Saturday, 9 May 2020

कोरोना आणि क्राऊड्स : आजच्या काळासाठी बोधकथा

(शेक्सपिअरच्या कॉरिओलेनस मधील एक प्रसंग दर्शवणारे चित्र)
भूकेल्या माणसांसमोर अन्य कोणताच पर्याय नसतो तेव्हा ती माणसं सत्ता नियंत्रण करणाऱ्यांना आव्हान देतात आणि त्यातून दंगली उसळतातसत्ताधाऱ्यांचा उद्दामपणानिरंकुश गर्व म्हणजेच ‘कोरोना’ आणि सामान्य भुकेल्या माणसांचा उपमर्द केला जातो तेव्हा इतिहासात अपरिहार्यपणे मानवी शोकांतिका घडल्याचे दिसतातजगातील अनेक संस्कृतीत प्राचीन काळापासून दुराभिमान आणि विनम्रताराजसत्ता आणि मानवी समूह यांच्यातील संघर्षावर आधारित अनेक दंतकथा आपल्यापर्यंत आलेल्या आहेतगणपतीविषयी अशीच एक दंतकथा स्कंद पुराणात आपल्याला पहायला मिळते.

सन 1608 मध्ये विल्यम हॉकिन्स आपल्या हेक्टर या जहाजातून सुरत येथे भारताच्या किनाऱ्यावर उतरला आणि त्यांनी ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केलीत्याचवर्षी या घटनेशी दुरान्वयाने संबंध नसलेली आणखी एक घटना विल्यम हॉकिन्सच्या मायदेशातइंग्लंडमध्ये घडली होतीती म्हणजे विल्यम शेक्सपियरनी आपल्या नाट्यलेखनातील अखेरची शोकांतिका “कॉरिओलेनस” लिहिली होतीहे नाटक इसवी सनाच्या पहिल्या शतकातील एक रोमन लष्करी सेनापती काईस मार्कीस याच्या जीवनकथेवर आधारित आहे.

या सेनापतीने कॉरिअली हे व्हॉलशियन शहर काबीज करण्यासाठी झालेल्या अत्यंत बिकट लढाईत बजावलेल्या अतुलनीय शौर्यासाठी त्याला “कॉरिओलेनस” ही सन्मानदर्शक उपाधी बहाल केली गेलीअसा इतिहास आहेत्या शहरातील प्रचंड झगमगाटी संपत्तीवरुन त्या शहराचे नाव कॉरोली पडलेक्राऊन म्हणजे मुकूट किंवा ‘ताज’. क्राऊन या इंग्रजी शब्दाला लॅटिन प्रतिशब्द आहे ‘कोरोना’.

या नाटकाची कथा आहे अहंकारग्रस्तपूर्वग्रहदूषित कॉरिओलेनसच्या ऱ्हासाचीनाटकाचा पडदा उघडतो तेव्हा प्रेक्षकांसमोर रंगमंचावर अन्नासाठी दंगली सुरू असतातभुकेल्या माणसांचे तांडे अन्नाची कोठारं खुली करण्याची मागणी करत असतातत्यांचा असा समज असतोकी कॉरिओलेनसच्या आदेशाने अन्नाची कोठारांची टाळेबंदी करण्यात आली आहेकॉरिओलेनस या भुकेल्या माणसांना तुच्छतेने वागवतोयातून एका वादाला तोंड फुटतेखरा देशभक्त कोण? ‘कोरोना’ की सामान्य माणसांचे तांडेकॉरिओलेनसच्या या शोकांतिकेच्या मुळाशी असतो निरंकुश गर्व.


शेक्सपिअरच्या या लेखनाची प्रेरणा म्हणजे सन 1585 पासून सतत सुरू असलेल्या आणि इंग्लंडला हादरवून टाकणाऱ्या अन्नासाठीच्या दंगली असाव्यात असे दिसतेअन्नासाठी होणाऱ्या दंगली हेच कारण इस्ट इंडिया कंपनीच्या स्थापनेमागेही होतंत्या काळापासून जगभरात अनेक ठिकाणी अन्नासाठी भूकेल्या माणसांच्या दंगली सतत घडलेल्या दिसतातसन 1710 साली झालेल्या बोस्टन ब्रेड दंगली ही अमेरिकेच्या इतिहासाला वळण देणारी ऐतिहासिक घटना मानली जातेसन 1830 साली बटाट्याचं पिक पूर्णपणे हातातून जाणेतीव्र दुष्काळ आणि भूकमारी यामुळे माजलेला हाहा:कारही आयर्लंडच्या इतिहासातील महत्त्वाची घटना मानली जातेएप्रिल 1789 महिन्यातील शेवटच्या आठवड्यात पॅरिसच्या सेंट अँटोनी जिल्ह्यात अन्नासाठी उसळलेल्या दंगलीतूनच पुढे ऐतिहासिक ठरलेली फ्रेंच राज्यक्रांती घडलीगेल्या दोन शतकांत सातत्याने इजिप्तअर्जेंटिना आणि अन्य अनेक देशात अशा दंगली घडलेल्या आपल्याला पहायला मिळतातअगदी आपल्या देशातही अशा दंगली बांकूराबर्द्वान आणि बिरभूममध्ये घडलेल्या आपल्याला पहायला मिळतात.


भूकेल्या माणसांसमोर अन्य कोणताच पर्याय नसतो तेव्हा ती माणसं सत्ता नियंत्रण करणाऱ्यांना आव्हान देतात आणि त्यातून दंगली उसळतातसत्ताधाऱ्यांचा उद्दामपणानिरंकुश गर्व म्हणजेच ‘कोरोना’ आणि सामान्य भुकेल्या माणसांचा उपमर्द केला जातो तेव्हा इतिहासात अपरिहार्यपणे मानवी शोकांतिका घडल्याचे दिसतातजगातील अनेक संस्कृतीत प्राचीन काळापासून दुराभिमान आणि विनम्रताराजसत्ता आणि मानवी समूह यांच्यातील संघर्षावर आधारित अनेक दंतकथा आपल्यापर्यंत आलेल्या आहेतगणपतीविषयी अशीच एक दंतकथा स्कंद पुराणात आपल्याला पहायला मिळते.


देवलोकातील सर्वात धनवान कुबेर शिवाच्या भेटीला जातोशिव म्हणजे निर्धनमहादेवाजवळ तेव्हा त्याचा मुलगा गणपतीही हजर असतोकुबेर विचार करतोकी आपण या दोघां पिता-पुत्रांना आपली झगमगाटी आणि देखणी अशी अलंकापुरी दाखविण्यासाठी निमंत्रित करुयात्यानुसार गणपती आणि शिव दोघे अलंकापुरीत येतातकुबेर त्या दोघांना पंचपक्वानांचे भोजन देतोगणपती भोजनास सुरवात करतो आणि खातच राहतोत्याची भूक काही भागत नाही आणि खाणे काही संपत नाहीतयार केलेलं सर्व अन्न संपून जातेमग गणपती भोजनगृहातील जेवणाची ताटंभांडी अशा सर्व वस्तू खातोतरीही त्याचं पोट काही भरत नाहीमग गणपती जाहीर करतोकी आता तो यजमानाला म्हणजे खुद्द कुबेरालाच खाणार आहेत्यामुळे कुबेर फार घाबरुन जातोतो गणपतीच्या वडिलांना शिवाला विनंती करतोकी त्यांनी गणपतीला आवरावेत्यावर शंकर कुबेराला सांगतोकी तू गणपतीला अतिशय प्रेमाने आणि मनोभावे फक्त मूठभर पोहे देबघ त्याचं पोट लगेच भरेलपण तू स्वत:च्या संपत्तीचे उद्दाम प्रदर्शन करत कितीही पंचपक्वानं त्याला वाढलीस तरी त्याची भूक भागणार नाहीहे लक्षात ठेव.


सन 1990 च्या दशकात मी प्रसिद्ध बंगाली लेखिका महाश्वेता देवींच्याबरोबर आदिवासींच्या प्रश्नांवर एकत्र काम करत होतोत्या कालखंडात महाराष्ट्रातील आदिवासी पट्ट्यातील कोरकू आदिवासी तरुण मोठ्या संख्येने मृत्यूमुखी पडत होतेबहुदा उपासमारीमुळे हे मृत्यू घडत असावेतकोरकूंच्या या अकाली मृत्यूचा अभ्यास करण्यासाठी सरकारने एका समितीची स्थापना केलीया समितीच्या अभ्यासाअंती असे समोर आलेकी कोरकू ‘सिकल सेल’ आजारामुळे मरण पावत आहेतसिकल सेल हा एक अनुवांशिक आजार आहे आणि त्याबाबत फारसं काही करणं शक्य नाहीमी आणि महाश्वेतादेवी आम्ही दोघांनीही या कोरकूंच्या संबंधित प्रभावित जिल्ह्याचा प्रवास केलाआमच्या अभ्यासाचा निष्कर्ष असा होताकी ब्रिटीश वासाहतिक सरकारने कोरकू जमातीची सुपीक जमीन रेल्वे लाईन टाकण्यासाठी काढून घेतली होतीकोरकूंच्या प्रदेशातील जंगल कापून त्या लाकडांचा उपयोग रेल्वेचे स्लीपर्स तयार करण्यासाठी केला गेलाअशारितीने तो प्रदेश उजाड केल्यामुळे कोरकू समाजातील लोकांना प्रचंड उपासमारीला तोंड द्यावे लागलेत्या काळापासून सुरू झालेली कोरकू समाजाची ही सततची उपासमार ही पुढे पिढ्यांनपिढ्या तशीच सुरू राहिली.


पुढे काही वर्षांनी महाश्वेतादेवींनी एक ‘महादू’ नावाची बंगाली कथा लिहिली. ‘महादू’ हा शब्द म्हणजे महादेव या नावाचे लघुरुप होयया कथेत त्यांनी कोरकू समाजातील अखेरच्या आदिवासींचे पात्र कल्पिले होतेहा आदिवासी अत्यंत कृश आणि वाढ खुंट्लेल्या अवस्थेत पोहचलेला असतोत्याचं अस्तित्व म्हणजे केवळ एखाद्या किड्यासारखं उरलेलं असतंअचानक त्याला दूरवर रेल्वेची शिटी ऐकू येते आणि त्याच्या मनातील स्मृती जाग्या होतातत्याच्या वाडवडिलांनी गमावलेल्या जंगलांचा त्याला सुगंध यायला लागतोतो त्या सुगंधाच्या दिशेने धावतो आणि उडी मारुन रेल्वेगाडीत बसतोगाडी त्याला मुंबईत आणून पोहचवते आणि तिथे एक चमत्कारिक वस्तू त्याच्या नजरेस पडतेती म्हणजे ‘अन्न’! त्यामुळे तो तिथे असलेले सर्व अन्नपदार्थ खातोपण तरीही त्याचं पोट काही भरत नाहीमग तो व्हिक्टोरिया टर्मिनसराजाबाई टॉवर्स अशा वास्तूंचे भक्षण करायला सुरवात करतोतो जसं जसं खात जातो तशी त्याची उंची वाढत जातेत्याची उंची इतकी वाढते की त्याचं डोकं आभाळाला टेकतंमग तो वाकून अरबी समुद्रातील पाणी पितोआपले हात उंचावून आकाशातील एक तारा खुडतो आणि त्या ताऱ्यांनी साऱ्या जगाचा इतिहास नव्याने लिहायला लागतो.


अशा कथा आणि दंतकथांमधून लक्षात येतेकी भूक म्हणजे काही लोकांनी मागणी केलेली अशी एक केवळ भौतिक गरजेची वस्तू नाहीतर या मानवी भूकेलाही एक संदर्भ असतोसांस्कृतिक पदर असतो आणि मानवी संवेदनेचे परिमाण असतेया संदर्भात कोरोना या जागतिक महामारीचा विचार करुआपल्या लक्षात यईल की या महामारीने साऱ्या जगाला व्यापून टाकलंयसर्व अर्थव्यवस्थांना टाळेबंद केले आहेकोट्यवधी माणसांना आपला रोजगार गमवावा लागलाय आणि प्रत्येक देशात अभूतपूर्व बेरोजगारी निर्माण झाली आहे.


भुकेकंगालांच्या दंगली उसळण्यासाठी अत्यंत निर्णायक ठरू शकतेअशी ही स्फोटक परिस्थिती आहेपहिल्या टप्प्यातील लॉकडाऊनची मुदत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला त्या दिवशीम्हणजे 14 एप्रिल रोजी सुरतमध्ये उद्भवलेली घटना याचेच निदर्शक आहेया पार्श्वभूमीवर असा प्रश्न पडतोकी ‘सुरतमध्ये जमा झालेला तो जमाव केवळ बेकार भत्ता/आर्थिक मदत मागत होताकी आणखीही काही मागत होता?’ तसेच स्थलांतरित कामगार फक्त आपापल्या घरी परतण्यासाठी सरकारी वाहनांची मागणी करत आहेत की त्यांना आणखीही काही तरी हवंय?, याचा विचार करायला हवा.


लॉकडाऊनच्या काळात या देशातील फार मोठ्या लोकसंख्येने सरकारला अभूतपूर्व असे सहकार्य दिले आहेशेतकरीस्थलांतरित कामगारभुकेली माणसं यापुढेही अशाच पद्धतीचे सहकार्य देण्यास तयार असतीलमात्र त्यासाठी सत्ता सम्राटांनी या माणसांना निव्वळ जमाव म्हणून तुच्छतेने पाहू नयेसरकारनी या माणसांचा आधी थोडा जरी विचार केला असता आणि नागरी संस्था-संघटनांना आवाहन केले असते तर अशा संस्था-संघटना आनंदाने पुढे आल्या असत्याया संस्था-संघटनांतर्फे या अडकून पडलेल्या स्थलांतरित कामगारांसाठी मार्गदर्शन केंद्रनिवारा केंद्र आणि अल्प मुदतीचे कौशल्य विकास कार्यक्रम सुरू केले जाऊ शकले असतेपरंतु असे झाले नाहीउलट याच लॉकडाऊनच्या काळात उत्तर-पूर्वेकडील राज्यांतील निरपराध माणसांना अत्यंत अपमानास्पद वागणूक देण्याच्या घटना घडल्याहे अत्यंत चिताजनक आहेतसेच काही निवासी भागात मुस्लिम विक्रेत्यांना प्रवेश देण्यात येऊ नयेतअशा प्रकारच्या सूचना फैलावल्या गेल्याचे पुढे आले आहेअशा घटनांत पोळल्या गेलेल्या नागरिकांच्या वेदनांवर फूंकर घालण्याचे काम सरकारतर्फे केले जाणे आवश्यक होतेअपमानद्वेष आणि तुच्छता पसरवणारा विषाणू रोखण्यासाठी ‘सोशल डिस्टन्सिंग’ (सामाजिक दुरत्वनव्हे तर ‘सोशल इन्क्लुजनचे (सामाजिक समावेशकताधोरण आवश्यक आहेसरकारने याकडे दुर्लक्ष करणे हे नक्कीच खेदकारक आहेविद्वेषाचा हा विषाणू वेळीच रोखण्याचा सरकारने प्रयत्न केला नाही आणि हा विषाणू असाच अमर्याद पसरत राहिला तर येत्या काळात आपल्याला भूकेकंगालांच्या दंगली उसळलेल्या पहायला लागल्या तर आश्चर्य वाटायला नकोलॅटिन भाषेत कोरोना शब्दाची/संज्ञेची अर्थछटा आहे करुणादेशातील माणसांच्या समूहांची मुख्य गरज आहे सहवेदना आणि समावेशकताकारण माणसांचे हे समूह देशभक्तांचे समूह आहेत.
- गणेश देवी
(मराठी अनुवाद : प्रमोद मुजुमदार)

No comments:

Post a Comment