जेव्हा ही
भूकेसोबत
लढण्यासाठी
कोणी उभा राहतो
सुंदर दिसू लागतो
झडप घालणारा ससाणा
दोन पायांवर उभी
असलेली
काट्यातले लहान
पानं खाणारी शेळी
दबक्या पावलांनी
झाडीतून चालणारा चित्ता,
फांदीवर उलटं लटकून
फळं कुरतडणारा पोपट,
या सगळ्यांच्या
जागेवर
माणूस असता तर!
जेव्हा ही
भूकेसोबत
लढण्यासाठी
कोणी उभा राहतो
सुंदर दिसू लागतो
- मूळ
हिंदी कवी : सर्वेश्वर दयाल सक्सेना
(अनुवाद
: संदीप शिवाजीराव जगदाळे)
(छायाचित्राचे कॉपीराईट : विकास खोत)
(छायाचित्राचे कॉपीराईट : विकास खोत)
No comments:
Post a Comment