बाई केव्हापासून काम करतेय शेतात
माथ्यावर सावलीचा
ढग नाही एकही
तरीही भूक आणि भाकर
बाई केव्हापासून
पाणी आणतेय घरात
अनवाणी पायांनी
मैलोनमैल चालून
विहीरीपासून तहान
तळहातावर भागवतेय
बाई केव्हापासून
राबतेय घरात
दारिद्रयाला लिंपून
फाटक्या पदरात
चूल आणि मूल
तळहातावर सजवतेय
बाई जपतेय भूक
बाई भागवतेय तहान
बाई सजवतेय चूल
बाई वाढवतेय मूल
चूल सजली
तहान भागली
मूल वाढले
भूक वाढली
गेले परदेशी
युगानुयुगाच्या
या खेळी
बाई पडली फशी
- स्नेहा
राणे, ठाणे
(छायाचित्राचे कॉपीराईट : विकास खोत)
(छायाचित्राचे कॉपीराईट : विकास खोत)
No comments:
Post a Comment