पोटात भगभगती भूक
आणि
डोळ्यांत लाचारी
घेऊन
भीक मागत होता तो
फक्त एका चतकोर
भाकरीची
मात्र त्यांनी
फेकली
मग गुमान भूक गिळून
तो पलटू लागला पानं
त्या बेचव
पुस्तकांची
ज्यात सापडले नाहीत
त्याला भूक शमवणारे
चवदार शब्द
शेवटी पुस्तके
धुंडाळून
झोपी गेला
आपली निधर्मी भूक
गिळून,
आणखी एक भुकेला
दिवस पोटात ठेवून
आणि
पुस्तकी धर्म उशाला
घेऊन!
- रमेश
नागेश सावंत
(छायाचित्राचे कॉपीराईट : विकास खोत)
(छायाचित्राचे कॉपीराईट : विकास खोत)
No comments:
Post a Comment