2

आपल्या ‘व्हॉटस्ॲप’वर नियमितपणे लेख मिळविण्यासाठी 85 30 52 85 50 हा नंबर आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करून, त्यावर आम्हाला ‘हॅलो’ असा मॅसेज पाठवा.

Thursday, 7 November 2019

93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी आश्वासक निवड


ज्येष्ठ साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची उस्मानाबाद येथे होणार्या 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. ही बातमी कळताच वसईकरांमध्ये आणि मराठी सारस्वतात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. निवड समितीच्या या निर्णयाचे महाराष्ट्रात सर्व स्तरांवरून स्वागत झाले. मराठी साहित्यातील ते एक वाचकप्रिय लेखक, संत साहित्याचे अभ्यासक, क्रियाशील संपादक, पर्यावरणाच्या रक्षणासाठी झटणारा भूमाफियाविरुद्ध आवाज उठवणारा सजग कार्यकर्ता म्हणून ओळखले जातात. आजच्या उन्मादी काळात संत साहित्याशी नाते असणार्या साहित्यिकाची साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड होणं खूपच दिलासादायक आश्वासक आहे अशा सकारात्मक प्रतिक्रिया अनेकांनी नोंदवल्या. फादर यांच्या निवडीचं असं दमदार स्वागत होण्याला फादर यांचं साहित्यविचार आणि त्या विचाराला असलेली कृतिशीलतेची जोड कारणीभूत आहे. ‘बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊलेम्हणूनच फादर यांच्याकडे रसिक वाचकांचा आणि सामाजिक चळवळीतल्या कार्यकर्त्यांचा इतका ओढा आहे.

1972 साली कॅथलिक पंथीय ख्रिस्ती धर्मगुरुपदाची दीक्षा घेतल्यानंतर केवळ देवळातला पुजारी होता प्रार्थनेला  कृतीची जोड देत त्यांनी ईश्वरसेवेतून जनसेवेचा मार्ग स्वीकारला.

जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले
तो ची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा

या संत तुकारामांच्या वचनानुसार माणसाच्या व्यथा वेदनांना  त्यांनी आपल्या लेखनात आणले. ‘दु:खिताचे तिमिर जावोया प्रेरणेने त्यांनी आपले लेखन केले. फादर यांच्या लेखनविचार आणि कृतीत संत साहित्यातील माधुर्य विचार आणि येशूख्रिस्ताची करुणा याचा अपूर्व मिलाप पाहायला मिळतो. याच्या संंयोगातून, त्यांंच्या लेखनातून आलेलं माधुर्य आणि लेखनातून व्यक्त झालेली करुणा म्हणजे मराठी सारस्वताला मिळालेली अनमोल अशी देणगी आहे.

निसर्गसंपन्न वसईतील नंदाखाल येथे जन्म झालेल्या फादर यांनी निसर्गाकडून काय घेतले असेल तर ते म्हणजे निसर्गाची प्रसन्नता. ही प्रसन्नता त्यांच्या लेखनात उतरली. भारतीय संत साहित्याचा अभ्यास आणि ख्रिस्ती धर्माचे तत्त्वज्ञान यातून मिळालेल्या मानवी दु:खाचा कळवळा, विचारांची चौफेर बैठक आणि स्पष्टता आणि शब्दावरची अपार श्रद्धा, निसर्गाकडे पाहण्याचा मानवतावादी दृष्टिकोन अशा संस्कारांंनी त्यांना लिहिते केले. जैसी पुष्पांमाजी पुष्प मोगरी परिमळांमाजी कस्तुरी तैसी भाषांमाजी साजिरी भाषा मराठी अशा शब्दात मराठी भाषेचा गौरव करणार्या फा. स्टिफन यांचा वारसा फादर यांनी समर्थपणे पेलला.

वसईतल्या निसर्गाची प्रसन्नता आणि इथल्या झाडा फुलांचा सुवास त्यांनी आपल्या लेखनातून जगभर पसरविला. ‘तेजाची पाऊले’, ‘सृजनाचा मोहोरया संग्रहातील  प्रासादिक शैलीतील ललितलेख वाचून पु. . देशपांडे यांनी, ‘या लेखांना वसईच्या मळ्यांचा’, ‘जीवनाचा गंध येत आहे.’ असे गौरवोद्गार काढले होते.

साहित्य चंद्रावर बसून लिहिले जात नाही. समाजाविषयी आस्था बाळगून समाजातील व्यथा, वेदना, प्रवाह, आंतरप्रवाह यांची नोंद साहित्यात घेतली पाहिजे. माणसाच्या दु:खाला, वेदनामय मौनाला उद्गार देणारं साहित्य निर्माण व्हायला हवे. साहित्याचं कोणतंच टेक्स्टबुक नाही माणूस आणि त्याचं जगणं हेच साहित्याचं टेक्स्ट आहे.’ असे मानणार्या फादर यांनी   माणसाच्या आयुष्याला स्पर्शून आणि निसर्गाचे अनेक विभ्रम अनुभवत केलेल्या चिंतनाचा आविष्कार त्यांच्या साहित्यातून केला. निसर्ग माणसाला खूप काही शिकवितो असे मानून  निसर्गाची भाषा जाणणार्या फादर यांनीवेदनेचे गाणेया साधनासाठी लिहिलेल्या लेखात कोकिळेच्या गुंजनातून मानवी मूल्यांचे होणारे अवमूल्यन रेखाटले आहे. निसर्गावर अपार प्रेम असणार्यालाच निसर्गाची मानवासाठी असलेली कु हू कु हू ऐकता आली.

शब्द बापुडे पोकळ वारानसूनप्रारंभी शब्द होता...’ या बायबल वचनाला अनुसरूनआम्हा घरी शब्दाचीच रत्ने...’ असे अलोट शब्दधनाचे भाग्य लाभलेले फादर गेले अर्ध शतकाहून अधिक काळ शब्दांंची उपासना करीत आहेत. ही उपासना केवळ देवळातल्या उपासनेसारखी नाही. 

नव्वदच्या दशकात भूमाफिया सत्तेचा गैरवापर करून वसईच्या निसर्गसौंदर्याला धक्के देणारे निर्णय घेऊ लागले होते. दहशत पसरवून लोकांच्या जमिनी लुटणे, पाणीउपसा, विकास आराखडा लादून निसर्गाचा गैरफायदा घेण्याचे षङ्यंत्र रचले जात होते, विकासाच्या नावाखाली निसर्गाचा होऊ घातलेला विनाश निसर्ग वाचू-अनुभवू शकणार्या फादर यांनी ओळखला. मी जिथे जातो, तिथे मला निसर्ग खुणावतो असे म्हणणार्या फादर यांना निसर्गाच्या हाका ऐकू येत असाव्यात. त्या त्यांनी ऐकल्या. भूमाफियांच्या संगनमतीने राज्यकर्त्यांनी वसईवर लादलेला विकास आराखडा वसईच्या संस्कृती आणि पर्यावरणावर दूरगामी परिणाम करणारा आहे हे दूरदृष्टी असलेल्या फादर यांनी वेळीच ओळखले. त्या काळात माफियांच्या, गुंडाच्या दहशतीविरोधात ब्र काढण्याची हिंमत नसताना फादर त्याविरोधात खंबीरपणे उभे राहिले. प्रवचन आणि प्रबोधन करून पुरेसे नाही, प्रत्यक्ष कृती केली पाहिजे, भक्तीचे रूपांतर सामाजिक बांधिलकीमध्ये झाले पाहिजे, असा उदात्त विचार करून, सुवार्तेच्या माध्यमातून. ‘नाठाळांच्या माथी हाणावी काठीया उक्तीनुसार निसर्गाची लूट करण्याचा कट रचणार्या आणि जमिनी लाटण्यासाठी दहशत निर्माण करणार्या विरोधात त्यांनी आपली लेखणी सिद्ध केली. हरित वसई संरक्षण समितीच्या माध्यमातून हरित वसईची समृद्धी टिकून राहावी म्हणून समविचारी सहकार्याच्या साहाय्याने लोकलढा उभा केला. यासाठी त्यांना अनेक लोकांचा, महाराष्ट्रातील अनेक साहित्यिकांचा, चळवळीतल्या कार्यकर्त्यांचा पाठिंबा मिळाला. फादर यांनी लावलेली पर्यावरणविषयक जाणिवांची ही ज्योत आम्हा वसईकरांच्या मनात आजही प्रज्वलित आहे. आजही फादर वसईतल्या पर्यावरण चळवळीचे खंदे कार्यकर्ते आहेत, त्यांच्या प्रेरणेने सातत्याने निसर्ग संवर्धनासाठीचा लढा अनेक तरुण सकारात्मक विचाराने लढत आहेत.

पथिकाची नामयात्राया अनुवादित पुस्तकांपासून सुरू झालेली त्यांची लेखनयात्राआनंदाचे तरंग’, ‘मदर तेरेसा’, ‘पॉप दुसरे जॉन पॉल’, ‘मुलांचे बायबलअशा धार्मिक पुस्तकांपासून पुढे धर्मधर्मचिकित्सता करणारापरिवर्तनासाठी धर्महा लेखसंग्रह; सूक्ष्म निरीक्षण लालित्यपूर्ण शैलीतीलओअॅसिसच्या शोधात’, ‘संघर्षयात्रा ख्रिस्तभूमीची ही प्रवासवर्णने; ‘सृजनाचा मळाअशा विविध वाङ्मय प्रकारात स्वत:चा ठसा उमटवत आहे.

त्यांनी   बायबलचा केलेला सुबोध अनुवादावर महाराष्ट्रात सर्वधर्मीय वाचकांची पसंतीची मोहोर उमटली आहे. या कामासाठी त्यांना साहित्य अकादमीने उत्कृष्ट अनुवादाचा पुरस्कार देऊन गौरविले आहे. ज्ञानोबा तुकोबा पुरस्कार त्यांना संताच्या भूमीत  आळंदी येथे प्रदान करण्यात आला. तसेच अनेक मानाच्या पुरस्काराने त्यांना आतापर्यंत सन्मानित करण्यात आले आहे. ‘नाही मी एकलाअसे म्हणत फादर यांनी आपल्या  साहित्यिक  प्रवासात  वसईकर जनतेला आपल्यासोबत घेतले. 20  वर्षांपेक्षा अधिक काळ त्यांनी सुवार्तेच्या संपादकपदाची धुरा सांभाळली. त्यांच्या या कार्यकीर्दीत त्यांनी वसईतल्या कॅथलिक समाजाचे मुखपत्र असलेले सुवार्ता मासिक  महाराष्ट्रभर पोहोचवले. साहित्यिक प्रबोधनाची जवळपास अडीच दशके यशस्वी धुरा सांभाळत त्यांनी खर्या अर्थाने वसईचे सांस्कृतिक नेतृत्व केले. 

त्यांनी चालविलेल्या चळवळीने वसईचा सांस्कृतिक वारसा अधिक समृद्ध केला. उपासकालीन व्याख्यानमाला, सुवार्ता साहित्य मेळावा, वाचक मेळावा यासारखे अनेक उपक्रम त्यांनी राबविले. लोकाभिमुख केले. त्यांना लोकाश्रय मिळाला. त्यांच्या साहित्याने वसईला महाराष्ट्राच्या साहित्यिक, सांस्कृतिक पटलावर आणले. वसईकरांना साहित्याच्या अधिक समीप आणले. अनेकांना साहित्याची आवड निर्माण झाली. अनेक तरुण लिहिते झाले, या विचारांच्या उत्सवातून, देवाणघेवाणीतून वसईतील प्रबोधनाची परंपरा आणि निसर्गविषयक आस्था आताच्या तरुणांपर्यंत झिरपत आली आहे, त्यामुळेच  प्रबोधन उपक्रमाचा वारसा, निसर्ग रक्षणाचा लढा तरुण पुढे नेत आहेत, जपून ठेवत आहेत, त्याचे प्रेरणास्थान आणि मार्गदर्शक फादर आहेत.

सध्या जगभर आणि देशभर धार्मिक उन्मादी वातावरण निर्माण झाले आहे, या परिस्थितीत फादर यांच्यासारख्या व्यक्तीची साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड होणं दिलासादायक आणि आश्वासक असल्याची प्रतिक्रिया अनेकांनी दिली आहे. कारण आधुनिक काळात धर्म संघर्षासाठी नसून परिवर्तनासाठी आहे अशी फादर यांची भूमिका आहे. धार्मिक उन्माद हा विशिष्ट लोकांनी आपल्या स्वार्थासाठी कृत्रिमरीत्या निर्माण केलेला आहे. मात्र अनेक धर्म हजारो वर्षे येथे नांदत आहेत, परस्परविरोधी तत्त्वज्ञान, उपासना पद्धती भिन्न असूनही भारताची सहिष्णुता आपण जपली आहे, जोपासली आहे. सहिष्णुता, करुणा, सहभाव, बंधुत्व, क्षमाशीलता आणि मानवता या मूल्यांचा आग्रह धर्माने धरला पाहिजे असे मानून त्यासाठी त्यांनी सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि धार्मिक अशा विविध प्रकारच्या उपक्रमातून स्वत:ला समाजाशी, अन्य धर्मीयांशी जोडून घेतले आहे. धर्मांधतेच्या विषयावर सर्वधर्ममैत्री आणि सर्वधर्मसंवाद हा फादर यांचा कृतिशील विचार आजच्या काळात फार महत्त्वाचा  ठरणार आहे, या संवादासाठी ते आग्रही आणि प्रयत्नशील आहेत.

भारताच्या एकात्मता संवाद आणि मैत्रीच्या आधारावर टिकून राहील असा त्यांना विश्वास आहे त्यासाठी वेगवेगळ्या उपक्रमातून संवादासाठी वेगवेगळे प्रयोग ते राबवीत आहेत..

अनेक अन्य धर्मीय व्यक्ती, संस्था, संघटना यांच्याशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्या संवादी उपक्रमांना त्यांना चांगला प्रतिसादही मिळाला आहे. पुणे येथीलजंगली महाराज मंदिरआणि मुंबई वरळी येथीलहनुमान मंदिरयेथे त्यांनी प्रवचनं दिली आहेत. वसईतील वाघोली येथील एका मंदिरात त्यांनी ज्ञानेश्वर माऊलीने जगाच्या कल्याणासाठी मागितलेल्या पसायदानाचे निरूपण केले, त्याला श्रोत्यांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला होता.

अनेक संस्था, व्यक्ती, चळवळीतील कार्यकर्त्यांना फादर नेहमी आपले वाटत आले आहेत. या सर्वांना फादर यांनी नेहमीच आपला कृतिशील पाठिंबा प्रोत्साहन दिले आहे.

साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवडीबाबत फादर यांना विचारले असता फादर यांनी, ‘मला गुरुवर्य असलेल्या  कुसुमाग्रज, पु..देशपांडे यांच्यासह अनेक दिग्गजांनी आतापर्यंत हे पद भूषविले आहे. मला माझ्या मर्यादांची जाणीव आहे म्हणूनच ही निवड माझ्यासाठी अनपेक्षित आहे, तरी या पदाचा बहुमान मिळाला याचा मला आनंद आहे.’ अशी प्रतिक्रिया दिली आहे. त्याबरोबरच संमेलन साधेपणाने व्हावे आणि साहित्य संमेलन केवळ दोन-तीन दिवस चालणारे नसते तर ते अखंड चालूच असते असेही मत नोंदवले आहे.

सुबोध बायबलच्या मनोगतात फादर यांनी स्वत:च्या लेखनकामाविषयी म्हणताना
मी तो हमाल भारवाहीअसे म्हटले आहे. म्हणजेच आपण आपले कर्तृत्व करीत राहावे, आपण आपली भूमिका निष्ठेने पार पाडावी, हीच आपल्या धर्माची शिकवण आहे अशी कर्तृत्वनिष्ठ भूमिका फादर यांनी सातत्याने घेतली आहे आणि त्यामुळेच फादर यांंना अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी विराजमान होणं मराठी साहित्य परंपरा अधिक समृद्ध करणारं ठरेल, असा विश्वास अनेकांना वाटत आहे.                   

- फेलिक्स डिसोजा

Friday, 13 September 2019

ॲटनबरोंचे गांधी...


गांधींसारखा एक हाडामासाचा चालताबोलता माणूस या पृथ्वीवर होऊन गेला यावर येणार्या पिढ्यांना विश्वास ठेवणे अवघड जाईल किंवा यावर येणार्या पिढ्या विश्वास ठेवणार नाहीत. अशा आशयाचे अल्बर्ट आईनस्टाईन यांचे गांधीजींबद्दलचे एक विधान प्रसिद्ध आहे. आपण सर्वांना सर्वसाधारणपणे हे विधान वाचून वा ऐकून माहीत असते. परंतु, अल्बर्ट आईनस्टाईन सारख्या व्यक्तीला असे का म्हणावेसे वाटले असेल याचा विचार आपण करत नाही. दुसर्या बाजूने गांधी हे अनुल्लेखाने मरता येईल असेही व्यक्तिमत्त्व नाही. विशेष म्हणजे गांधीजींबद्दल एकच एक असा मतप्रवाह किंवा विचारप्रवाह आज या देशात अस्तित्वात नाही. अनेक मतमतांतरांमधून आणि विचारांमधून गांधी आपल्या समोर येत असतात. यात प्रामुख्याने साहित्यिक आणि लिखित माध्यमाचा वाटा खूप मोठा आहे. चित्रपट, नाटक, दूरचित्रवाणी मालिका असा इतर माध्यमाचा वाटा फार कमी आहे. तर यातील चित्रपट माध्यमाबद्दल आपण आढावा घेऊ.

मोहनदास करमचंद गांधी ऊर्फ बापू ऊर्फ राष्ट्रपिता महात्मा गांधी हे सर्वार्थाने एक 'Larger Than Life' व्यक्तिमत्त्व. तरीही आजपर्यंत जेमतेम दहा चित्रपट गांधीजींच्या जीवनकार्यांवर तयार केले गेले आहेत. त्यातही पहिले दोन मुख्य चित्रपट ब्रिटिश दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी तयार केले आहेत. या सर्व चित्रपट निर्मितीचा काळ आहे 1963 ते 20011 पर्यंतचा. यातही स्वातंत्र्यानंतरची जवळपास 50 वर्षे एकही भारतीयाने गांधीजींवर चित्रपट निर्मित किंवा दिग्दर्शित करण्याचा प्रयत्न केला नाही. गांधीजींच्या मृत्यूनंतर 16 वर्षानेनाईन अवर्स टू रामाहा चित्रपट 1963 मध्ये मार्क रॉबसन यांनी निर्मिती आणि दिग्दर्शन केलेला हा पहिला चित्रपट होता. त्यानंतर पुढे 19 वर्षाने रिचर्ड अॅटनबरो यांचागांधीहा  निर्मिती आणि दिग्दर्शन केलेला दुसरा चित्रपट प्रदर्शित झाला जो खर्या अर्थाने गांधीजींवरचा सर्वश्रेष्ठ चित्रपट मानल्या जातो.

1962 मध्ये एका सामाजिक उपक्रमात लंडनमधील भारतीय नागरी सेवेचे अधिकारी मोतीलाल कोठारी यांची रिचर्ड अॅटनबरो यांच्याशी भेट झाली. मोतीलाल यांनी अॅटनबरो यांच्याकडे गांधीजींवर चित्रपट बनवण्याचा आग्रह धरला. ॅटनबरो यांनी गांधीजींबद्दल अगदी जुजबी, शाळेच्या मुलाएवढी माहिती आहे असे म्हणून टाळले. मोतीलाल यांनी अॅटनबरो यांना गांधीजींबद्दलची अनेक पुस्तके वाचायला दिली. त्या वाचनाने ऍटनबरो प्रभावित झाले आणि त्यांनी चित्रपट बनवण्याचा निर्णय घेतला. मात्र पुढचे काम एवढे सोपे नव्हते. ॅटनबरो यांच्या ओळखीतले कुणीही पैसे गुंतवायला तयार नव्हते.

सामाजिक उपक्रमांना भरघोस देणगी देऊन देऊन अॅटनबरो यांचाही खिसा रिकामा झाला होता. मात्र गांधीजींच्या जीवनकार्य आणि विचाराने रिचर्ड एवढे प्रभावित झाले होते की त्यांना चित्रपटाचा निर्मितीखर्च कमी करण्याची निर्मात्याची अट मान्य नव्हती. त्यांनी हार मानली नाही. प्रयत्न सुरू ठेवले. तब्बल वीस वर्षे रिचर्ड हे स्वप्न साकार करण्यासाठी झटत होते. चित्रपट करण्याचे ठरविल्यानंतर त्यांनी स्वत: गांधीजींबद्दलचे वाचन सुरू केले. डी. जी. तेंडुलकर यांचे महात्मा : मोहनदास करमचंद गांधी यांचे जीवनकार्य या पुस्तकाचे आठ भाग वाचून काढले. लुईस फिशर यांचे लाइफ ऑफ महात्मा गांधी हे पुस्तक वाचले. याच फिशर यांच्या पुस्तकातील प्रसंगावर गांधी या चित्रपटाची मूळ कथा आधारित आहे. फिशर यांचे पत्रकार म्हणून एक पात्रही चित्रपटात आहे. जे गांधी या व्यक्तिमत्त्वाच्या ‘Spirit’ चा अनुभव आपल्याला देतं. हे काम आपल्या आवाक्याबाहेर जातंय असं लक्षात आल्यावर अॅटनबरो यांनी तीन पटकथा लेखक चित्रपटाची कथा लिहिण्यासाठी नेमले. यासाठी लॉरेन्स ऑफ अरेबिया हा महाकाय चित्रपट लिहिणार्या पटकथालेखकाची निवड केली. 1964 मधील पहिला ड्राफ्ट वाचल्यानंतर पंडित नेहरूंनी स्वतः खूप मोठ्या प्रमाणावर अॅटनबरो यांना मदत करण्याची व्यवस्था केली. पुढे अनेक ड्राफ्ट होत राहिले.

इंदिरा गांधींनी आपल्या वडिलांचे स्वप्न म्हणून चित्रपटाचे भारतात चित्रीकरण करण्यासाठी पूर्ण मदत केली. आर्थिक बाजू अजूनही भक्कम नव्हती. गोल्डक्रेस्ट फिल्म्सने या चित्रपटाची निर्मिती करण्यासाठी काही आर्थिक पाठबळ दिले. ॅॅटनबरो यांच्या मागणीनुसार भारतात प्रत्यक्ष स्थळांवर शुटींग करण्याची परवानगी दिली. भारतात इंदिरा गांधींनी सर्व शक्ती पणाला लावली. 22 मिलियन डॉलर चित्रपटाचे पूर्ण बजेट होते, त्यातील 6.5 मिलियन डॉलर इंदिराजींनी एन.एफ.डी.सी. मधून मिळून दिले. महात्मा गांधीजींच्या अंत्ययात्रेच्या सीनच्या शूटिंगसाठी चार लाख लोकांची एक्स्ट्रा कलाकारांची फौज इंदिराजींनी जमा करून दिली. त्या वेळेतील संसदेच्या अधिवेशनात या खर्चाबद्दल आणि मदतीबद्दल खूप वादळी चर्चा होत होती. परंतु  इंदिराजींनी विरोधांकडे दुर्लक्ष करून मदत केली. पुढे चित्रपट पूर्ण झाला. पाच खंडांतील वेगवेगळ्या देशांतील अभिनेते. वेगवेगळ्या देशांतील शूटींग आणि आर्थिक पाठबळ. 70 एमएमची निर्मिती. सहा साऊंड ट्रॅक. खूप मोठ्या प्रमाणावर प्रत्यक्ष स्थळांवर केलेले चित्रीकरण.

निर्विवादपणेगांधीचित्रपट म्हणून एक अजस्त्र कलानिर्मिती होती. हे एक महाकाव्याचं चित्रण होतं. या चित्रपटाला प्रतिसादही तेवढ्याच प्रमाणावर मिळाला. अकरा ऑस्कर पुरस्कारासाठी या चित्रपटाचे नामनिर्देशन झाले. त्यापैकी आठ ऑस्कर पुरस्कार या चित्रपटाने मिळवले. इतर लहान-मोठ्या पुरस्कारांची तर गणतीच नाही. संपूर्ण जगभरात या चित्रपटाने 100 मिलियन डॉलरपेक्षा जास्त व्यवसाय केला. डीव्हीडी आणि दूरचित्रवाणी वाहिन्यांवर अजूनही हा चित्रपट व्यवसाय करतोच आहे. नि:ंशकपणे हा जगात सर्वात जास्त बघितलेल्या चित्रपटांपैकी एक आहे. दिल्लीला मोठ्या थाटामाटात चित्रपट पहिला शो दाखवला गेला. चित्रपटाची तीन तास अकरा मिनिटांची लांबी लक्षात घेता आंतरराष्ट्रीय स्तरावर हा चित्रपट एवढ्या मोठ्याप्रमाणावर पाहिला गेला हे गांधी या नावाभोवतीच्या वलयामुळेच झाले. गांधीजी हे व्यक्तीमत्त्व जिवंत करणारा अनुभव दिला तो गांधींची भूमिका साकारणारे अभिनेते बेन किंग्जले यांनी. त्यांच्याशिवाय गांधी या चित्रपटाची कल्पनाही करता येणार नाही. बेन हे गांधीजींची भूमिका करण्यासाठीच जन्माला आले असंही त्यांच्याबद्दल नंतर बोललं गेलं. यातील अतिशयोक्ती सोडली तर चित्रपट पाहिल्यावर हे नक्कीच पटतं. बेन गांधीजींच्या रूपात आपल्या स्मरणात कायम राहतात.

गांधीहा एक आगळावेगळा दृश्यानुभव आहे. ॅटनबरो यांनी दिग्दर्शन करताना जे कौशल्य वापरले ते वादातीत आहे. कथानक मांडण्याची शांत संयमी लय, गांधीजींची व्यक्ती आणि विचार चित्रित कराताना केलेला फ्रेम्सचा वापर. महत्त्वाच्या ठिकाणी केलेला वाईड शॉटचा उपयोग. तीन तासांच्या कथानकाची गती टिकवण्यासाठी कॅमेरा अँगल आणि मोमेंट्सचा केलेला वापर. कथानक उलगडत जाण्याच्या प्रक्रियेतील महत्त्वाचे घटनाक्रम. हे सर्व अॅटनबरो यांची 20 वर्षांची मेहनत आणि हा चित्रपट पूर्ण करण्याचा ध्यास याचा परिणाम आहे. ॅटनबरो यांनी गांधी चित्रित करण्याआधी व्यक्ती म्हणून  समजून घेतले. चित्रपटामध्येही त्यांनी गांधी व्यक्ती म्हणून सहज सादर केले. गांधींच्या 'Larger Than Life' व्यक्तिमत्त्व सादर करण्याचा मोह त्यांनी टाळला. गांधीचा प्रभाव आणि करिश्मा सांगण्याऐवजी त्यांनी गांधींजींच्या लहान लहान कृती दाखवून त्याचा सहज परिणाम साधण्यावर भर दिला.

गांधीहे रसायन तयार होण्याचा संपूर्ण प्रवास त्यांनी रेखाटला. त्याची सुरूवात त्यांनी आफ्रिकेतून केली. गांधी तयार होण्याची पहिली ठिणगी इथेच पडली होती. सुटाबुटातले गांधी इथपासून हा प्रवास सुरू होतो. तेथील लढा सुरू करून गांधी भारतात येतात. येथील रस्त्यावरच्या भारतीयांची अवस्था पाहून अस्वस्थ होतात. त्यांचे राजकीय गुरू गोपाळकृष्ण गोखल्यांनी देशभर फिरण्याचा दिलेला सल्ला अमलात आणतात. हा भारतभर फिरण्याचा प्रवास चित्रपटात फार सूक्ष्मपणे मांडला आहे. हाच गांधींजीच्या वैचारिक जडणघडणीचा पाया आहे असे अॅटनबरो दाखवतात. या प्रवासातून परत आल्यावर पहिल्यांदा गांधींना एका राजकीय सभेत भाषण करण्याची संधी मिळते हा प्रसंग चित्रपटात विस्तृतपणे दाखवलेला आहे. गांधींना भाषण सुरू करण्याची विनंती केली जाते.

गांधीला ओळखत नसलेले आणि आधीच्या कंटाळवाण्या भाषणांनी लोक जागेवरून उठून जाऊ लागतात. गांधी मात्र आपले विचार ठामपणे मांडायला सुरूवात करतात. उठून जाणार्या लोकांना लक्षात येतं की हा माणूस काही वेगळे बोलतोय. हा आपल्याबद्दलच बोलतोय. लोक पुन्हा येऊन बसतात. कान देऊन ऐकतात. त्या सामान्य माणसांची एका क्षणात गांधींशी नाळ जोडली गेली ती कायमचीच. पण हे सहज घडलं नाही. ते घडण्याची प्रक्रिया अॅटनबरो उलगडून दाखवतात. अशा एकेक प्रसंगातून अॅटनबरोंनी गांधींचे नेतृत्व कसे घडत गेले आणि त्यांना जनतेचा पाठिंबा कसा मिळत गेला हे क्रमाने दाखवत नेले आहे. या सोबतच अधे मध्ये गांधी व्यक्ती म्हणून किंवा त्यांचे माणूसपण दाखवणारे प्रसंग चित्रित केलेले आहेत. अशा काही प्रसंगांमध्ये गांधीजी स्वत:बद्दल बोलत आहेत. हे प्रसंग लुई फिशर यांच्या पुस्तकातून घेतलेले आहेत. ते तसेच चित्रपटात चित्रित केलेले आहेत. गांधी आणि अमेरिकन पत्रकार यांच्या भेटीचे हे प्रसंग.

अशाच एका प्रसंगात गांधीजी या पत्रकारासोबत संध्याकाळी पोरबंदरच्या समुद्रकिनार्यावर बसून आपल्या लहानपणाबद्दल बोलत आहेत. गांधीजी सांगतात की, त्यांची हिंदू म्हणून वाढ झाली असली त्यांच्या गावातील मंदिरातील पुजारी कुराणही वाचून दाखवत होते याचा माझ्या मनावर खूप परिणाम झाला. याच संदर्भाने एके ठिकाणी लोकांना सांगतातमी हिंदू आहे, मी मुस्लिम आहे, ख्रिश्चन आणि ज्यूही आहे, मी तुम्ही सर्वच आहे.’ याच संदर्भाने फाळणीच्या वेळेला गांधी जिनांना म्हणतात, हिंदू आणि मुस्लीम हे या देशाचे डावा आणि उजवा डोळा आहेत, कुणी गुलाम नाही. कुणी मालक नाही. त्यावर जिना उत्तर देतात की, हे जग म्हणजे महात्मा गांधी नाही, मी सर्वसामान्य माणसांबद्दल बोलतोय. हा गांधी आणि इतर नेत्यांमधील विचारांचा फरकही तुलनात्मक पद्धतीने समोर येतो.

आंदोलनाच्या काळातील एका टप्प्यावर जीनांच्याच घरी सुरू असलेल्या देशातील सर्व महत्त्वाच्या नेत्यांमधील बैठकीत गांधी आपल्या देशात कोणीही मोठा किंवा लहान नाही सर्व समान आहेत व त्याबद्दल ते आग्रही भूमिका मांडतात. आपल्या कृतीतून पटवून देण्यासाठी ते बैठकीकडे चहाचे कप घेऊन उभ्या असणार्या जिनांच्या घरातील नोकराला अडवतात, त्याच्या हातातील कप घेतात व सर्वाना स्वत: चहा वाटतात. असे गांधींच्या मोठेपणातले सहज पदर आणि विचारातला प्रामाणिकपणा अनेक प्रसंगात चित्रित केलेला आहे. सोबतच व्यक्ती म्हणूनही काही प्रसंग चित्रित केलेले आहेत. जसे की कस्तुरबा स्वतः स्वच्छतागृहाची साफसफाई करण्यास नकार देतात तेंव्हा गांधीजी त्यांच्यावर रागावतात आणि हे काम त्यांना करावेच लागेल हे ठामपणे सांगतात. म्हणजे गांधींना रागही येतो इथपर्यंतच हा प्रसंग मर्यादित नाही. गांधी व्यक्ती, विचार आणि काळ या संदर्भाने हे लक्षात घेणे गरजेचे आहे.

गांधी चित्रपट 1982 मध्ये प्रदर्शित झाला. तोपर्यंत वेगवेगळ्या प्रोपगंडामधून वेगवेगळे गांधी जनमानसाच्या मानगुटीवर बसलेले होते. टकल्या गांधी, देशाची फाळणी करणारा गांधी, भगतसिंगांना मदत न करणारा गांधी, 55 कोटींचे दान देणारा गांधी असे कितीतरी गांधीजी समाज जीवनात होते. स्वातंत्र्यानंतरच्या या पिढीला अॅटनबरो यांनी हे खरे वास्तववादी गांधी दाखवले. ते लोकांना भावले आणि या चित्रपटाला जगात सर्वत्र भरभरून प्रतिसाद मिळाला.

मी जेव्हा हा चित्रपट पहिल्यांदा पाहिला तेव्हा त्याच्या अवाढव्य रूपाने भारावून गेलो होतो. हळूहळू तो प्रभाव थोडा कमी झाला. मात्र चित्रपट पाहून पहिल्या वेळेस पडलेला प्रश्न अजून गंभीर झाला. 20 वर्षे गांधी चितारण्याचा ध्यास केलेल्या माणसाला गांधींची चित्रकथा सांगण्याची सुरूवात आणि शेवट गांधींना गोळी घालून मारणार्या माणसापासून का करावीशी वाटली असेल ? ‘मी नथुराम गोडसे बोलतोयबद्दल मी एकूण होतो मात्र कधी पाहण्या -  वाचण्याचा संबंध आला नाही. गांधी चित्रपट पाहिल्यानंतर तशी इच्छा आणि गरजही राहिली नाही. त्या गोळीने गांधी शरीराने मेले ते अॅटनबरो आणि बेन यांनी माझ्यासाठी शरीराने आणि सोबत विचाराने पुन्हा जिवंत केले. मात्र आज माझा वर्तमान पुन्हा गांधी संदर्भ घेऊन उभा आहे.

भारतीय स्वातंत्रलढ्याचे भाग म्हणून जनमानसातील गांधींची प्रतिमा  पुसून टाकण्यासाठा आजच्या काळात खूप जोरकस राजकीय प्रोपगंडा राबवल्या जात आहे. गांधी म्हणजे फक्त स्वच्छतेचे पुजारी एवढीच फक्त प्रतिमा निर्मिती केली जातेय. सत्तर वर्षापूर्वी जे शरीर गोळीने मारले त्याचे विचार आता दीडशे वर्षाच्या जयंती पर्वावर झाडूने साफ करण्याची स्वच्छता मोहीम देशभर राबवली जात आहे. दुसर्या बाजूला स्वातंत्र्यलढ्यातील इतर काही निष्प्रभ व्यक्तिमत्त्वांना स्वातंत्र योद्धे व स्वातंत्र्यवीर म्हणून समोर आणले जात आहे. गांधींच्या आश्रमात जाऊन सूत कातून त्याच सुताने गांधी विचारांचा गळा घोटला जातोय.

एका शाळकरी मुलीला गांधींच्या चष्म्याचे बोधचिन्ह सुचते आणि ते तीन रंग मिसळून या स्वच्छता मोहिमेचे बोधचिन्ह बनवते हा वाटायला सहज सोपा भाग. पण अगदी सामान्य माणसालाही काही वावगं वाटणार नाही आणि सर्व काही सहज सोपे वाटेल असा असणे हेच प्रोपगंडाचे पहिले उद्दिष्ट असते. या प्रोपगंडाचे परिणाम लगेच दिसणार नाहीत कदाचित. पण ते दूरगामी असतील. यातील गांभीर्य आज लक्षात येत नसेलही. पण लक्षात येईल तेंव्हा वेळ गेलेली असेल. आज माझा मुलगा अडीच वर्षांचा आहे. त्याला मी अजून वीस वर्षांनी त्याच्या जाणत्या वयात विचारले की गांधीजी कोण होते? तर माझ्या मुलाला गांधीजी कसे माहिती असतील हाच मोठा प्रश्न आहे. त्याला दाखवायला माझ्याकडे अॅटनबरोचे गांधी आहेत एवढाच काय तो दिलासा.

- संदीप गिऱ्हे

माणगाव परिषद : बहिष्कृतांचे रणशिंग - उत्तम कांबळे

'अस्वस्थ शतकातील माणगाव परिषद ’ हा उत्तम कांबळे यांचा ग्रंथ ‘ लोकवाङ् ‌ मय गृह ’ तर्फे लवकरच वाचकांच्या भेटीसाठी येत आहे. एका ऐति...