लिखित शब्दाच्या शाईला
महत्त्व असतंच
म्हणूनच निळ्या, काळ्या शाईने
लिहिणार्यांना त्यांनी
काळाची शाई समजून घेण्याची
सरळ सरळ धमकीच दिली
कोणताही काळ असो
आमचं पेन
रक्ताच्याच शाईने माखलेलं असेल
हे मी आधी
ऐकलं होतंच
आता तर
रक्ताच्या शाईचा थेंबाथेंब
धर्मग्रंथाच्या पानावर.
- अजय कांडर
(कवी
अजय कांडर हे मराठीतील नवदोत्तर पिढीतील महत्त्वाचे कवी आहेत.
कोणत्याही कवीची राजकीय समज हीच त्याची समाजातील बहुसांस्कृतिकता टिकविण्याची
समज ठरत असते. त्यांच्या कवितेत याचीच प्रचीती येते. इथे प्रसिद्ध होत असलेल्या या कविताही त्याला अपवाद नाहीत. कांडर यांची 2012 मध्ये प्रसिद्ध झालेली ‘हत्ती इलो’ ही बहुचर्चित दीर्घ राजकीय कविता हे त्याचे
उत्तम उदाहरण आहे. त्यांचा ‘आवानओल’
हा पहिला काव्यसंग्रह 2005 साली प्रसिद्ध झाला.
त्याला महाराष्ट्र फाऊंडेशनसह अनेक प्रतिष्ठित पुरस्कार प्राप्त झाले.
अनेक विद्यापीठ, शालेय अभ्यासक्रमामध्ये त्यातील
कवितांचा समावेश होतानाच त्या इंग्रजी, हिंदी, मल्याळम, उर्दू आदी भाषांमध्ये भाषांतरित झाल्या.)
No comments:
Post a Comment