2

आपल्या ‘व्हॉटस्ॲप’वर नियमितपणे लेख मिळविण्यासाठी 85 30 52 85 50 हा नंबर आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करून, त्यावर आम्हाला ‘हॅलो’ असा मॅसेज पाठवा.

Saturday, 9 May 2020

निधर्मी भूक
















पोटात भगभगती भूक 
आणि
डोळ्यांत लाचारी घेऊन
भीक मागत होता तो 
फक्त एका चतकोर भाकरीची
मात्र त्यांनी फेकली  
कोरडी धार्मिक पुस्तकं त्याच्या याचक हातांवर 
मग गुमान भूक गिळून 
तो पलटू लागला पानं 
त्या बेचव पुस्तकांची
ज्यात सापडले नाहीत 
त्याला भूक शमवणारे चवदार शब्द   
शेवटी पुस्तके धुंडाळून  
झोपी गेला 
आपली निधर्मी भूक गिळून,
आणखी एक भुकेला दिवस पोटात ठेवून 
आणि 
पुस्तकी धर्म उशाला घेऊन! 

- रमेश नागेश सावंत
(छायाचित्राचे कॉपीराईट : विकास खोत)   

No comments:

Post a Comment

माणगाव परिषद : बहिष्कृतांचे रणशिंग - उत्तम कांबळे

'अस्वस्थ शतकातील माणगाव परिषद ’ हा उत्तम कांबळे यांचा ग्रंथ ‘ लोकवाङ् ‌ मय गृह ’ तर्फे लवकरच वाचकांच्या भेटीसाठी येत आहे. एका ऐति...