Saturday, 9 May 2020

भूक












जेव्हा ही 
भूकेसोबत लढण्यासाठी 
कोणी उभा राहतो
सुंदर दिसू लागतो 

झडप घालणारा ससाणा 
फना काढलेला साप
दोन पायांवर उभी असलेली 
काट्यातले लहान पानं खाणारी शेळी 
दबक्या पावलांनी झाडीतून चालणारा चित्ता
फांदीवर उलटं लटकून 
फळं कुरतडणारा पोपट
या सगळ्यांच्या जागेवर
माणूस असता तर! 

जेव्हा ही 
भूकेसोबत लढण्यासाठी 
कोणी उभा राहतो
सुंदर दिसू लागतो

- मूळ हिंदी कवी : सर्वेश्वर दयाल सक्सेना
(अनुवाद : संदीप शिवाजीराव जगदाळे)
(छायाचित्राचे कॉपीराईट : विकास खोत)    

No comments:

Post a Comment