प्राणी असतो तर
भूक जाणवताच निघालो
असतो
पोट भरण्याच्या
शोधात
आणि कुठल्याशा एका
क्षणी पोहचलो असतो तिथं
जिथं निसर्गानं
ठेवलेलं असेल माझ्यासाठी जेवण
पण माणूस आहे उपाशी
माणूस आहे आजारी
कुठंय माझ्या
वाट्याचं आरोग्य
माणूस आहे हतबल
कुठंय माझ्या
वाट्याचं जीवन
काहीच तर ठरलेलं
नाहीय
कुठल्याही
नियमांविना चाललंय जीवनयुद्ध
चालाकी केली
तर दुसर्याच्या
हिश्याचं अन्न ही खाऊ शकतो
पण हुशारीशिवाय तर
स्वतःचं अन्न
मिळवणं अन् वाचवनं ही शक्य नाहीय
पोट भरण्याच्या
संघर्षातून सुरू झाला होता जो संस्कृतीचा प्रवास
काही लोकांसाठी
परावर्तित झालाय घर भरण्याच्या क्रूर वासनेत
वाढत चाललीय
अपचनाच्या औषधांची विक्री
आणि वंचितांच्या
ताटातल्या कमी होतायत भाकरी
अशात कुठे जाईल
उपाशी 'रामदास'
ज्याला मागावं वाटत
नाहीय आणि हारलाय जीवनाचे सगळे पेच
थंड आणि कठोर
दरवाज्यांच्या पाशवी इमारतींच्या या शहरात
भूक वाढत चाललीय
महापूरासारखी
आणि त्यात बुडत
चाललेयत
अन्न मिळवण्याचे
ज्ञात-अज्ञात रस्ते!
- मूळ
हिंदी कवी : मदन कश्यप
(अनुवाद
: संदीप शिवाजीराव जगदाळे)
(छायाचित्राचे कॉपीराईट : विकास खोत)
(छायाचित्राचे कॉपीराईट : विकास खोत)
No comments:
Post a Comment