2

आपल्या ‘व्हॉटस्ॲप’वर नियमितपणे लेख मिळविण्यासाठी 85 30 52 85 50 हा नंबर आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करून, त्यावर आम्हाला ‘हॅलो’ असा मॅसेज पाठवा.

Tuesday, 30 April 2019

प्रबोधन पर्व पुसून टाकले जात आहे : वसंत आबाजी डहाके


नमस्कार,
कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या अतिशय मानाच्याजनस्थान पुरस्कारासाठी आपण माझी निवड केलीत, याबद्दल मी मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो. कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांनी प्रवर्तित केलेला हा पुरस्कार या वर्षी मला देण्यात आला याचा मला आनंद झाला. तो मुख्यत: या पुरस्काराशी कुसुमाग्रजांचे नाव जोडलेले आहे त्यामुळे. आजपर्यंत ज्या दिग्गज साहित्यकारांना हा पुरस्कार देण्यात आला, त्यांच्या पंक्तीत बसण्याचा सन्मान आपण मला दिलात, ही माझ्यासाठी व्यक्तिगत पातळीवर मोठी गोष्ट आहे. गोदावरीकाठच्या, कुसुमाग्रजांच्या रहिवासाच्या या भूमीत तो मिळतो आहे, ही खरोखरच हृदयाला स्पर्श करणारी गोष्ट आहे. कुसुमाग्रजांची प्रेरणा आणि आपणा सगळ्यांचे प्रेम या पुरस्कारामागे आहे याची मला जाणीव आहे.

या क्षणी कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांची आठवण होणे स्वाभाविकच आहे. माझ्या घडणीच्या काळातले कुसुमाग्रजांच्या कवितांचे संस्कार मला आठवतात. पुढे माझी मी एक वेगळी वाट धरली, तरी अद्यापही एक वाचक म्हणून त्यांच्या कवितांनी मी थरारून जातो, आणि काही कवितांनी अस्वस्थही होऊन जातो.

बांधू शकले प्रीतीचे वा कीर्तीचे धागे
एकच तारा समोर आणिक पायतळी अंगार
होता पायतळी अंगार

यांसारख्या ओळी अजूनही अंगावर काटा आणतात. देशाच्या मुक्तीसाठी अन्नत्याग करून मृत्यूच्या दारात पाऊल टाकणार्या त्या निर्भय राजबंद्यांचे चित्र डोळ्यांसमोर उभे राहिले की, आत एक आवेश संचारत असे, त्याच वेळी मन अतिशय व्याकूळ होऊन जात असे. जगात मुक्तीच्या अनेक कविता लिहिल्या गेल्या असतील, पणक्रांतीचा जयजयकारही कविता अजरामर आहे. या कवितेने आज आपण अधिकच अस्वस्थ होतो, याचे कारण स्वत:च्या आयुष्याचा होम करणारे आणिलोहदण्ड तव पायांमधले खळाखळा तुटणारम्हणणारे हे वेडेपीर कुठे गेले? त्यांनी या देशाचा जो उज्ज्वल भविष्यकाळ पाहिला होता, तो कुठे गेला? हे प्रश्न आपल्याला पडतात. त्या अत्यंत तेजस्वी, देशप्रेमाने भारलेल्या काळासमोर आपला आजचा वर्तमानकाळ ठेवला की, आपण अस्वस्थ होत जातो. कुसुमाग्रजांचीच ओळ आहे : ते होते जीवित-अन् हा जीवितभास! भव्योदात्त ध्येये असलेली आणि त्यासाठी जिवाची कुरवंडी करणारी माणसे लोप पावली आणि आज आपण खुज्या, सत्य-असत्याची चाड नसलेल्या माणसांच्या काळात जगतो आहोत असे आपल्याला वाटत राहते. कुसुमाग्रजांच्या भाषेत महावृक्ष कोसळले आहेत आणि त्यांचे ओंडके फक्त शिल्लक राहिलेले आहेत.

आज सत्योत्तर युग, पोस्ट-ट्रुथ एज, आहे असे म्हटले जाते. सत्य काय आणि असत्य काय, काही फरकच राहिलेला नाही. असत्य वारंवार बोलले गेले की तेच सत्य आहे असे सामान्य लोकांना वाटत असते. राजकीय आणि आर्थिक सत्ता असा सत्यासत्याचा भ्रम निर्माण करतात. त्यांचे असत्यांचे घोडे चौखूर उधळत असतात. कुणी सत्य सांगायचा प्रयत्न केला तर त्यांचे तोंड बंद करण्यात येते. पण आपण बोलले पाहिजे हे आपल्याला कुसुमाग्रजांच्या कवितांनी सांगितलेले आहे. सत्य असतेच. ते निर्माण करावे लागत नाही. असत्य निर्माण करावे लागते. असत्य हेच सत्य आहे, असे प्रस्थापित करावे लागते.

कवी अनुभव घेत असतो. आपल्या भोवतीच्या समाजाचे निरीक्षण करतो. विश्लेषण करतो. व्यक्ती म्हणून होणार्या संवेदना, भावना, विचार असतात. त्यांचे रूपांतर कवितेत होत असते. मग त्या भावना व्यक्तिगत भावना राहत नाहीत. कवीच्या भोवतीचे जग त्याच्या मनात आंदोलित होत राहते. त्यांत सामाजिक-राजकीय प्रश्नही आलेच. हे प्रश्न साहित्यापासून दूर राहू शकत नाहीत. ते व्यक्तीच्या जगण्याचे भाग असतात. देशातच नव्हे तर जगात घडणार्या घटनांचे परिणाम व्यक्तींवर, समूहांवर होत असतात. कवीला, लेखकाला याचे भान असते.

कुसुमाग्रजांच्या कवितेत आपल्या भोवतीच्या समाजाविषयीचे भान सतत असलेले आढळते. आपल्या कवितेचे ध्रुवपद कोणते आहे हे सांगताना ते म्हणतात-

माझ्या गीताचे ध्रुवपद एकच आहे,
माणसाच्या माथ्यावर
दारिद्य्रासारखा शाप नाही
पृथ्वीच्या पाठीवर
इतके अमंगल, इतके दु:खदायक, इतके भेसूर
दुसरे पाप नाही!

सर्वसामान्यांच्या पोटात, मेंदूत शिरणारा, काळीज चिरणारा भुकेचा सुरा त्यांच्या कवितेत आहे, रस्त्यावर फिरणारे, उकीरड्यावर चरणारे, थंडीवार्यात मरणारे मूल्य ते पाहतात आणि दुसरीकडचे सफरचंदी मूल्य यांतला विरोध त्यांना जाणवतो, मुलाचा आक्रोश ऐकून, चोळीतून अनिवार आवेगाने, ओघळणारे स्तन, पुन्हा चोळीमध्ये खुपसून, पहाडी शिळांची रास फोडणारी, रोजगार हमीवर तीन रुपयांत काम करणारी स्त्री त्यांना दिसते, मुलाचे कलेवर खाली टाकून, उकिरड्यावर ओतलेले कुजलेले धान्य गोळा करण्यासाठी धावणारी आई त्यांना दिसते, एका आदिवासी म्हातारीमध्ये त्यांना दिसते- तिच्या एका थानाच्या गाठोळीवरून, लोंबत होतं आपलं पार्लमेंट, आणि दुसर्या गाठोळीवरून लोंबत होतं, आमचं साहित्य संमेलन. आमच्या लोकशाहीच्या आणि साहित्यसंस्कृतीच्या गोष्टी किती निरर्थक आहेत हेच ते सांगत आहेत. अशी उद्विग्न करणारी स्थिती त्यांच्या कवितेतून आलेली आहे. तरी सामान्य माणसांवर त्यांची विलक्षण श्रद्धा आहे.

हुकूमशहांचे सत्तेच्या आणि संपत्तीच्या उन्मादाने ओथंबलेले काचमहाल कुठपर्यंत शिल्लक राहतात? कुसुमाग्रज सांगतात -

तोपर्यंतच, जोपर्यंत सामान्य माणूस
रस्त्यातला
जंगलातला
शेतातला कारखान्यातला    
उठत नाही जाळ होऊन

संस्कृतीच्या व्यवहारात एक दिलासा आहे असे त्यांना वाटते, तो हा की सामान्य माणूस, कधीही मरत नाही, कितीही मारला तरी. दुसर्या एका कवितेत त्यांनी म्हटलेले आहे, तथाकथित असामान्यांसाठी राजवाड्यांच्या इमारती, चिरेबंदी भिंती या सामान्य माणसांनीच बांधलेल्या असतात. पण एक दिवस असा येतो की, ही सामान्य माणसेच त्या भिंती उद्ध्वस्त करून टाकतात. सामान्य माणसांवरची त्यांची ही श्रद्धा अपार आहे. त्याचबरोबर मध्यमवर्गीय बुद्धिजीवींविषयी त्यांना तेवढा आदर नाही.

महावृक्षया संग्रहातप्रा. मुल्हेरकरनावाची एक कविता आहे. मुल्हेरकर सकाळी वृत्तपत्रात वाचतात : तीन मवाल्यांनी गुराखी तरुणीवर बलात्कार केला. तिचं प्रेत सापडलं. रात्री झोपण्यापूर्वी ते त्या तीन मवाल्यांची तीन चित्रे रेखाटतात, नंतर ते टेबलावरचा चाकू उचलून त्या चित्रांवर सपासप वार करतात. प्रा. महिपतराव मुल्हेरकरांसारखी माणसे, बलात्कार आणि हत्या करणार्या मवाल्यांची कागदावर चित्रे काढून, त्यांच्यावर चाकूचे वार करून आपल्या मनातल्या संतापाला वाट करून देतात. प्रा. मुल्हेरकरांसारख्यांना शक्य असते तर त्यांनी, आम्हाला नेभळट बनवले असा आरोप करून, शांतिअहिंसेचे पाठ देणार्या माहात्म्यांचे पुतळे करून त्यावर गोळ्या झाडल्या असत्या आणि खाली रक्ताचे थारोळे साचलेले पाहून उद्दाम आनंद व्यक्त केला असता.

कुसुमाग्रजांनी कवितेत कल्पिलेले ऊर्जस्वल जग त्यांच्या हयातीतच हळूहळू नष्ट होत गेले. धर्माचा ध्वज, जेव्हा अडाण्यांच्या हाती जातो, तेव्हा त्या ध्वजावरून, रक्ताचे थेंब गळायला लागतात, हे त्यांनी पाहिले होते. आणि त्यांनी, केल्याने देशाटन, मिळतील मानव असंख्य माराया, हेही पाहिले होते. सुर्यांनी काबीज केलेली गावे त्यांना दिसतात. समूह म्हणजे हिंस्र जनावर हे पूर्वीच त्यांना उमगले होते. आजच्या काळात त्यांना झुंडी दिसल्या असत्या आणि त्यांच्याकडून होणार्या हत्याही दिसल्या असत्या. एका कवितेत त्यांनी म्हटले आहे : रस्त्यारस्त्यांवर, रक्ताची थारोळी, इतकी साचली आहेत की, भविष्यकाळाकडे, जाणारी पावलेही आता, रक्तात माखल्याशिवाय, राहणार नाहीत. कवी द्रष्टा असतो. आजचा काळ त्यांना कालच दिसला होता.

जगात चाललेल्या हिंसाचाराविषयीची त्यांची अस्वस्थ प्रतिक्रियासंतश्रेष्ठाया ज्ञानदेवांना उद्देशून लिहिलेल्या कवितेत आलेली आहे. ते ज्ञानदेवांना उद्देशून म्हणतात, तुमचं आकाशच वेगळं होतं. ते हळुवार मायेनं सार्या धरतीला जोजवत होतं. त्यातील मेघ घुणघुणा वाजत होते. वारा रुणुझुणू वाहत होता. ते मातृहृदयी आकाश आज भयानक हिंस्र झालं आहे. साखळदंड तोडून पिसाट धावणारी व्याघ्रमुखी वादळं तुमचं विश्वात्मक पसायदानच रक्तबंबाळ करीत आहेत. त्यांना प्रकाशशिखराच्या पायवाटेवर माणसांचीच नव्हे तर मूल्यांचीही प्रेतं पडलेली दिसलेली आहेत. प्रकाशाची शिखरेच उरलेली नाहीत. काळोखाच्या गुहा आहेत आणि त्यांनी आपले जबडे उघडलेले आहेत. सारे काही गिळून टाकले जात आहे. सत्य, अहिंसा, शांती, बंधुभाव...

आगामी काळाची चाहूल लागल्यासारखी त्यांची एक कविता आहे. त्या कवितेत त्यांनी म्हटले आहे -

चहूकडून हे प्रश्नचिन्हांचे कळप, लांडग्यांसारखे, माझ्यावर चालून येत आहेत, माझ्या आहेपणात, त्यांचे हिंस्र सुळे घुसत आहेत आणि तेथील आशयाचे मूलाधार विच्छिन्न करीत आहेत.

आमच्या पिढीतल्या, आमच्या पुढच्या आताच्या पिढीतल्या कवींना, लेखकांना, कलावंतांना, पत्रकारांना, विचारवंतांना अशाच प्रश्नचिन्हांच्या लांडग्यांच्या कळपांना सामोरे जावे लागते आहे. कुसुमाग्रजांनी ज्या आहेपणाचा उल्लेख केलेला आहे तो, अथवा आपले अस्तित्व ज्या मूल्यांवर अधिष्ठित असते, ती मूल्ये, तो मूलाधारच विच्छिन्न होत आहे. तरीदेखील त्या महाकवीने पाहिलेले महास्वप्न आम्ही आमच्याही उरात बाळगलेले आहे. या कवीने म्हटलेले आहे - पलीकडच्या जंगलामध्ये, हिमलाटेत कुडकुडणार्या, त्या नागड्या पोरांकडे, मला जायचं आहे, त्यांच्या अंगणात जाळ पेटविण्यासाठी.

द्वेषातून आणि हिंसेतून येणारा घरेदारे पेटवणारा हा जाळ नव्हे तर माणसांना मायेची ऊब देणारा जाळ.

पूर्वी किल्ला बांधण्यापूर्वी खंदकात जिवंत माणसांचा बळी देण्याची पद्धती होती असे ऐकिवात आहे. आता विकासाचा, समृद्धीचा जो किल्ला बांधला जातो आहे, त्याच्या पायात आर्थिक दृष्टीने आणि सामाजिक दृष्टीने जे लोक मागे पडलेले आहेत त्यांचा बळी दिला जातो आहे. या विचित्र अवस्थेविषयी जे बोलतात त्यांना जनतेचे, देशाचे शत्रू ठरवले जात आहेत. लेखक, कवी, कलावंत, पत्रकार, विचारवंत यांचे डोळे उघडे असतात, कान उघडे असतात. मात्र त्यांनी आपले तोंड बंद ठेवले पाहिजे, अशी अपेक्षा केली जात असते.

सध्या प्रागतिक भांडवलशाहीचा काळ आहे. ही नुसती आर्थिक अवस्था नसते तर आर्थिक अवस्थेबरोबरच राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक अवस्थाही असते. सत्तासंपादनासाठी वेळोवेळी वंश, धर्म, भाषा या प्रभावी घटकांचा उपयोग केला जात असतो. दुसर्या वंशाच्या, धर्माच्या, भाषेच्या घटकांविषयी द्वेष निर्माण केला जातो. एकोणिसाव्या शतकापासून महाराष्ट्रात जे प्रबोधनपर्व सुरू झाले होते, ते पुसून टाकले जात आहे की काय अशीही शंका आपल्याला येते आहे.

दुसरीकडे बाह्यत: जी निर्बुद्धपणाची वक्तव्ये ठरतील, पण आतून हेतुपुरस्सर खुनशीपणाने केलेली असतात त्यांना अटकाव केला जात नाही, नंतर, असं म्हणायचं नव्हतं, तसं म्हणायचं होतं असला सारवासारवीचा खेळ केला जातो. महात्मा फुले, कार्ल मार्क्स, महात्मा गांधी, डॉ. आंबेडकर यांच्या विचारांनी झपाटलेल्या पिढ्या होऊन गेल्या हे आपल्याला ठाऊक आहे. त्यांची भाषा, त्यांचे शब्द विचारांनी समृद्ध आहेत. तो आपला वारसा आहे. त्याचा विसर पडावा असे प्रयत्न सुरू असतात. पण याच महाकवीने आम्हाला हेही सांगून ठेवलेले आहे -

दानवीकरण घडते वारंवारतेने,
देवदूतीकरणासाठी मात्र
करावी लागते प्रतीक्षा दीर्घकाळ.

विसाव्या शतकातील एक थोर नाटककार सॅम्युएल बेकेट यांच्यावेटिंग फॉर गोदोया नाटकाची येथे आठवण होते. गांजलेल्या, त्रस्त, दु:खी, खिन्न, निराशेचा कडेलोट झालेल्या, पण निरंतर वाट पाहणार्या माणसांविषयीचे हे नाटक आहे. माणसांचे वाट पाहणे किती चिवट असते, हे या नाटकातून सतत जाणवत राहते. ‘या नाटकात काहीही घडत नाही, दोनदाअसे एका समीक्षकाचे मत आहे. ते बरोबर नाही. या नाटकात सतत वाट पाहणे घडत असते. या नाटकातूनच जाणवते की, हे वाट पाहणे या नाटकात दाखवलेल्या भागाच्या आधीही होते, आणि नंतरही असणार आहे. माणसाची जिद्द आणि आशा. दीर्घकाल प्रतीक्षा.

आज, केवळ भारतातलीच नव्हेत, तर सार्या जगातली सामान्य माणसे वाट पाहात आहेत. अशी दीर्घकाळ प्रतीक्षा करण्याचे आत्मबळ कुसुमाग्रज या कवीने आम्हाला पुरवलेले आहे, आणि त्यासाठी आम्ही मन:पूर्वक कृतज्ञता व्यक्त करतो. एखादा लेखक, एखादा कवी आपल्या काळात कसा जागता पहारा देत असतो हे आपल्याला कुसुमाग्रजांच्या कवितेतून समजते. कवितेच्या रूढ समजुतीची त्यांनी पर्वा केली नाही, कुणाचे सरकार आहे, कुणाची राजवट सुरू आहे याचीही त्यांनी पर्वा केली नाही. लेखकाचा धर्म काय, त्याचे कर्तव्य काय याची निरंतर आठवण करून देणारी त्यांची कविता आहे. राजवटी किंवा सरकारे कशी असतात याची त्यांना कल्पना होती.

कशी असतात सरकारे? आपल्या विरोधातला आवाज दडपून टाकायचा असेल तर त्या सरकारला दडपशाहीचा मार्ग अवलंबावा लागतो, निर्बंध लादावे लागतात, नागरिकांमध्ये दहशत निर्माण करावी लागते, त्या देशातले सारे लोक भयाच्या छायेत जगत राहतील अशी स्थिती निर्माण करावी लागते. ही वाक्ये हॅरी एस ट्रुमन यांची आहेत. स्वातंत्र्य काढून घेतले तर माणसांचे रूपांतर कत्तलखान्याकडे चाललेल्या शेळ्यामेंढ्यांमध्ये होईल असे जॉर्ज वॉशिंग्टन यांनी म्हटले होते.

सर्वात प्रक्षोभक आणि उद्विग्न करणारी कविता सरकारे लिहीत असतात. ती भाषा कवीच्या भाषेहून वेगळी असते. त्या कवितेच्या वाचनाने सामान्य लोक विद्ध होतात, विचलित होतात, आणि विदीर्ण होतात. जेम्स टेट या कवीची एक कविता आहे : गव्हर्नमेंट लेक. एक माणूस फिरत फिरत सरोवराजवळ येतो. ते सरकारी आहे हे त्याला ठाऊक नसते. सरोवराचा रक्षक येतो. तो म्हणतो, हे सरकारी सरोवर आहे, सामान्य माणसांना येथे प्रवेश नाही. तुम्हाला जावे लागेल. त्या सरोवरात एक माणूस गटांगळ्या खात असतो. त्या रक्षकाला हा विचारतो, त्याचे काय? रक्षक म्हणतो, तो मेला आहे. हा म्हणतो, तो मेलेला नाही. रक्षक पिस्तूल काढतो, तिकडे गोळी झाडतो, म्हणतो, आता तो मेलेला आहे. सरकारे प्रश्नांची सोडवणूक कशी करत असतात यावरचे हे विदारक भाष्य आहे.

कवीने, लेखकाने आपला धर्म विसरायचा नसतो. स्तब्ध करण्याचा काळ येतो तेव्हा लेखकाने, कवीने बोलले पाहिजे. नाहीतर पुढची पिढी म्हणेल, आमच्या मागच्या लेखकांनी बोलायला हवे होते, तेव्हा ते बोलले नाहीत. चहूकडून काळोख दाटून येतो तेव्हा लेखकच लोकांची सोबत करतात, त्यांच्या अंत:करणातल्या दिव्याची ज्योत विझू देत नाहीत. विपरीत स्थितीत सापडलेल्या सामान्यांच्या सोबत असले पाहिजे, त्यांच्या बाजूने बोलले पाहिजे. त्यांच्या काळजात प्रचंड ऊर्जा असते हे कुसुमाग्रजांनी आपल्याला सांगितलेलेच आहे.                    

गांधीविचारांचा अन्वयार्थ


हिंद स्वराज्यया महात्मा गांधींनी लिहिलेल्या छोट्याशा पुस्तिकेची शताब्दी नऊ वर्षांपूर्वी साजरी झाली. भारताच्या त्यावेळच्या स्थितीबद्दलचे गांधीजींचे आकलन आणि त्यात कोणते बदल व्हावेत, याबद्दलचे त्यांचे मत या पुस्तिकेत प्रकट झाले आहे. या दृष्टीने तिचे महत्त्व आहे. अनेकांनी या पुस्तिकेबद्दल आपले विचार आणि विशेषत: त्यातील गांधीविचारांची आज असलेली प्रसंगोचितता सांगणारी पुस्तके लिहिली. त्यात कोणते बदल व्हावेत, याबद्दलचेही लेखन केले आहे. प्रा. फकरूद्दीन बेन्नूर हे मुस्लीम समाजाच्या प्रश्नांबाबत आपली भूमिका स्पष्टपणे मांडणारे एक अभ्यासक. त्यांचे हिंद स्वराज्य : एक अन्वयार्थहे पुस्तक म्हणजे त्यांनी शिवाजी विद्यापीठाच्या गांधी अभ्यास केंद्रात गांधीजींच्या पुस्तिकेतील प्रतिपादनाबद्दल केलेल्या अभ्यासाचे फलित आहे.

हिंद स्वराज्यलिहिले त्या वेळी गांधीजींचे वय 40च्या आसपास होते. ना. गोपाळ कृष्ण गोखलेंच्या सल्ल्यानुसार वर्षभर भारतभर फिरून भारताची तत्कालीन लोकस्थिती समजून घेतलेले गांधीजी अजून निर्माण झालेले नव्हते. ती संधी त्यांना 1915 नंतर मिळाली. 1912 साली नामदार गोखल्यांनी या पुस्तिकेचा अनुवाद वाचला. त्या वेळी त्यांना हे लेखन अवघड वाटले आणि त्यातील विचारही अपरिपक्व वाटले. गांधीजीच कालांतराने या पुस्तिकेतील विचारांचा त्याग करतील, असेही त्यांना वाटले; प्रत्यक्षात मात्र असे झाले नाही.


गांधीजींच्या मनातील भारताचे भावी चित्र स्पष्ट करण्यासाठी या पुस्तिकेचे महत्त्व अर्थातच आहे. परंतु ही पुस्तिका म्हणजे एखादा अपरिवर्तनीय धर्मग्रंथ नव्हे. स्वत: गांधीजींचीच मते अनेक बाबतींत बदलत गेली आणि या बदलांची त्यांनीही वेळोवेळी कबुली दिली आहे. गांधीजी हे प्रयोगशील नेते आणि विकसनशील विचारवंत होते. या त्यांच्या महत्त्वाच्या गुणामुळे गांधीजी बदलत्या परिस्थितीतही प्रसंगोचित राहतात. गांधीजींच्या या पुस्तिकेत काही मूलभूत मूल्यात्मक प्रतिपादन आहे; ते बदलण्याचा प्रश्नच नाही. तो गांधीविचारांचा पाया आहे. कोणत्याही विकासाचा व बदलाचा केंद्रबिंदू माणूस हाच असला पाहिजे; हिंसा ही कोणत्याही परिस्थितीत समर्थनीय असूच शकत नाही आणि प्रेम हाच माणसा-माणसांना जोडणारा धागा आहे, त्यावरच समाजाची इमारत उभी राहिली पाहिजे, असे त्यांचे मूल्यात्मक प्रतिपादन आहे.

गांधीजींनी या पुस्तिकेत पाश्चिमात्य राजकीय संस्कृतीत अपरिहार्यपणे येणार्या दोषांचे दिग्दर्शन करण्याचा प्रयत्न केला आहे आणि यंत्रांना त्यांनी (शोषणाचे साधन असल्यामुळे) पापम्हटले आहे. नंतरच्या काळात गांधीजींनी माणसांना बेकार न करणार्या यंत्रांना आपली मान्यता दिली. राष्ट्रांनी सैन्य बाळगण्याची गरज नाही, असे प्रतिपादणार्या गांधीजींनी काश्मीरमध्ये पाकिस्तानी आक्रमणाचा प्रतिकार करण्यासाठी सैन्य पाठविण्याला मान्यता दिली. त्यांच्यात होणारी ही परिवर्तने लक्षात घेऊनच हिंद स्वराज्यचा विचार केला पाहिजे.

राज्यव्यवस्थेचे प्राथमिक एकक म्हणून खेड्यांना मान्यता द्यावी आणि ही खेडी शक्यतो स्वयंपूर्ण असावीत, असे गांधीजींना वाटत होते. विकासाची जी संकल्पना नंतरच्या काळात मान्य झाली, त्यात आपल्या गरजा अत्यंत कमी ठेवणारे व त्या स्वत:च भागविणारे खेडे बसतच नव्हते. गांधीजींच्या कल्पनेतले खेडे आज अस्तित्वात नाही आणि परस्पर द्वेषाचे, कटुतेचे व शोषणाचे केंद्र असेच त्याचे स्वरूप झाले आहे, असे मत घटना समितीत सर्व पक्षांच्या नेत्यांनी व्यक्त केले आहे. घटना समितीच्या रचनेची तयारी चालू होती, त्या वेळीच हिंद स्वराज्यमधील राज्यव्यवस्थाविकासयांबाबतच्या मताला आपला असलेला विरोध पं. जवाहरलाल नेहरूंनी गांधीजींना स्पष्ट कळवला होता. घटना समितीने पुढे ब्रिटिश पद्धतीची संसदीय लोकशाही स्वीकारली व नंतरच्या काळात आर्थिक विकासासाठी पायाभूत उद्योगांनाही मान्यता देण्यात आली, हे सर्वश्रुत आहे.


प्रा. बेन्नूर यांनी गांधींनी औद्योगिकीकरणाला केलेल्या विरोधामागे जागतिक साम्राज्यशाहीला असलेला त्यांचा विरोध आहे, असे सांगितले आहे. त्यांच्या पुस्तकात ठिकठिकाणी साम्यवादी पद्धतीने गांधीजींच्या विचारांची संगती लावण्याचा प्रयत्न आहे. प्रा. बेन्नूर लिहितात, ‘ब्रिटिश सत्तेच्या रूपाने भारतावर झालेले आक्रमण ही भांडवलशाहीप्रणीत साम्राज्यवादाची सुरुवात आहे, हे त्यांनी (गांधीजींनी) पूर्णपणे लक्षात घेतले नव्हते. म्हणून आधुनिक तंत्रवैज्ञानिक सभ्यता आणि जागतिक साम्राज्यवाद यांच्यातील संबंध त्यांना स्पष्ट होऊ शकला नाही.गांधीजी हे स्वतंत्र विचारवंत होते. त्यांच्या विचारांवर ज्या मानवतावादी विचारवंतांच्या लेखनाचा प्रभाव पडला, त्यात साम्यवादी विचारवंतांचा समावेश नव्हता.

प्रा. बेन्नूर यांच्या पुस्तकातील महत्त्वाचा भाग म्हणजे गांधी विचारांचे मूळ त्यांच्यावरील कोणत्या संस्कारात असावे, याचा शोध त्यांनी घेतला आहे. त्यांनी म्हटले आहे, ‘गांधीजींची धर्म, इतिहास, ब्रिटिशांची परकीय सत्ता यांबद्दलची मांडणी कौटुंबिक पर्यावरणातून विकसित झालेली आहे.आपल्या विधानाच्या समर्थनार्थ प्रा. बेन्नूर यांनी-गांधीजींचे वडील दिवाण असल्यामुळे विविध जातीजमातींशी येणारा संबंध, अरबस्तानातील व्यापार्यांचे जाणे-येणे आणि त्यामुळे पोरबंदरमधील मोकळे व बहुरंगी वातावरण यांचा उल्लेख केला आहे. गांधीजींच्या आजोबांच्या तत्कालीन संस्थानिकांशी झालेल्या संघर्षात मुस्लीम सैनिकांनी त्यांच्या घराचे रक्षण केले होते. प्रणामी पंथातून होणारा कुराण आणि गीतेचा वापर, सुफी संतांचा प्रभाव इत्यादी गोष्टींचा परिणाम त्यांच्या धर्मविषयक जाणिवेवर झाला होता, असेही प्रा. बेन्नूर यांचे प्रतिपादन आहे. इंग्लंडमध्ये कायद्याचा अभ्यास करत असताना विविध पंथांच्या धर्मविषयक दृष्टिकोनांचा त्यांना परिचय झाला, याचाही उल्लेख प्रा. बेन्नूर यांनी केला आहे. भारतात जे शिक्षण ब्रिटिश राज्यकर्ते देत होते, त्याच्या प्रभावातून गांधीजी मुक्त राहिलेअसे विधान करताना प्रा. बेन्नूर यांच्या मनात हीच पार्श्वभूमी असावी. हिंद स्वराज्यतील गांधीविचारांची प्रस्तुतता सांगताना गांधीविचारांचा शस्त्र म्हणून जागतिक-आर्थिक साम्राज्यवादाविरुद्ध वापर होऊ नये म्हणून त्यांना केवळ आध्यात्मिक चौकटीत बंदिस्त करण्याचा प्रयत्न चालू आहे, असाही आरोप प्रा. बेन्नूर यांनी केला आहे. आपले म्हणणे मांडताना प्रा. बेन्नूर यांनी ठिकठिकाणी सद्य:कालीन राजकीय घडामोडींचा उल्लेख केला आहे.


हिंद स्वराज्यमधील गांधीजींचे विचार हे नंतर त्यांच्या विचारांत होत गेलेले बदल आणि वास्तवात असलेली परिस्थिती याचा विचार करूनच स्वीकारावे लागतात. यंत्रे असोत अगर वकिली आणि वैद्य यांसारखे सेवेचे व्यवसाय असोत, ती शोषणाची साधने न बनता लोकांच्या उपयोगाचीच साधने राहिली पाहिजेत असा गांधीजींचा आग्रह आहे. माणसाचे नैतिक, उन्नयन करणे हाच धर्माचा उपयोग गांधीजींना अपेक्षित आहे. गांधीजींनी स्वायत्त व स्वयंपूर्ण खेड्याचे चित्र समोर ठेवले व आपली स्वातंत्र्यकल्पना त्याच्याशी जोडली. परंतु वास्तव त्यापेक्षा निराळे होते. त्यामुळे स्वतंत्र भारताच्या राज्यव्यवस्थेत हिंद स्वराज्यतील बर्याच कल्पना प्रत्यक्षात येऊ शकल्या नाहीत. प्रा. बेन्नूर यांनी त्याबद्दल फारसे काही लिहिलेले नाही. मात्र, निराळ्या दृष्टिकोनातून हिंद स्वराज्यकडे पाहण्याचा त्यांनी जरूर प्रयत्न केला आहे.
- नरेन्द्र चपळगावकर

(साभार : लोकसत्ता - लोकरंग १० मार्च २०१९)

गेल्या पाच वर्षांचा वस्तुनिष्ठ आढावा


काही दिवसांपूर्वी या लेख-संग्रहाची प्रत मला मिळाली. ती वाचताना - त्यातील काही लेख या पूर्वी विविध वार्तापत्रात आले, तेव्हाच वाचले असले, तरी - डॉ. मुणगेकरांच्या वैविध्यपूर्ण प्रतिभेचा पुन्हा एकदा आनंद मिळाला.

गेल्या पाच वर्षांत निर्माण होत राहिलेल्या जवळपास प्रत्येक महत्त्वाच्या घटनेवर सर्चलाईट टाकणारे आणि त्या घडामोडींचे पद्धतशीर मुद्देसूद विश्लेषण करणारे हे सगळे लेख, डॉ. मुणगेकरांच्या विचारांची सखोलता आणि त्यांच्या विविध शाखांतील ज्ञानाचा अनुभव आपल्याला देतात. पुस्तकाच्या अखेरच्या भागात समाविष्ट केलेल्या स्मृतिलेखांमुळे, एक व्यक्ती म्हणून त्यांची अपार माणुसकीची संवेदनशीलता (Sensibility) आणि गुरुप्रेम व मित्रभावही स्पष्ट दिसतात.


हे सारे लेख त्यातील विषयांचे सखोल विश्लेषण म्हणून दीर्घकाळ वाचनात राहतीलच, पण त्याहीपेक्षा जास्त महत्त्वाचा भाग म्हणजे, हे सारे लेख काही काळाने आपण मागे वळून पाहू, तेव्हा भारताच्या इतिहासातील एक मन:स्पात पसरवणारा काळ म्हणून ज्या वर्षाचा उल्लेख होत असेल, त्या पाच वर्षांचा एक अत्यंत वस्तुनिष्ठ आढावा, एक वैचारिक पंचनामा, ह्या स्वरूपात पाहिले जातील. इंग्रजीमध्ये जॉर्ड ऑरवेल किंवा ऑर्थर कोस्लर यांनी ज्याप्रमाणे त्यांच्या काळातील विघातक राजकीय प्रक्रियांना वैचारिकतेच्या पायावर वाचा फोडली होती, त्या प्रमाणे मुणगेकर देशातील आणि खास करून महाराष्ट्रातील अनेक विघातक सामाजिक आणि राजकीय प्रक्रियांचे कितीतरी फोरेन्सिक रिपोर्ट्स या पुस्तकात आपल्यापर्यंत पोहोचवतात.

ह्या खेरीज, आवर्जून उल्लेख करावा, असा अजून एक प्रशंसनीय गुण म्हणजे या पुस्तकातील लेखांची वाचकाच्या सहज आवाक्यात येईल, अशी भाषाशैली अत्यंत गुंतागुंतीच्या विषयावरची, आणि मुळात दुर्बोध बनत जातात; पण प्रगाढ ज्ञानातून आणि चिंतनातून जन्मलेले शब्द सरळ सोपे असतात. ते तसे डॉक्टरसाहेबांचे आहेत. लोकशाहीवरचा प्रगाढ विश्वास आणि सामाजिक समानतेची सततची आस, हे मुणगेकरांच्या विचारांचे सतत चमकणारे तारे प्रत्येक लेखाला प्रकाश देत राहतात.


मला खात्री आहे की, आपल्या सध्याच्या झाकाळलेल्या या काळात आणि ज्या संक्रमणाच्या क्षणापाशी आपण आलो आहोत, त्या क्षणात, डॉक्टर मुणगेकरांचा हा लेखसंग्रह आपला पाठ दर्शक बनेल, प्रश्नाची नांदी बनेल.
- गणेश देवी

लटकणारा माणूस : 1964 (कविता)


लटकणार्‍या माणसाचं शरीर
छान छान खेळणी
मुलांचं आवडतं मनोरंजन
बाजारातून नाहीशी केलेली!
नाही; आणखी नाहीत तिथं
बरेच दिवस झाले ती विकल्यावर
शोधू नका त्यांना
सांगा तुमच्या मुलांना
बरेच दिवस झाले ती विकून!
त्यांचे आत्मे मेलेले
नाझींच्या कॉन्सन्ट्रेशन कॅम्प्समध्ये -
लटकणारा माणूस
बर्लिनमधील ज्यू नाही.
लटकणारा माणूस आहे अरब
माझ्यासारख्या लोकांसारखा
तुमच्या भावांनी फाशी दिलेला -
माफ करा, जेरुसलेममधील
ज्यू नाझींनी फाशी दिलेला.
बळींचे आत्मे, नाझी कॅम्प्समधील
जर तुम्हाला माहीत असतील...
जर तुम्हाला माहीत असतील...
- अनुवाद : रमेशचंद्र पाटकर

सामूहिक मृत्यू (कविता)


अंधाराशिवाय एकही गोष्ट मिळाली नाही,
झोपलो आम्ही छपराशिवाय
पण घेऊन पांघरूण अंगावर
आणि वाचलेला जीव
कुणीही आला नाही त्या रात्री
सांगायला आम्हाला इतरांच्या मृत्यूबद्दल.
रस्ते वाजवत राहिले शिट्ट्या
आणि रस्ते खून झालेल्यांनी खच्चून भरलेले,
आले होते ते शेजारच्या प्रदेशातून
ज्यांच्या किंकाळ्या
सुटून आल्यायत आमच्याकडे,
आम्ही पाहिलंय आणि ऐकलंयही
मेलेला माणूस हवेतून चालताना,
त्यांच्या बसलेल्या
धडकीच्या दोरीनं बांधलेला
खळखळाट खेचून घेतोय
चमकणार्‍या गवताच्या पात्यांतून,
धगधगत्या गवताच्या चटयांवरून
पडत राहिलंय सारं रस्त्यांवर,
स्त्रियांनी दिलाय जन्म
फक्त या जगाचा निरोप घेतलेल्यांना
आणि त्यानंतर आता
स्त्रिया देणार नाहीत जन्म.
- अनुवाद : रमेशचंद्र पाटकर

मी आहे तिथे (कविता)


मी येतोय तिथून आणि आठवतंय
जन्मलो होतो मी जन्मतो प्रत्येक जण तसा.
आहे मला आई
आणि एक घर बर्‍याच विधवांनी भरलेलं.
आहेत मला भाऊ, मित्र
आणि आहे एक तुरुंग,
आहे माझ्याजवळ एक लाट
खेचून नेलेली समुद्रपक्ष्यांनी.
आहे माझा स्वत:चा दृष्टिकोन
आणि एक जादा पातं गवताचं.
आहे माझा चंद्र
शब्दांच्या शिखरापलीकडे गेलेला.
आहे देवानं पाठवलेलं अन्न पक्ष्यांसारखं
आणि एक ऑलिव्हचं झाड ज्ञानाच्या पलीकडचं.
मी तुडवलीय जमीन
तरवारींनी देहांना मेजवानीत बदलण्यापूर्वी.
मी येतोय तिथून
परत केलंय आकाशाला त्याच्या आईकडे
जेव्हा त्याची आई करत होती आक्रोश
आणि ढाळतोय मी अश्रू
परतणार्‍या ढगानं मला ओळखावं म्हणून.
रक्तलांछित दरबारातील शिकलोय शब्द
तोडता यावेत नियम म्हणून
आणि केलेय मोडतोडही सर्व शब्दांची
एकच शब्द बनवण्यासाठी :
मायभूमी.
- अनुवाद : रमेशचंद्र पाटकर

दंगल बातम्यांमधील आणि प्रत्यक्षातील : एक परीक्षण


साधारणपणे 18 व्या शतकाच्या अखेरपासून ते आजपर्यंत दक्षिण आशियाच्या उपखंडात बर्‍याच जातीय आणि जमातवादी दंगली झाल्या आहेत. यातील प्रत्येक दंगलीचा प्रभाव समाजातील प्रत्येक व्यक्तीच्या मनात आठवणीच्या रूपात खोलवर रुजलेला आहे. दक्षिण आशियात ब्रिटिश आणि फ्रेंच यांच्या आगमनापूर्वी दिल्लीचे सुलतान, त्यानंतर मुघल साम्राज्य आणि त्यांच्या प्रादेशिक नवाबांचे शासन होते. इंग्रज आणि फ्रेंच शासकांच्या समोर वैविध्यपूर्ण समाजावर शांततामय नियंत्रण ठेवण्याचे मोठे आव्हान होते. दोन प्रमुख धर्माच्या वर तिसर्‍या प्रांताच्या लोकांचे शासन अशी परिस्थिती समाज तयार झाली. स्वधर्म रक्षणाचा मुद्दा त्याच काळात तयार झाला आणि त्यानेच  जमातवादया संकल्पनेला जन्म दिला. या विषयावरील पहिलं आणि एकुलतं एक पुस्तक विभूती नारायण राय यांनी लिहिलेले आहे. त्याचे शीर्षक जमातवादी दंगली आणि भारतीय पोलीसअसे आहे. विभूती नारायण राय हे माजी आयपीएस अधिकारी आहेत. ते उत्तर प्रदेशचे पोलीस महासंचालक होते आणि वर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाचे कुलगुरू होते. पोलीस सेवेत असल्यापासूनच ते मूलतत्त्ववादी, जमातवादी प्रवृत्तींना विरोध करत आलेले आहेत. निवृत्तीनंतर ते सक्रिय कार्यकर्ते म्हणून काम करत आहेत.


1994 साली त्यांना केंद्र सरकारच्या राष्ट्रीय पोलीस अकादमीकडून जमातवादी दंगलींमध्ये भारतीय पोलिसांच्या वर्तनावर काम करण्यासंदर्भात शिष्यवृत्ती मिळाली. जी त्यांनी आनंदाने स्वीकारली. हैदराबाद येथे स्थित सरदार पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमीत बसून वेगवेगळी कागदपत्रे जमा करून, त्यांचे वाचन करून झाल्यानंतर या पुस्तकाचा जन्म झाला आणि  हा शोधनिबंधाच्या स्वरूपात केंद्रीय गृह मंत्रालयाकडे सुपूर्द करण्यात आला. आधी म्हटल्याप्रमाणे भारतात कुठे कुठे जातीय आणि जमातवादी झाल्या; त्या वेळेला तत्कालीन पोलीस अधिकार्‍यांनी कोणती पावलं उचलली  आणि शेवटी त्या दंगलींचा समाजावर आणि शासनावर कसा प्रभाव पडला या सगळ्या गोष्टी राय यांच्या शोधनिबंधात सामील झाल्या आहेत.  राय यांनी आपल्या अभ्यासातून भारतीय समाजासमोरच्या नव्या शत्रूचे आकलन केलेले आहे. हा शत्रू दुसरा कोणी नसून खुद्द जमातवादआहे. प्रा. बिपिनचंद्रांच्या म्हणण्यानुसार जमातवाद ही एक अशी विचारसरणी आहे की ज्यानुसार एका धर्माच्या अनुयायांचे सामाजिक, राजकीय आणि आर्थिक हितसंबंध एकसमान असतात. या विचाराचे तीन विशिष्ट पैलू पुढीलप्रमाणे आहेत. पहिला समातवाद बहुलवादाला पूर्णपणे विरोध करत असतो. दुसरा, जमातवादाला नेहमी एका शत्रूची  गरज असते, आणि या बाबतीत शत्रू दुसर्‍या धर्मावर श्रद्धा  असलेला असू शकतो. तिसरा आणि शेवटचा पैलू, प्रत्येक  समुदायाचे हितसंबंध वेगळे आणि परस्परविरुद्ध असतात. भारतीय संदर्भात जमातवादाचा आशय हिंदू आणि मुसलमान या दोन समुदायांमधील अविश्वास, भयगंड, ईर्ष्या, कडवटपणा आणि हिंसेत सामावलेला आहे.

भारताच्या इतिहासात नोंद झालेली पहिली जमातवादी दंगल गुजरातमधील अहमदाबाद येथील 1713 साली झाली.  त्यानंतर अशाच स्वरूपाच्या अनेक दंगली झाल्या किंवा घडून आणल्या गेल्या. त्यावेळेला भारतीय पोलिसांचे वर्तन कसे होते? त्यांनी कोणत्या पद्धतीने कारवाई केली? जाळपोळ, मुलामुलींचे अपहरण, स्त्रियांवर बलात्कार या सगळ्याला ते कसे सामोरे गेले? हे प्रश्न आणि त्यांची उत्तरं महत्त्वाची आहेत. कारण जमातवादी किंवा जातीय दंगलींचा साधा उल्लेख झाला की अनेक जण तत्कालीन राज्य आणि केंद्र सरकारवर टीकास्त्र झाडतात. हे टीकास्त्र त्या सरकार आणि राजकीय पक्षावर ठिपक्याप्रमाणे टिकूनही राहतं पण पोलीस यंत्रणा निष्पक्ष आहे ना? ती केंद्रीय गृह मंत्रालयाशी संलग्न आहे. कायद्याची रक्षा हे सर्वस्व पोलीस यंत्रणा निष्पक्ष आहे ना? ती केंद्रीय गृह मंत्रालयाशी संलग्न आहे. कायद्याची रक्षा हे सर्वस्व पोलीस यंत्रणेकडूनच अमलात येतं. आपत्कालीन स्थितीत वापरल्या जाणार्‍या एनएसजी, सीआरपीएफ, इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस, रॅपिड अ‍ॅक्शन फोर्ससारख्या विशेष पथकांकडून हिंसक परिस्थिती आटोक्यात आली असेल अशी अपेक्षा आम्ही मनात ठेवतो. पोलीस यंत्रणा विषयीच्या आशावादी समजुती अनेकांच्या मनात असतात.

विभूती नारायण राय आपल्या संशोधनातून या सार्‍या समजुतीच्या पलीकडे असणारी वास्तवता दाखवतात. त्यांनी तीन महत्त्वाच्या दंगलींचे संदर्भ घेतले आहेत. अहमदाबाद येथील 1713 ची दंगल, 1984 साली इंदिरा गांधींच्या हत्येनंतर झालेला नरसंहा आणि 1987 ची हाशिमपुरा दंगल. 1713 ची दंगल ही भारतातील पहिली दंगल होती. लेखकांच्या मते ब्रिटिश सैन्यात सेवा बजावणार्‍या अफगाण सैनिकांनी अधिकार्‍यांचे आदेश न पाळता स्वत:चा धर्मपंथीयांच्यात सामील  झाले. 1984 साली कानपूरच्या प्राचार्या रतन गुजरालनी जेव्हा कंट्रोल रूमला गल्लीत घुसलेल्या दंगलखोरांविरुद्ध तक्रार करण्यासाठी फोन केला तेव्हा त्यांना पोलीस अधिकार्‍यांनी

हम भी तो हिंदू है!असे ऐकवले. या घटनेवरून पोलिसांचा बेजबाबदारपणा लक्षात घेण्यासारखा आहे. 1987 च्या हाशिमपुरा दंगलीनंतर अटक केलेल्या मुसलमानांना जेव्हा फतेहगढ मध्यवर्ती तुरुंगात नेण्यात आले तेव्हा त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. त्यांना जेवण, आणि दोन दिवसांसाठी देण्यात आले नाही.


लेखक स्वत: म्हणतात की दंगलींत प्रत्येक धर्माचा माणूस मारला जातो, पण हे कधी थांबू शकत नाही का? प्रत्येक वेळी मृतांचे आणि बेघर लोकांचे आकडे 1000 हून वर का जातात?  यावर पुस्तकाच्या शेवटी ते उपाय म्हणून या गोष्टी सुचवतात. राष्ट्रीय सद्भावना परिषद भरवणे; दंगल भडकलेल्या इलाख्यातील पोलीस अधीक्षक आणि संबंधित अधिकार्‍यांवर निलंबनाची कारवाई, सीबीआय, सीआयडी तपास वेळेत पूर्ण होणे इत्यादी. ज्यांनी कोणी जातीय दंगल फक्त बातम्यांच्या माध्यमात पाहिली असेल तर त्यांनी हे पुस्तक बारकाईने वाचावे.
- अश्वत्थ इस्लामपुरे                         

पुस्तकलेखनामागची माझी भूमिका : डॉ. आ. ह. साळुंखे


भारतीय घटना मनुस्मृतीपेक्षा हिणकस?
खरे तर, प्रत्यक्ष पुस्तक वाचल्यावर पुस्तकलेखनामागची माझी ही भूमिका आपोआपच स्पष्ट होईल. पण संपूर्ण पुस्तक वाचेपर्यंत थांबावे लागू नये, म्हणून येथे फक्त काही पुरावे देतो. श्री. कुलकर्णी यांनी 15/5/1992 रोजी मला पत्र लिहिले आहे. तेव्हा माझे हे पुरावेही फार जुने न देता 1992, 1991 आणि 1990 या सालांतील देतो. त्यांचे अधिक विवेचन अर्थातच पुढे योग्य ठिकाणी येईल. कोणी असे म्हणेल, की ही मते अपवादात्मक स्वरूपाची असल्यामुळे त्यांना फारसे महत्त्व देण्याची गरज नाही. प्रत्यक्षात ही मते अपवादात्मक नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. सांस्कृतिकदृष्ट्या अत्यंत प्रबळ अशा एका गटाची ही प्रातिनिधिक मते आहेत. आणि म्हणूनच त्यांची दखल घेणे भाग आहे.

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी "मनुस्मृतीच्या समर्थकांची संस्कृती"वर क्लिक करा.

आजचा सुधारकनावाचे एक मासिक नागपूरहून प्रकाशित होत असते. त्याच्या मे-जून 1992च्या अंकात एक संशोधक श्री. नी. र. वर्‍हाडपांडे यांनी पुढील विधान केले आहे, ‘‘...आजचे आमचे संविधानदेखील समतेचा निकष लावला, तर मनुस्मृतीपेक्षा हिणकस ठरते; कारण, या संविधानात पदोपदी भेदभाव करणारी कलमे आहेत. भारतीय संविधान समतेच्या तत्त्वावर आधारलेले नाही, असे न्यायमूर्ती निगम यांनी नुकतेच सांगितले.’’

पुणे विद्यापीठातर्फे परामर्शया नावाचे एक त्रैमासिक प्रसिद्ध होत असते. या त्रैमासिकाच्या फेब्रुवारी 1991च्या अंकात पुणे विद्यापीठाच्या संस्कृत-प्राकृत विभागाच्या प्रमुख डॉ. सरोजा भाटे यांनी म्हटले आहे, ‘‘घर सोडून मोकाट सुटलेल्या स्त्रीला नाठाळ गुराप्रमाणे वठणीवर आणण्यासाठी दावणीला बांधणारा मनू स्त्रीच्या दृष्टीने क्रूर असेल. परंतु एकंदर समाजाच्या दृष्टीने क्रूर असेल. परंतु एकंदर समाजाच्या दृष्टीने अराजकातून सुराज्य निर्माण करू पाहणारा एक कठोर अनुशासक अशी त्याची भूमिका असली पाहिजे.’’

नागपूर तरुण भारतच्या 15 ऑगस्ट 1990च्या अंकात लिहिताना संस्कृतचे विद्वान डॉ. के. रा. जोशी यांनी लिहिले आहे, ‘‘समाजनिर्मितीच्या क्षेत्रात आजपर्यंत झालेल्या प्रयोगात मनुस्मृतीचा प्रयोग लक्षणीय आहे.’’

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी "मनुस्मृतीच्या समर्थकांची संस्कृती"वर क्लिक करा. 

मनुस्मृती कालबाह्य झालेली नाही, हे प्रथमदर्शनी दाखवून देण्यास ही तीन मते पुरेशी आहेत, असे मला वाटते. आता, एका बाजूने मनुस्मृतीच्या संदर्भात अशा प्रकारचे लेखन सातत्याने प्रकाशित होत असताना, त्या लेखनाची चिकित्सा करणे आवश्यक आहे की नाही, याचा निर्णय वाचक सहजपणे घेऊ शकतात.
- डॉ. आ. ह. साळुंखे

माणगाव परिषद : बहिष्कृतांचे रणशिंग - उत्तम कांबळे

'अस्वस्थ शतकातील माणगाव परिषद ’ हा उत्तम कांबळे यांचा ग्रंथ ‘ लोकवाङ् ‌ मय गृह ’ तर्फे लवकरच वाचकांच्या भेटीसाठी येत आहे. एका ऐति...