Tuesday, 30 April 2019

दंगल बातम्यांमधील आणि प्रत्यक्षातील : एक परीक्षण


साधारणपणे 18 व्या शतकाच्या अखेरपासून ते आजपर्यंत दक्षिण आशियाच्या उपखंडात बर्‍याच जातीय आणि जमातवादी दंगली झाल्या आहेत. यातील प्रत्येक दंगलीचा प्रभाव समाजातील प्रत्येक व्यक्तीच्या मनात आठवणीच्या रूपात खोलवर रुजलेला आहे. दक्षिण आशियात ब्रिटिश आणि फ्रेंच यांच्या आगमनापूर्वी दिल्लीचे सुलतान, त्यानंतर मुघल साम्राज्य आणि त्यांच्या प्रादेशिक नवाबांचे शासन होते. इंग्रज आणि फ्रेंच शासकांच्या समोर वैविध्यपूर्ण समाजावर शांततामय नियंत्रण ठेवण्याचे मोठे आव्हान होते. दोन प्रमुख धर्माच्या वर तिसर्‍या प्रांताच्या लोकांचे शासन अशी परिस्थिती समाज तयार झाली. स्वधर्म रक्षणाचा मुद्दा त्याच काळात तयार झाला आणि त्यानेच  जमातवादया संकल्पनेला जन्म दिला. या विषयावरील पहिलं आणि एकुलतं एक पुस्तक विभूती नारायण राय यांनी लिहिलेले आहे. त्याचे शीर्षक जमातवादी दंगली आणि भारतीय पोलीसअसे आहे. विभूती नारायण राय हे माजी आयपीएस अधिकारी आहेत. ते उत्तर प्रदेशचे पोलीस महासंचालक होते आणि वर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाचे कुलगुरू होते. पोलीस सेवेत असल्यापासूनच ते मूलतत्त्ववादी, जमातवादी प्रवृत्तींना विरोध करत आलेले आहेत. निवृत्तीनंतर ते सक्रिय कार्यकर्ते म्हणून काम करत आहेत.


1994 साली त्यांना केंद्र सरकारच्या राष्ट्रीय पोलीस अकादमीकडून जमातवादी दंगलींमध्ये भारतीय पोलिसांच्या वर्तनावर काम करण्यासंदर्भात शिष्यवृत्ती मिळाली. जी त्यांनी आनंदाने स्वीकारली. हैदराबाद येथे स्थित सरदार पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमीत बसून वेगवेगळी कागदपत्रे जमा करून, त्यांचे वाचन करून झाल्यानंतर या पुस्तकाचा जन्म झाला आणि  हा शोधनिबंधाच्या स्वरूपात केंद्रीय गृह मंत्रालयाकडे सुपूर्द करण्यात आला. आधी म्हटल्याप्रमाणे भारतात कुठे कुठे जातीय आणि जमातवादी झाल्या; त्या वेळेला तत्कालीन पोलीस अधिकार्‍यांनी कोणती पावलं उचलली  आणि शेवटी त्या दंगलींचा समाजावर आणि शासनावर कसा प्रभाव पडला या सगळ्या गोष्टी राय यांच्या शोधनिबंधात सामील झाल्या आहेत.  राय यांनी आपल्या अभ्यासातून भारतीय समाजासमोरच्या नव्या शत्रूचे आकलन केलेले आहे. हा शत्रू दुसरा कोणी नसून खुद्द जमातवादआहे. प्रा. बिपिनचंद्रांच्या म्हणण्यानुसार जमातवाद ही एक अशी विचारसरणी आहे की ज्यानुसार एका धर्माच्या अनुयायांचे सामाजिक, राजकीय आणि आर्थिक हितसंबंध एकसमान असतात. या विचाराचे तीन विशिष्ट पैलू पुढीलप्रमाणे आहेत. पहिला समातवाद बहुलवादाला पूर्णपणे विरोध करत असतो. दुसरा, जमातवादाला नेहमी एका शत्रूची  गरज असते, आणि या बाबतीत शत्रू दुसर्‍या धर्मावर श्रद्धा  असलेला असू शकतो. तिसरा आणि शेवटचा पैलू, प्रत्येक  समुदायाचे हितसंबंध वेगळे आणि परस्परविरुद्ध असतात. भारतीय संदर्भात जमातवादाचा आशय हिंदू आणि मुसलमान या दोन समुदायांमधील अविश्वास, भयगंड, ईर्ष्या, कडवटपणा आणि हिंसेत सामावलेला आहे.

भारताच्या इतिहासात नोंद झालेली पहिली जमातवादी दंगल गुजरातमधील अहमदाबाद येथील 1713 साली झाली.  त्यानंतर अशाच स्वरूपाच्या अनेक दंगली झाल्या किंवा घडून आणल्या गेल्या. त्यावेळेला भारतीय पोलिसांचे वर्तन कसे होते? त्यांनी कोणत्या पद्धतीने कारवाई केली? जाळपोळ, मुलामुलींचे अपहरण, स्त्रियांवर बलात्कार या सगळ्याला ते कसे सामोरे गेले? हे प्रश्न आणि त्यांची उत्तरं महत्त्वाची आहेत. कारण जमातवादी किंवा जातीय दंगलींचा साधा उल्लेख झाला की अनेक जण तत्कालीन राज्य आणि केंद्र सरकारवर टीकास्त्र झाडतात. हे टीकास्त्र त्या सरकार आणि राजकीय पक्षावर ठिपक्याप्रमाणे टिकूनही राहतं पण पोलीस यंत्रणा निष्पक्ष आहे ना? ती केंद्रीय गृह मंत्रालयाशी संलग्न आहे. कायद्याची रक्षा हे सर्वस्व पोलीस यंत्रणा निष्पक्ष आहे ना? ती केंद्रीय गृह मंत्रालयाशी संलग्न आहे. कायद्याची रक्षा हे सर्वस्व पोलीस यंत्रणेकडूनच अमलात येतं. आपत्कालीन स्थितीत वापरल्या जाणार्‍या एनएसजी, सीआरपीएफ, इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस, रॅपिड अ‍ॅक्शन फोर्ससारख्या विशेष पथकांकडून हिंसक परिस्थिती आटोक्यात आली असेल अशी अपेक्षा आम्ही मनात ठेवतो. पोलीस यंत्रणा विषयीच्या आशावादी समजुती अनेकांच्या मनात असतात.

विभूती नारायण राय आपल्या संशोधनातून या सार्‍या समजुतीच्या पलीकडे असणारी वास्तवता दाखवतात. त्यांनी तीन महत्त्वाच्या दंगलींचे संदर्भ घेतले आहेत. अहमदाबाद येथील 1713 ची दंगल, 1984 साली इंदिरा गांधींच्या हत्येनंतर झालेला नरसंहा आणि 1987 ची हाशिमपुरा दंगल. 1713 ची दंगल ही भारतातील पहिली दंगल होती. लेखकांच्या मते ब्रिटिश सैन्यात सेवा बजावणार्‍या अफगाण सैनिकांनी अधिकार्‍यांचे आदेश न पाळता स्वत:चा धर्मपंथीयांच्यात सामील  झाले. 1984 साली कानपूरच्या प्राचार्या रतन गुजरालनी जेव्हा कंट्रोल रूमला गल्लीत घुसलेल्या दंगलखोरांविरुद्ध तक्रार करण्यासाठी फोन केला तेव्हा त्यांना पोलीस अधिकार्‍यांनी

हम भी तो हिंदू है!असे ऐकवले. या घटनेवरून पोलिसांचा बेजबाबदारपणा लक्षात घेण्यासारखा आहे. 1987 च्या हाशिमपुरा दंगलीनंतर अटक केलेल्या मुसलमानांना जेव्हा फतेहगढ मध्यवर्ती तुरुंगात नेण्यात आले तेव्हा त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. त्यांना जेवण, आणि दोन दिवसांसाठी देण्यात आले नाही.


लेखक स्वत: म्हणतात की दंगलींत प्रत्येक धर्माचा माणूस मारला जातो, पण हे कधी थांबू शकत नाही का? प्रत्येक वेळी मृतांचे आणि बेघर लोकांचे आकडे 1000 हून वर का जातात?  यावर पुस्तकाच्या शेवटी ते उपाय म्हणून या गोष्टी सुचवतात. राष्ट्रीय सद्भावना परिषद भरवणे; दंगल भडकलेल्या इलाख्यातील पोलीस अधीक्षक आणि संबंधित अधिकार्‍यांवर निलंबनाची कारवाई, सीबीआय, सीआयडी तपास वेळेत पूर्ण होणे इत्यादी. ज्यांनी कोणी जातीय दंगल फक्त बातम्यांच्या माध्यमात पाहिली असेल तर त्यांनी हे पुस्तक बारकाईने वाचावे.
- अश्वत्थ इस्लामपुरे                         

No comments:

Post a Comment