भूक सगळ्यात आधी मेंदू खाते
त्याच्यानंतर डोळे
त्यानंतर शरीरात
उरलेल्या इतर गोष्टींना
मागे काहीच सोडत
नाही भूक
ती नात्यांना खाऊन
टाकते
मुलं तर तिला खूपच
आवडतात
त्यांना ती सर्वात
आधी
आणि खूप घाईघाईत
खाते
मुलांनंतर मग
शिल्लक तरी काय राहतं..
मूळ हिंदी कवी : नरेश सक्सेना
(अनुवाद
: संदीप शिवाजीराव जगदाळे)
(छायाचित्राचे कॉपीराईट : विकास खोत)
No comments:
Post a Comment