोटी शहरात आले, उपाशीपोटी परत आपल्या गावी..


खरंतर विदेशात अडकलेल्या ३५ हजार भारतीयांना टाळेबंदीच्या पूर्वी कोणतेही पैसे न आकारता भारतात आणले गेले. पण या गोरगरीबरोजंदारीवर काम करणाऱ्या व गेले ३५ दिवस कोणताही रोजगार न मिळालेल्या कष्टकऱ्यांकडून ५०० रुपये तिकीट वसूल कारण्यात आले. या देशाचे नागरिक असलेल्या  लाखो असंघटित क्षेत्रातील कामगारांची दुःखे इथेच संपली नाहीततर कर्नाटक राज्याने बंगलोरमधून बिहारकडे जाणाऱ्या ५ रेल्वे ऐनवेळी रद्द केल्या. त्यामागील कहाणी कळाली तर हा निर्णय घेणारे किती निर्दयी असतीलहे दिसून येते. काही दिवसात लॉकडाऊन संपेल आणि इमारत बांधकामाला या मजुरांचा उपयोग होईलम्हणून या रेल्वे रद्द करण्याचा निर्णय बिल्डर लॉबीला खूश करण्याकरिता घेतला गेला. स्वतंत्र देशाच्या नागरिक असलेल्या कामगारांना वेठबिगारीवर असलेल्या मजुरांसारखे वागविण्यात आले.

Saturday, 9 May 2020

कोरोना आणि क्राऊड्स : आजच्या काळासाठी बोधकथा

(शेक्सपिअरच्या कॉरिओलेनस मधील एक प्रसंग दर्शवणारे चित्र)
भूकेल्या माणसांसमोर अन्य कोणताच पर्याय नसतो तेव्हा ती माणसं सत्ता नियंत्रण करणाऱ्यांना आव्हान देतात आणि त्यातून दंगली उसळतातसत्ताधाऱ्यांचा उद्दामपणानिरंकुश गर्व म्हणजेच ‘कोरोना’ आणि सामान्य भुकेल्या माणसांचा उपमर्द केला जातो तेव्हा इतिहासात अपरिहार्यपणे मानवी शोकांतिका घडल्याचे दिसतातजगातील अनेक संस्कृतीत प्राचीन काळापासून दुराभिमान आणि विनम्रताराजसत्ता आणि मानवी समूह यांच्यातील संघर्षावर आधारित अनेक दंतकथा आपल्यापर्यंत आलेल्या आहेतगणपतीविषयी अशीच एक दंतकथा स्कंद पुराणात आपल्याला पहायला मिळते.

भूकेची गाथा : भूकेचा दृश्य इतिहास


भुकेने मानवी इतिहासात आतापर्यंत किती बळी घेतले असतील? साहजिकच या प्रश्नाचं स्पष्ट उत्तर देणं कदाचित शक्य नसेलही. मात्र सर्वात जास्तहे ही एक उत्तर असू शकेल. मानवी इतिहासात सतत-अविरतपणे माणसे कशाने मरत आली आहेत याचे मात्र एकमेव उत्तर भूक हेच आहे. भुकेने माणूस मरणं हे कुणीच थांबवू शकलेलं नाही. आज कोरोनाने माणसं मरत आहेत. त्यावर उपचार किंवा लस सापडली की कोरोनाने माणसं मरायचे थांबतील. पण कोरोनाच्या टाळेबंदीतही माणसे भुकेने मरत आहेत. कोरोनानंतरही माणसं भुकेने मरत राहतील. भुकेच्या अशा अगणित छटा सर्व कलांमध्ये अविरतपणे अभिव्यक्त झालेल्या आहेत. कदाचित भुकेचे सर्वात जास्त प्रतिबिंब साहित्यात उमटलेलं असेल. कोणत्याही काळात भुकेबद्दलचं साहित्य कुठल्यातरी स्वरुपात लिहिलं गेलं असेल, असा मला ठाम विश्वास आहे. अगदी तुकारामाच्या गाथेलाही तत्कालीन दुष्काळाच्या कळा सोसाव्या लागल्याच असतील.

महात्मा फुलेंची एकमय भारत आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रबुद्ध भारत संकल्पना



कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सगळीकडे भीतीचे, असुरक्षिततेचे आणि अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झालेले आहे आणि आनंदाची गोष्ट म्हणजे या भीषण परिस्थितीचा सामना करताना आपण सगळे कमालीची एकजूटता दाखवत आहोत. कारण आपल्याला कल्पना आहे की एकजूटता दाखवल्याशिवाय आपण या संकटातून बाहेर पडूच शकत नाही. पण ही जी कोरोना विषाणूच्या भीतीपोटी आपण सध्या एकजूटता दाखवत आहोत तिला आपण महात्मा फुलेंना अभिप्रेत असलेली एकमयता मानू शकतो का?

अलगीकरण : एक भ्रम


नोबेल पारितोषिक स्वीकारताना पाब्लो नेरुदा यांनी केलेले भाष्य..

साहित्याचा नोबेल पुरस्कार विजेता महान चिली कवी पाब्लो नेरुदा (१२ जुलै १९०४ ते २३ सप्टेंबर १९७३) यांना अगदी लहान वयातच, म्हणजे समज येण्याच्या उंबरठ्यावरच कला म्हणजे काय आणि माणसाला कलात्मक निर्मितीची आवश्यकता काय याची स्पष्ट जाणीव झाली होती. कला आणि साहित्य हे मानवी आकलन कक्षा रुंदावण्याचे आणि सर्व सजीवांना एकत्र आणण्याचे सर्वोत्तम साधन असते; ही त्यांची आयुष्यभराची ठाम धारणा होती.

भूक















भूक सगळ्यात आधी मेंदू खाते 
त्याच्यानंतर डोळे 
त्यानंतर शरीरात उरलेल्या इतर गोष्टींना 
मागे काहीच सोडत नाही भूक
ती नात्यांना खाऊन टाकते 
आईचं असो बहिणीचं की मुलाचं

शहरात भूक













साध्यासाध्या गोष्टींही 
वडील खूप गूढ पद्धतीने सांगायचे 
"बेटा! या देशात लोक उपाशी मरतात 
आणि कवीही"
आम्ही हसायचो - ते नाराज व्हायचे

भूक












जेव्हा ही 
भूकेसोबत लढण्यासाठी 
कोणी उभा राहतो
सुंदर दिसू लागतो 

झडप घालणारा ससाणा 
फना काढलेला साप

भूकेचा कोरस















प्राणी असतो तर
भूक जाणवताच निघालो असतो 
पोट भरण्याच्या शोधात 
आणि कुठल्याशा एका क्षणी पोहचलो असतो तिथं 
जिथं निसर्गानं ठेवलेलं असेल माझ्यासाठी जेवण
पण माणूस आहे उपाशी 
अन् माहित नाही कुठंय माझ्या वाट्याचं अन्न 

कुठे शोधावीत त्यांनी स्वतःसह भुकेची मूळं












डोक्यावर फुटकळ  सामानांची गाठोडी घेऊन
हातावर पोट असलेल्या माणसांचे हे लोंढे
वाट मिळेल तिकडे
सैरावैरा धावत सुटले आहेत 
आपापल्या गावांच्या दिशेने
जीव वाचवण्याच्या आशेने 
आणि त्यांच्या पायातले त्राण 
तर कधीच नाहीसे झालेले.

भूक













आपल्याला जाणीव नसतेच
पण खरं तर आईच्या नाळेनेच
करून दिलेली असते
भुकेची ओळख
जी दिवसागणिक वाढतच असते
अगदी तुमच्या बरोबर

भूक













आता तर फारच झाले
मानेच्या देठापासून तुटणारे
चेहरे मला दिसताहेत
आणि झाडांच्या फांद्यांवर
पक्ष्यांऐवजी
प्राण्यांच्या आतड्या लटकताहेत

निधर्मी भूक
















पोटात भगभगती भूक 
आणि
डोळ्यांत लाचारी घेऊन
भीक मागत होता तो 
फक्त एका चतकोर भाकरीची
मात्र त्यांनी फेकली  
कोरडी धार्मिक पुस्तकं त्याच्या याचक हातांवर 

युगानुयुगाची भूक












बाई केव्हापासून काम करतेय शेतात
माथ्यावर सावलीचा ढग नाही एकही
तरीही भूक आणि भाकर
तळहातावर भाजतेय

लोकशाहीचा टेंभा मिरवणाऱ्यांनो आम्ही जगतो भूकेसाठी











लोकशाहीचा टेंभा मिरवणाऱ्यांना 
भूकबळी कशी दिसत नाही 
आमच्या घरात आम्हीच 
अजून भूकबळीत उत्सव साजरा करत जगतो 

भिक्षा












एक म्हातारी
अर्धवट जळलं लाकूड
किंवा
घाणेरड्या वस्तीच्या कुंद नालीतून
वाहत जावी एक काटकी
तशी

दडपशाहीच्या पात्याने चिरलेला क्रांतीस्वर : हेलिन बोलेक



शारीर प्रेमात पडण्याच्या वयात हेलिन डाव्या विचारसरणीच्या प्रेमात पडली. संगीताची नैसर्गिक आवड आणि गाता गळा यामुळे ती योरूमच्या संपर्कात आली. सेल्मा अल्टीन, इनान अल्टीन, इब्राहीम गोस्केक, अली अराकी, बरीस युक्सेल या योरूमच्या मूळ सहकाऱ्यांना नंतर येऊन जुळलेले केमाल साहिर गुरेल, मेलीन कहरामन, हिमी यारायिया, इल्की अकाया, इफ कान सेसेन यांच्यात एक नाव जोडले गेले, ते होते हेलिन बोलेक.

Friday, 27 March 2020

द्वेषाच्या पलीकडे...


मुस्लीम आतंकवाद हे समीकरण आता सामान्य झाले आहे. परंतु हे समीकरण मुळात असे आहे ? हे माध्यामातून रचलेले राजकीय समीकरण आहे? सर्वसमावेशक शत्रू उभा करण्याचं हे सोपं साधन आहे? याची चर्चा मात्र सामान्य पातळीवर होत नाही. अगदी तुरळक बुद्धिवादी आणि कलासक्त परिघामध्ये याबद्दल चर्चा होते, मात्र केंद्रीभूत पद्धतीने सर्वसमावेशक चर्चा होत नाही. सार्वजनिक पद्धतीने कुणी हा प्रयत्न केला तर त्याला ट्रोलकरून पाकिस्तानचे तिकीट काढून दिले जाते. मुस्लीम धार्मिक मूलतत्त्ववाद किंवा मुस्लीम कट्टरपंथी हे तर अतूट समीकरण तयार झाले आहे. जसे काही इतर धर्मात कट्टरपंथी नाहीतच. कट्टरतावाद हा आता आधुनिक जगाचा व आपल्या जगण्याचा एक भाग आहे.

या अरिष्टात गुरफटलेल्या मुस्लीम मनाच्या घुसमटीला व अवहेलनेला आपल्या साहित्यातून प्रभावीपणे मांडणारे लेखक आहेत मोहसीन हमीद. हमीद हे मूळचे पाकिस्तानी. त्यांचा जन्म लाहोरचा. पंजाबी आणि काश्मिरी आईवडिलांसोबत हमीद यांचे बालपण अमेरिका आणि पाकिस्तानमध्ये गेले. त्यांचे वडील अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठात प्राध्यापक होते. ते पाकिस्तानात परतल्यानंतर हमीदही त्यांच्यासोबत परत आले. लाहोर अमेरिकन स्कूलमध्ये त्यांनी शिक्षण घेतले.

पुढे उच्चशिक्षणासाठी ते पुन्हा अमेरिकेतील प्रिन्स्टन विद्यापीठात दाखल झाले. इथे शिक्षण घेत असतानाच त्यांनी टोनी मॉरिसन यांच्यासोबत काम करताना एक कादंबरी लिहायला सुरुवात केली होती. तेथील शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हमीद आपली पहिली कादंबरी पूर्ण करण्यासाठी पुन्हा पाकिस्तानात आले. मात्र अमेरिकेत शिक्षणासाठी घेतलेले कर्ज फेडण्यासाठी त्यांना पुन्हा अमेरिकेत काम करण्यासाठी जावे लागले. वर्षभरात काम करून तीन महिने सुट्टी घेऊन ते कादंबरी पूर्ण करण्यासाठी पुन्हा पाकिस्तानात येत होते. असं करत त्यांची पहिली कादंबरी मॉथ स्मोक 2000 मध्ये प्रकाशित झाली. त्यानंतर पुढची काही वर्ष त्यांनी न्यूयॉर्क व लंडन येथे जाहिरात क्षेत्रात नोकरी केली. मात्र कादंबरी लिहिण्यासाठी ते पुन्हा पुन्हा पाकिस्तानात येत राहिले. 2007 साली त्यांची द रिलॅक्टंट फंडामेंटलिस्टही कादंबरी प्रकाशित झाली. अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या या कादंबरीच्या एका वर्षात दहा लाखांपेक्षा जास्त प्रती विकल्या गेल्या व मॅन बुकरसाठीही नामांकन मिळाले. हमीद यांच्या जवळपास सर्व कादंबर्‍यांची मुख्य पात्र मुस्लीम आहेत व त्यातील बरीचशी पाकिस्तानी आहेत. पश्‍चिमी सभ्यता आणि पूर्वेची संस्कृती या पोकळीत जगणारी ही माणसं.

त्यांच्याकडे मात्र कुणी माणूस म्हणून बघायला तयार नाही. पश्‍चिमी जगतासाठी ती मुस्लीम आहेत आणि म्हणून संशयित आतंकवादी आहेत.  तर ही कादंबरी मीरा नायर या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या चित्रपट दिग्दर्शिकेच्या वाचनात आली. त्यांनी या कादंबरीवर चित्रपट बनवण्याचे ठरवले व हमीद यांना संपर्क केला. हमीद मीरा नायर यांच्या चित्रपटाचे चाहते असल्याने त्यांनी लगेच होकार दिला. मात्र हा चित्रपट तयार होणे ही खूप मोठी अडथळ्याची शर्यत होती. पहिलं मोठं काम होतं कादंबरीचे चित्रपटाच्या पटकथेत रूपांतर करणं. कादंबरीचे कथानक खूप नाजूक होतं. एक पाकिस्तानी तरुण आपल्या स्वप्नांचा पाठलाग करत अमेरिकेत जातो. तिथे उच्च शिक्षण घेतो. न्यूयॉर्कमध्ये एक मोठ्या कंपनीत मोठ्या पगाराच्या पदावर पोहोचतो. जग जिंकल्याच्या आविर्भावात असताना नऊ अकराला वर्ल्ड ट्रेड सेंटरवरचा हमला होतो.

या घटनेने त्याचं आयुष्य उद्ध्वस्त होतं व तो पाकिस्तानात परत येतो. इथे एका रेस्टॉरंटमध्ये बसून एका गुमनाम अमेरिकन व्यक्तीला तो आपली कथा सांगतोय अशा आशयाची कादंबरी. इथे चहा पीत पीत घडणारं संभाषण हीच संपूर्ण कादंबरी आहे. मात्र चित्रपटासाठी ही पटकथा होऊ शकत नव्हती. हमीद यांना सुरुवातीला सोबत घेऊन अनेक बदल कथेत केले गेले. दोन स्वतंत्र पटकथा लेखक नेमले गेले.  त्यांनी मिळून पटकथा लिहून पूर्ण केली. मात्र त्यांना यासाठी तीन वर्षे लागली. मूळ कादंबरी लिखाणापेक्षा हा वेळ जास्त होता. इतर अनेक कारणांसाठी हा चित्रपट बनवणे कठीण होते.

अमेरिकेचे वर्चस्व असलेल्या पश्‍चिम आणि उर्वरित जग अशा दोन संशयास्पद जगातील वैचारिक संघर्ष मांडणारा हा चित्रपट प्रेक्षकांना कितपत रुचेल हा एक भाग. दुसरे म्हणजे पाकिस्तानी नायक आणि  द्वेष, परकेपणा, अर्थहीनपणा आणि अर्थातच, सभ्यतेचा संघर्ष अशा काही गंभीर सामाजिक समस्यांकडे लक्ष देणार्‍या चित्रपटासाठी कोण पैसे गुंतवणार. दुसरा प्रश्‍न चित्रपट पूर्ण करण्यासाठी अधिक महत्त्वाचा होतं. चित्रपटातील कथेचा नायक पाकिस्तानी मुस्लीम तरुण ही कल्पनाच कुणाला ऐकायची नव्हती. पाकिस्तानात जाऊन शूटिंग करायला कुणीही तयार होत नव्हते. मात्र नायर यांना अशा लोकांनाच आरसा दाखवायचा होता. मात्र कुणीही पैसा गुंतवायला तयार नसल्यामुळे हा चित्रपट तयार होतो की नाही असे नायर यांना वाटायला लागले होते. शेवटी त्यांच्या प्रयत्नांना यश आले व कतारमधील दोहा फिल्म इन्स्टिट्यूटने या चित्रपटासाठीची संपूर्ण गुंतवणूक केली. पाकिस्तानऐवजी भारतात दिल्लीमध्ये लाहोरचे शूटिंग पूर्ण केले गेले.

चित्रपटात मात्र हे ओळखायलाही येत नाही एवढे साम्य या दोन शहरांत आहे. असे करत साधारण साडेपाच वर्षांनंतर चित्रपट पूर्ण झाला. कादंबरीला वाचकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. जगभरातील जवळपास सत्तरेक भाषांमध्ये भाषांतरित झालेल्या या कादंबरीवरच्या चित्रपटाला मात्र प्रेक्षकांचा काहीच प्रतिसाद मिळाला नाही. समीक्षकांनी तेवढी या चित्रपटाची प्रशंसा केली.

चित्रपटाच्या पटकथेसाठी मूळ कादंबरीच्या कथेत खूप बदल करण्यात आले. कथेचा नायक चंगेज खान कुणाला आपली कथा सांगतोय हे मूळ कथेत गोपनीय आहे. चित्रपटात हे दाखवणे शक्य नव्हते. त्यासाठी अमेरिकी गुप्तचर संस्था सीआयएचा एक एजंट पत्रकार बनून चंगेजला भेटायला येतो व त्या दोघांमधील संवादामध्ये संपूर्ण चित्रपटाचे कथानक घडते. खरे तर अमेरिकेचा मुस्लीम द्वेष किती निरर्थक आहे हेच मूळ कथाबीज आणि तेच एक अमेरिकन एजंटला सागितले जातंय. चंगेज खानची कादंबरीतील कथा तो अमेरिकेतील गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून पाकिस्तानात परत येतो इथेच संपते. चित्रपटाची कथा मात्र तो पुढे पाकिस्तानी तरुणांचा आवाज बनतो इथपर्यंत पुढे जाते. चंगेज खानची प्रेमकहाणी चित्रपटाचा बराच भाग व्यापते. मात्र तरीही मुस्लीम आणि गैरमुस्लीम या संघर्षाची जी जाणीव चित्रपट करून देतो ती खूप अस्वस्थ करणारी आहे. या पलीकडच्या म्हणजे दुसर्‍या बाजूचा विचार आपण कधी केलेला नसतो. ही दुसरी बाजू जाणून वा समजून घेण्यासाठी हा चित्रपट खूप महत्त्वाचा आहे. या जाणिवेचे भान हेच कादंबरीच्या कथेच्या मुळाशी आहे.

लाहोर विद्यापीठातून एका प्राध्यापकाचे (अमेरिकी) अपहरण केले गेले आहे. याच विद्यापीठातील तरुण प्राध्यापक चंगेज खान या तरुणाकडे सीआयए संशयित म्हणून बघत आहे. सीआयएचा एक एजंट पत्रकार बनून चंगेज खानला भेटायला एका हॉटेलसारख्या टी हाऊसमध्ये आलाय. इथे त्या दोघांचा संवाद सुरू होतो. या संवादातूनच चंगेज खान त्याची आपबिती सांगतोय. चंगेजने अमेरिकेतील प्रिन्स्टन विद्यापीठातून पदवी घेऊन एका वित्तीय कंपनीत कामाला सुरुवात केली आहे इथपासून तो आपली गोष्ट सांगतोय. त्याचे काम चांगले सुरू आहे. मोठी कंपनी, मोठे काम, मोठा पगार, मस्त मौज मजा असं सगळं व्यवस्थित चालू आहे. ही संधी त्याला अमेरिकेतच मिळू शकते. तिथे माणसांच्या ज्ञानाची, कौशल्याची व कामाची किंमत केली जाते. यासाठी तो अमेरिकेच्या प्रेमात आहे. असंच एक दिवस न्यूयॉर्कच्या सेंट्रल पार्कमध्ये फिरताना त्याची ओळख एका फोटोग्राफर तरुणीशी होते. तिचे नाव इरिका. ती अमेरिकेचे प्रतीक आहे.

अमेरिकेच्या स्पेलिंगमधले  स् काढले की तिचे नाव राहते ते र्िंग्म्. ती कलाकार आहे. तिच्या पुढच्या भेटींमध्ये चंगेज तिच्या प्रेमात पडतो. अगदी कमी दिवसांत चांगले काम करून चंगेज आपल्या बॉसला खूश करतो, बदल्यात त्याला बॉस मोठ्या पदावर बढती देतो. चंगेज याबद्दल स्वत:वर खूप खूश आहे. याच आनंदात तो टीव्ही सुरू करतो. त्याला वर्ल्ड ट्रेड सेंटरवर झालेल्या हल्ल्याची बातमी दिसते. ती दृश्य बघून तो अचंबित होतो. दुसर्‍या दिवशी विमानतळावर पाकिस्तानी मुस्लीम आहे म्हणून त्याची तपासणी केली जाते. संपूर्ण नग्न करून त्याची तपासणी घेतली जाते. इथे पहिल्यांदा त्याला अमेरिकेचे वेगळे रूप दिसते. फक्त मुस्लीम आहे म्हणून त्याची ही अवहेलना झालेली आहे हे वास्तव त्याला अस्वस्थ करतं.

त्याच्या ऑफिसमध्ये सर्व सहकारी मुस्लिमांबद्दल द्वेषाने बोलत आहेत ते चंगेजला ऐकून नकोसं होतं. अमेरिकेत अचानक देशभक्तीला आलेलं उधाण पाहून तो अचंबित होतो. असंच एक दिवस पार्किंगमधील त्याच्या कारची चारही चाकाची हवा सोडून देऊन एक अमेरिकी नागरिक त्याच्यावर थुंकतो. इरिका तो वेगळाच माणूस आहे असं म्हणून त्याला झिडकारते. काही दिवसांनंतर एक दिवस अचानक ऑफिससमोरील रस्त्यावर चालत असताना पोलीस चंगेजला अटक करून कोठडीत टाकतात. त्याला अफगाणिस्तानात ट्रेनिंग घेतले का विचारतात. खूप प्रश्‍न विचारून त्याला वैतागून सोडतात. नंतर सोडून देतात. त्यानंतर तो इरिकाने केलेल्या एका कला प्रदर्शनाला भेट देतो. ते बघून इरिकाने त्याच्या पाकिस्तानी मुस्लीम असण्याचा कलात्मकबाजार मांडला असे त्याला वाटते. तिच्यासोबत भांडण करून तो तिथून बाहेर पडतो. पुढे एका कामानिमित्ताने इस्तंबूल शहरातील एका प्रकाशन संस्थेच्या कामासाठी जातो. तेथील प्रकाशक त्याला त्याच्याच वडिलाच्या कवितांचे तुर्की भाषेत अनुवादित केलेले पुस्तक देतो. दुपारच्या जेवणासोबतच्या गप्पांमध्ये त्याला एक गोष्ट सांगतो, ती गोष्ट चंगेजच्या सर्व अस्वस्थ प्रश्‍नांचे उत्तर देते. त्याच क्षणाला चंगेज आपली नोकरी सोडतो.

परत पाकिस्तानात येतो आणि लाहोर विद्यापीठात प्राध्यापक म्हणून रुजू होतो. तिथे तो नव्या पाकिस्तानच्या स्वप्नांविषयी बोलतो. विद्यार्थ्यांना व इतरही तरुणांना ते आवडायला लागतं. तो अल्पावधीतच त्यांचा आवाज बनतो. हा चंगेज पाकिस्तानात परत आल्यानंतर घडणारा कथानकाचा भाग चित्रपटात आहे, मात्र मूळ कथेत नाही. चंगेज पाकिस्तानात परत आला इथेच कादंबरी संपते. कादंबरी अशी अचानक व गूढ वळणावर संपते. चित्रपट मात्र चंगेज आपली भूमिका मांडून झाल्यावर संपतो. बोल की सच जिंदा है... बोल की लाब आझाद है तेरे... या फैज अहमद फैज यांच्या शब्दांनी चित्रपट संपतो...

नऊ अकराच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील हमाल्यानंतर जग दोन भागांत विभागलं. तुम्ही एकतर अमेरिकेच्या बाजूचे किंवा विरोधातले. धाकल्या बुश यांची ही करामत. वॉर ऑन टेररया आवेशात अमेरिकेने किती निष्पाप अफगाणिस्तानी मारले असतील याची गणतीच नाही. हीच बाब इराण, इराक यांच्याबाबतीतही. थोडे मागे गेल्यास व्हिएतमान वगैरे बरेच काही सापडायला लागेल. आतापर्यंत आतंकवाद्यांपेक्षा जास्त माणसे अमेरिकेने वेगवेगळ्या युद्धात व मोहिमेत नक्कीच मारली असतील. पण कुणी अमेरिकेला आतंकवादी म्हणत नाही. उलट त्याविरोधात लढण्याचा मक्ता जगाने त्यांना दिलाय. आता तर ट्रम्प याचं मुस्लिमांना अमेरिकेत यायला बंदी घालायचं चाललंय. त्याच काळात हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने अमेरिकन वृत्तीसमोर आरसा धरला पण त्यात बघायला कुणी तयारच नाही.

राजकारणाचा हा सोपा मार्ग पुढे इतर सर्वांनी स्वीकारला. आता मुस्लीम द्वेष ही एक सामान्य बाब झाली आहे. आतंकवादाचा बागुलबुवा उभा करून, लोकांमध्ये भय व असुरक्षितता निर्माण करून सत्ता मिळवणे हा आता सोपा खेळ झालय. त्यासाठी मुस्लीम आतंकवादी आहेत असे लोकांच्या मनावर बिंबवत राहणे एवढेच पुरेसे आहे. या कारस्थानाला मुस्लीमही बळी पडत अजून हिंसक मार्ग स्वीकारत आहेत. यामुळे हा अरिष्टाचा फेरा तुटायला तयार नाही. हा फेरा कसा तोडायचा याचे उत्तर चित्रपटाच्या शेवटी चंगेज खान देतो. मात्र ते करण्यासाठी खूप हिंमत, शक्ती आणि शांतता असावी लागणार आहे. ती आपल्याकडे नाही. आपल्याकडे उतावीळ वाचाळवीर फार आहेत.  त्यामुळे आपणही या फेर्‍यात पुरते अडकलोय. दिल्लीतील हिंसाचार हे त्याचे ताजे उदाहरण. शाहीन बाग आंदोलनातील कुणाचे काही ऐकण्याची गरज आपल्याला वाटत नाही. जेएनयू व जामियामध्ये नक्की काय घडलं याच्याशी आपल्याला काही देणंघेणं राहिलेलं नाही. आपल्याच माणसांबद्दलचा हा बेदरकारपणा आणि द्वेष आपल्याला कुठे घेऊन जाईल माहीत नाही. आपल्या मुलांसाठी आपण काय भविष्य ठेवून जाणार आहोत याचे उत्तर आपण द्यायला हवे...!
- संदीप गिर्‍हे

Friday, 20 March 2020

मॉब्ज, मोबाईल्स आणि दडपलेल्या स्मृती

इंग्रजी भाषेच्या क्षितिजावरजमाव’ (मॉब्ज) या शब्दाचा उदय सतराव्या शतकाच्या शेवटी झालेला आढळतो. सुरवातीच्या काळात याचमॉबशब्दाचा वापर विविध शब्दांना पर्यायी शब्द म्हणून केला गेला. आजच्या सत्योत्तरी काळात याचमॉबशब्दाचा वापर अनेक अर्थाने बदलत गेला. त्या अर्थच्छटांची आजच्या काळातील अर्थांशी तुलना करायची झाली तरशब्दार्थ उगम शास्त्रसांगणारे एखादे छोटे पुस्तकच लिहावे लागेल! फ्रेंन्च राज्यक्रांती आणि त्यानंतरच्या संपूर्ण एकोणिसाव्या शतकाच्या काळातमॉबशब्द सामाजिक अपराधाच्या वर्णनांतील एक अचूक अर्थवाही शब्द म्हणून वापरला गेला. त्यानंतरच्या सुमारे अर्ध्या शतकानंतर मॉब या शब्दातून व्यक्त होणार्या माणसांच्या संमिश्र समूहाचीमानवीबाजू लक्षात घेतली जाऊ लागली. हे कधी घडले? तर कोणत्याही सामाजिक क्रांतीची सुरुवात माणसांत जागृती करून त्यांना सामाजिक हालचालींसाठी प्रेरित करणे, ‘मोबिलायजेशनकरणे, ही पहिली पायरी आहे, असा सकारात्मक अर्थ मॉब शब्दाला राजकीय परिभाषेत प्राप्त झाला तेंव्हा. त्याही पुढे जाऊनमॉबया शब्दाला आणखी सहानुभूती मिळाली तीमोबाइलम्हणजे हलता/फिरता अशीयांत्रिक स्थितीदर्शविण्यासाठी पोषक शब्द म्हणून याचा वापर सुरू झाला तेव्हा. म्हणजेमॉबसमूह म्हणजे माणसांचा जमाव असेल, तरमोबाइलया शब्दाचा अर्थ हलता/फिरता किंवा वाहता असा घेतला जात असला तरी त्यालापूर्णपणे यांत्रिक व्यवस्थाअसे अर्थांचे परिमाण आहे.
मोबाइलशब्द प्रत्येक वेळी यंत्रप्रणीत वाहन/गाडी अशा अर्थाने वापरला जात नसला तरी त्यातूनगतिमानता गुंफलेली कृतीअसा अर्थ मुख्यत: व्यक्त होत असे. एका अर्थाने संपूर्ण विसाव्या शतकात मॉब्ज (जमाव) आणिमोबाइल्सहे शब्द परस्पर विरुद्ध आशय व्यक्त करण्यासाठी वापरले गेले. सध्या हे दोन्ही शब्द आधुनिक इतिहासाच्या केंद्रस्थानी विराजमान झालेले दिसतात.
सामाजिक/राजकीय क्रांती घडताना यामॉब्जनी (माणसांचे समूह) निर्णायक भूमिका बजावली तर औद्योगिक क्रांती घडताना गतीमान लोखंडी यंत्रांनी महत्त्वाचे स्थान प्राप्त केले. मोबिलिटी किंवा गतिमानता, मग ती मानवप्रणित असो वा यंत्र-प्रणीत असो ही गतिमानताच, आजच्या आधुनिकतेच्या केंद्रस्थानी आहे. विसाव्या शतकातमॉब्जम्हणजे माणसांचा समूह सामाजिक किंवा सांस्कृतिक स्मृतीत हिणकस समुह असा नोंदला गेला. मॉब किंवा समूह म्हणजे श्रीमंत नसलेली, उच्चजातीची नसलेली, राजघराण्यातील नसलेली सामान्य माणसं!
औद्योगिक क्रांतीच्या भट्टीतून तावून सुलाखून निघालेल्या मोबाइल्सना म्हणजेच यंत्रप्रणालींना स्वत:ची अशी सांगण्याजोगी स्मृती नसते; परंतु स्मृती म्हणजे काही शरीराचा एखादा दाखवण्यासारखा असा मेंदूचा भाग नसतो. स्मृती ही मानवी मेंदूचा एक अविभाज्य हिस्सा असते. मानवी उत्क्रांतीत माणसाने आत्मसात केलेली ती एक प्रक्रिया असते. विसाव्या शतकाच्या अखेरीला आजच्या होमो-सेपियन्सनी एक सामूहिक पण मूक असा निर्णय घेतलेला दिसतोय. तो म्हणजे, स्मृतींचे संश्लेषण करून ती साठवणे आणि आवश्यकतेनुसार पुनर्निमिती करणे यासाठी माणसांनीश्रमकरणे तितकंसं श्रेयस्कर नाही! ही सर्व किचकट कामे माणसाने बुद्धिमान यंत्रे आणि कृत्रिम माहिती संग्रहकचिप्सवर सोपविण्यास सुरुवात केली. आता या चिप्सनी स्मृती साठवण्यास सुरुवात केली आणि मोबाइल्स (भ्रमणध्वनी यंत्र) ही माहिती संग्रहालय म्हणून काम करू लागली. आधीच्या शतकात त्या माणसांनीच स्वत:च्या स्वातंत्र्य, समता, मानवी प्रतिष्ठा आणि हक्कांसाठी महत्त्वाचे लढे केले होते; पण त्या लढ्यांच्या स्मृती नष्ट झालेले हे मानवी समूहमॉब्जआता यंत्रासारखे वागू लागलेत आणि मोबाइल्स जणू मॉब्जसारखे महत्त्वाकांक्षी होऊ लागलेत! हे दोन्ही घटक आता मानवी स्मृति नव्याने घडवू लागलेत.
आजच्या एकविसाव्या शतकातील जाणत्या माणसांसाठी (होमो-सेपियन्सना) स्मृतीचा फारसा उपयोग उरलेला नाही. आता हे होमो सेपियन्स सतत आपल्या भविष्याच्या विचाराने उत्तेजित होतात. त्यांचे क्रेडिट कार्ड किती सुस्थितीत आहे आणि आपल्या संभाव्य आमदनीचा वापर आपण कसा करू शकतो यावर त्यांचे आनंद आणि समाधान अवलंबून असते. पृथ्वीच्या सुरक्षित भविष्यासाठी राखून ठेवलेल्या सर्व नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर करण्यापुरते होमोसेपियन्सचे पृथ्वीशी नाते उरले आहे. आपण आजवर कसे जगलो याचा विचार करणे त्यांना पसंत नाही. तर यापुढे किती दीर्घकाळ आपण जगणार आहोत याचाच फक्त विचार करणे त्यांना आवडते. अशा या नव्या मानवी प्रजातीचा उल्लेखसायबोर्ग्जकिंवाहोमो ड्युअस्अशा शब्दात केला जातो. या प्रजातीलास्मृतीचा फारसा उपयोग नसतो. छोनछोकीन लाडावलेल्या 69व्या शतकातल्या कलाकारांना वाटायचं, जगणं.. ते तर नोकरही जगतात! अशाप्रकारे विचार करणारी मंडळी काहीशा बेजबाबदारपणे असं गृहीत धरतात की, ‘स्मृतीम्हणजे ती पूर्वी असायची. त्या वेळी स्मृती गरजेची होती; आता मानवाला स्मृतीचा काहीच उपयोग नाही.
मोबाइल्स आणि मल्टी-टास्कड (बहुद्देशीय) टॅबलेट्स अशी साधनं आपल्यासमोर खोटी आशा निर्माण करणारे जग उभे करतात. ही साधनं आपल्यातर्फे खरेदी-विक्रीचे व्यवहार करतात, आपल्या भावना इतरांपर्यंत पोहोचवतात. माणसांसाठी अत्यंत अपरिचित वाटावी अशी नवी काल्पनिक विश्व उघडतात. माणसांची आयुष्यस्थिर फोटोग्राफीमार्फत जणू गोठवून टाकतात. ही साधने आता माणसांसाठी विचार करू शकतात आणि निराश-हताश माणसांनासेल्फीकाढण्याची संधी देऊन त्यांची सांत्वनाही करतात. थोडक्यात सांगायचं तर माणसाचं माणूसपण सिद्ध करणारी बहुतांश कामे आता मोबाइल्स आणि टॅबलेट्स करू लागले आहेत. एवढेच नाही तर या साधनांना माणसांपेक्षा आणखी एक वेगळी शक्ती प्राप्त झाली आहे. ती म्हणजे ही साधने क्षणार्धांत अतिदूर संपर्क-संवाद साधू शकतात.
मोबाइल्स आता मानवी स्मृतींची साठवण करू लागले आहेत आणि माणसानं ते काम सोडून दिले आहे. परिणामी याच मानवी समूहांनी गेल्या शतकात निर्माण केलेली शासने आता माणसांची स्मृति पूर्णांशाने पुसून टाकण्याच्या कामाला लागली आहेत. आजची सत्ताधारी शासने मोबाइलधारक ट्रोल्सची फौज बाळगतात. आपल्याच नागरिकांच्या स्मृतींत आपल्याला अनुकूल बदल घडवण्यात ती आज दंग आहेत. लोकांनी वास्तविक इतिहास विसरून जावा आणि सत्ताधार्यांना अनुकूल विकृत इतिहास मान्य करावा यासाठी प्रयत्नशील आहेत. ही मोबाइलसज्ज फौज आपल्याला सांगते की, गांधींनी भारताची फाळणी केली. मोबाइल फौज आम्हाला सांगते की, गोडसे ही एकमहान विभूतीहोती, पंडित नेहरू भारतीयांचे शत्रू होते. इतकंच नाही तर ही मंडळी आपल्याला असंही सांगतात की, आमच्या प्राचीन भारतात प्लॅस्टिक सर्जरीचे तंत्रज्ञान विकसित झाले होते आणि उंच उडणारी विमाने उत्पादित केली जात होती. आपल्या प्राचीन भारतातील अशा आजवर आपल्याला माहीत नसलेल्या अनेक मनोरंजक गोष्टी ते आपल्याला सांगतात. पण एवढचं नाही तर आपल्या अवतीभोवती छान, सुंदर कामं त्यांनी घडवलीत आणि त्यांच्या वैचारिक तत्त्वज्ञानाच्या प्रभावाने पावन झाल्यामुळे कशी वेगवान प्रगती देशात घडत आहे, अशा माहितीचा अखंड वर्षाव ते करत रहातात. त्यासाठी ते आंतरराष्ट्रीय मानांकन संस्थांचे अनेक उत्तमोत्तम ताजे अहवाल अक्षरश: शून्यातून निर्माण करतात. त्यातून त्यांनी साध्य केलेल्या दैदिप्यमान यशाची माहिती मिळते. त्यातून तथ्य, काल्पनिक तथ्य आणि भीती अशा घटकांचे एक अद्वितीयकॉकटेलतयार होते. म्हणजे आता माणसांच्या समूहांना काही आठवणारच नाही आणि त्यांना काही आठवले तरी मोबाइल्स अशा स्मरणाचे सुख मिळू देणार नाहीत. असे मॉब्ज आता सरकारची धोरणे ठरवत आहेत. न्यायपालीकेंचे निर्णय ठरवत आहेत. ते आता नागरीक आहेत. इतर सारे देशद्रोही.
सार्वकालिक महान जर्मन लेखक हेन्रिक हाईन याने कायमचे लक्षात राहील असे एक धक्कादायक वाक्य लिहिलं आहे. तो लिहितो, ‘ही तर केवळ नांदी होती; ते आत्ता पुस्तकं जाळतायत, शेवटी ते लोकांनाही जाळणारेत.’ मे, 1933 मध्ये नाझी विद्यार्थी संघ, एसएस आणि हिटलर युथ या संघटनांनी मारिया रिमार्क, कार्ल मार्क्स, अल्बर्ट आइन्स्टाईन आणि अन्य अनेक लेखकांच्या पुस्तकांची जाहीरपणे होळी केली होती. त्यांनी बर्लिनमधील बेबलप्लाझ या ठिकाणी सुमारे 20,000 पुस्तकं जाळली होती. या पुस्तकातून त्यांना मान्य नसणारे विचार आणि भूमिका मांडण्यात आले होते; म्हणून पुस्तकं जाळण्यात आली होती. हाईन याने या भीषण घटनेवर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली होती.
जोसेफ स्टालिनच्या राजवटीत अलेक्झांडर सोल्झेनित्सिनवर त्याने आक्रमक संघटना स्थापन केल्याचा आरोप करण्यात आला. त्यासाठी त्याला लुबयन्का तुरुंगात टाकण्यात आले. दुसरे महायुद्ध समाप्त होत असतानाच फेब्रुवारी, 1945 सालात घडलेली ही घटना. तो या महायुद्धात रशियाचा एक सैनिक म्हणून लढला होता; पण त्याला या महायुद्धातील विजयाचा उत्सव त्याच्या तुरुंगाच्या कोठडीच्या खिडकीतून स्वत:चा जीव धोक्यात घालून बघावा लागला होता. नंतर पुढे त्याला त्याच्या गाजलेल्याद गुलाग अर्केपॅलिगोया कलाकृतीसाठी एकांत कोठडीत पाठविण्यात आले. आपल्याला जे दिसतंय तेच लिहिले म्हणून तुरुंगात टाकल्या गेलेल्या असंख्य लेखकांपैकी सोल्झेनित्सिन हा एक होता.
काही महिन्यापूर्वी कोलकात्यात ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या पुतळ्याची तोडफोड करण्यात आली. माझ्या मते ही घटना आपणवैचारिक विविधता आणि विरोधी मतांबाबत असहिष्णू होत असल्याचे लक्षण आहे. आपल्या देशातील बदलत्या आर्थिक धोरणाच्या नव्या चौकटीमुळे आपली मनोभूमिका आणि लोकशाही संकल्पना किती बदलली आहे याचे द्योतक आहे. एका अर्थी ही एक अत्यंत लक्षणीय ऐतिहासिक घटना आहे. एकोणिसाव्या शतकातील भारतातील आधुनिक वैचारिक पुनरुत्थानाची सुरुवात बंगालमध्ये झाली होती.
भारतातील प्रभावी बुद्धिवादी मध्यमवर्गाचा उदय एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस बंगालमध्ये झाला होता. 1960च्या दशकात याच बंगालमध्ये अति डाव्या विचारप्रवाहाचाही उगम झाला होता आणि याच बंगालमध्ये या शतकाच्या आरंभी डाव्या विचारप्रवाहाची पीछेहाटही सुरू झाली. या पार्श्वभूमीवर ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या पुतळ्याची मोडतोड बघायला हवी. ही घटना म्हणजे भारतात उजव्या विचारसरणीने राजकीय पटलावर मध्यवर्ती स्थान मिळवल्याचे आणि हिंसेच्या तत्त्वज्ञानाची द्वाही आहे, हे लक्षात घ्यायला हवे. मे 2019 मधील या घटनेची इतिहासतज्ज्ञांना यापुढील अनेक वर्षे दखल घ्यावी लागेल. हाईनचे लिखाण परत वाचणे म्हणूनच मनोवेधक ठरावे.
- गणेश देवी
(सुप्रसिद्ध भाषातज्ज्ञ व विचारवंत गणेश देवी यांच्या ‘आपले वाड्‌मय वृत्त’ मासिकात प्रसिद्ध झालेल्या लेखमालेचे पुस्तक लवकरच…)